आधारभूत किंमत धान्य खरेदी योजना:जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरु



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27- आधारभूत किंमत भात खरेदी योजनेअंतर्गत मार्केटींग फेडरेशन मुंबई तसेच  आदिवासी क्षेत्र, आदिवासी विकास महामंडळ नाशिक या अभिकर्ता संस्थांमार्फत शासनाची धान खरेदी केंद्र  सुरु करण्यात आली आहे. आदिवासी क्षेत्रासाठी कशेळे व पाथरज ता. कर्जत ही दोन केंद्र आहेत,असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
आधारभूत किंमत भात खरेदी योजनेअंतर्गत मार्केटींग फेडरेशन मुंबई यांनी नियुक्त् केलेल्या अभिकर्ता संस्था जिल्हा मार्केटींग रायगड यांचेमार्फत  रायगड जिल्ह्यातील अलिबाग,कर्जत,सुधागड,माणगाव, खालापूर, रोहा,पोलादपूर, महाड, पेण, श्रीवर्धन तसेच  आदिवासी क्षेत्र, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक या अभिकर्ता संस्थेने नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था प्रादेशिक व्यवस्थापक, म.रा.सह.आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक कार्यालय,जव्हार यांचेमार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम 2017-18 मध्ये कर्जत तालुक्यातील कशेळे व पाथरज या दोन मंजूर धान खरेदी केंद्रावर खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहे.
धान खरेदीचा कालावधी हा खरीप पणन हंगाम कालावधी दि.5ऑक्टोबर ते 31  मार्च 2018, रब्बी पणन हंगामाकरीता दि.1 मे 2018 ते 30 जून 2018 असा आहे.
7/12 उतारा आवश्यक
भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपलेकडील जमिनीबाबतचा 7/12 चा उतारा आणणे आवश्यक आहे. उताऱ्यातील धान्य् व धानाखालील क्षेत्र पाहून धान,भरडधान्य खरेदी करण्यात येईल.शेतकऱ्यांचे 7/12उताऱ्यानुसार पीकाखाली क्षेत्र,या वर्षीची पीक  परिस्थिती (पैसेवारी),पीकाचे सरासरी उत्पादन या बाबी विचारात घेऊन धान,भरडधान्य् खरेदी करण्यात येईल.
ऑनलाईन खरेदी
या धानाची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक राहील. यासाठी धान खरेदी केंद्रावर आणताना प्रत्येक शेतकऱ्यांने सोबत आपल्या आधारकार्डाची तसेच बँकेच्या पासबुकाची छायाप्रत आणणे आवश्यक आहे. रोज सायंकाळी खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रावर आणलेले, परंतु खरेदी न झालेले धान,भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांचीच राहील.
आधारभूत किंमत निश्चित
भाताचा प्रकार- भात अ ग्रेड-,  आधारभूत किंमत प्रती क्विंटल- 1590तसेच शेतकऱ्यांना अदा करण्याची रक्कम प्रती क्विंटल- 1590., भात सर्वसाधारण- आधारभूत किंमत प्रती क्विंटल-1550, तसेच शेतकऱ्यांना अदा करण्याची रक्कम प्रती क्विंटल-1550.
धान खरेदीचे निकष
आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने विहीत केलेल्या विनिर्देशात बसणार FAQदर्ज्याचेच धान्य्, भरडधान्य् खरेदी करण्यात येईल. केंद्र शासनाने हंगाम 2017-18 करीता आर्द्रतेचे अधिकतम प्रमाण धानासाठी 17% विहीत केले आहे. या प्रमाणापेक्षा आर्द्रता जास्त आढळल्यास भाताची खरेदी करण्यांत येणार नाही. भात खरेदी करतांना ओलावा व आद्रतेचे प्रमाण 17 टक्के असल्याची खात्री करुनच धान,भरडधान्याची खरेदी करण्यात येईल.कोणत्याही परिस्थितीत जास्त ओलसर किंवा बुरशीयुक्त् धान,भरडधान्य खरेदी करु नये.
भरडधान्य स्वच्छ व कोरडे असून ते विक्री योग्य् (मार्केटेबल) असल्याची खातरजमा केल्यावरच भाताची खरेदी करण्यांत येईल. मात्र भात आर्द्रतेच्या विहीत प्रमाणात असल्याची खात्री करुन ते स्विकारल्यानंतर आर्द्रता कटाती लावण्यात येणार नाही. धान खरेदी करतांना धान स्वच्छ कोरडे असावे.
खरेदी केंद्रावर फक्त भात खरेदी किंमती बदल दर फलक न लावता आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत असलेले दर्जा,विनिर्देश,खरेदी केंद्रे तसेच एफ.ए.क्यु. दर्जाची मानके इत्यादी बाबतची माहीती मराठीतूनच फलकावर दर्शविण्यात यावीत.
खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाच्या किंमतीतून, मुख्य खरेदी अभिकर्ता, सहकारी संस्थेच्या कर्जापोटी शेतकऱ्यांकडून 40टक्के पर्यंत कर्जाची रक्कम वसुली करु शकतील.
रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा
खरेदी केलेल्या धान,भरडध्यान्याची देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाईन पद्धतीने प्रदान करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत. यास्तव खरेदी केंद्रावर धान घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याची आधारकार्ड तसेच बँक बचत खाते क्रमांकाची ऑनलाईन नोंदणी होणे गरजेचे आहे.अभिकर्ता संस्थांच्या मुख्यालयातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरेदी केलेल्या धानाची रक्कम अदा करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
धान खरेदी केंद्रांची नावेः-
प्रादेशिक व्यवस्थापक, महा. रा.आदिवासी विकास महामंडळ मर्या. प्रादेशिक कार्यालय,जव्हार, यांचेकडील मंजूर धान खरेदी केंद्र.- कशेळे, पाथरज ता. कर्जत
जिल्हा मार्केटींग अधिकारी, रायगड यांचेकडील मंजूर धान खरेदी केंद्र तालुकानिहायः-
कर्जत-सबएजंट संस्था-नेरळ विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. खरेदी केंद्र-नेरळ,कशेळे,कळंब
श्रीवर्धन- रानिवली विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि.श्रीवर्धन-रानिवली,
रोहा- भैरवनाथ दुग्ध उत्पादक सह.संस्था लि.यशवंतखार ता.रोहा जि.रायगड., 
पनवेल –पनवेल सहकारी भात गिरणी लि.पनवेल-पनवेल., 
पेण- पेण तालुका सहकारी ख.वि.संघ लि.पेण,वडखळ,वाशी., 
महाड-महाड तालुका शेतकरी सह.ख.वि.संघ-वसाप.,
पोलादपूर-पोलादपूर तालुका सह.खरेदी विक्री संघ लि.,
खालापूर-नेताजी सह.भात गिरणी लि.चौक-चौक., 
माणगांव- माणगांव तालुका शेतकरी सह.ख.वि.संघ लि. माणगांव गोरेगांव.,
सुधागड-सुधागड तालुका सह.ख.वि.संघ लि. -पाली,परली,पेडली, झाप,नांदगांव., 
कर्जत-कर्जत तालुका शेतकरी सह. खरेदी विक्री संघ लि.- कर्जत,वैजनाथ,कडाव.,
अलिबाग-भूवनेश्वर सहकारी भात गिरणी लि.शिरवली.-शिरवली.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक