Posts

Showing posts from March 24, 2019

शालेय बस विशेष तपासणी मोहिम वाहन परवाना धारकांनी पुर्नतपासणी करावी

रायगड दि 27 :   शाळकरी मुलांच्या वाहतुकीमधील सुरक्षितेबाबत मा.उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ याचिका क्र.02/2012 निर्देशानुसार सुट्टीच्या कालावधीत शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वाहनाची फेरतपासणी दि.1 एप्रिल ते जून 2019 या कालावधीत ( शाळा सुरु होण्यापूर्वी ) करणे आवश्यक आहे. त्यासाठी शालेय बसवाहतूक परवानाधारकांनी आपली वाहने दि.1 एप्रिल ते जून 2019 या कालावधीत पुर्नतपासणीसाठी सादर करावीत.   या कालावधीत शालेय वाहन परवानाधारकांनी वाहनांची पुर्नतपासणी न केल्यास अशा वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार व वरील जनहित याचिकेतील निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण-रायगड यांनी कळविले आहे. 000000

तेनझिंग नॉर्गे राष्‍ट्रीय साहसी पुरस्कारासाठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

रायगड दि.26:- केंद्र शासनाच्‍या युवक कल्‍याण योजनेअंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्‍ट्रीय साहसी पुरस्‍कार सन २०१८ साठी नामांकनाचे प्रस्‍ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्‍ताव सादर करणा-या खेळाडूंची खालील नमुद केलेली कामगिरी व कागदपत्रे पेपर कात्रणे   त्‍याबाबत आवश्‍यक ती सर्व माहीती पुढीलप्रमाणे.-1. खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षामधील   म्‍हणजे   2016 ,  2017  व  2018   मधील असणे आवश्‍यक आहे.   , 2.साहसी उपक्रम हे जमिनीवरील ,   समुद्रातील किंवा हवेमधील असणे आवश्‍यक आहे. , 3.खेळाडूंची कामगिरी अतिउत्‍कृष्‍ट असणे आवश्‍यक असून ,   त्‍याबाबतची माहिती दोन ते तीन पानांमध्‍ये हिंदी किंवा इंग्रजी या भाषेमध्‍ये देणे गरजेचे आहे. (सदर साहसी पुरस्‍कार हे केंद्र शासनाच्‍या युवक कल्याण योजनेअंतर्गत येत असल्‍याने हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्‍ये आवश्‍यक)       तरी याबाबत अधिक माहितीसाठी केंद्रशासनाच्‍या युवक कल्‍याण विभागाच्‍या   www.yas.nic.in   या     संकेतस्‍थळावर पहावे किंवा जिल्‍हा क्रीडा अधिकारी ,   रायगड यांचे कार्यालयाशी प्रत्‍यक्ष अथवा क्रीडा अधिकारी सचिन निकम यांचेशी मो8856093608 या क्रमां

अनधिकृतरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई- जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी

  रायगड दि २६: निवडणूक यंत्रणेत जिल्हा प्रशासन गुंतले आहे असा समज करून अनधिकृतरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तहसीलदार , रेती गट तसेच पोलिसांनी या वाळू माफियांच्या हालचाली वर लक्ष ठेवावे व तातडीने कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिली. यासंदर्भात आज प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तांकडे लक्ष वेधून ते म्हणाले कि, ई लिलावास फारसा प्रतिसाद मिळाला नाही परंतु हातपाटीद्वारे वाळू उपसा लिलाव प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कुंडलिका नदी, रेवदंडा खाडी येथे बेकायदेशीररित्या रेती उपसा होत असेल तर तो लगेच थाब्विण्यात येईल आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असेही ते म्हणाले. ------------------

मतदारांना प्रलोभने दाखविणारे छुपे मार्गही बंद करणार बँक खाती, किराणा-कपड्यांची दुकाने यावर पथकांची नजर --जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी

रायगड दि २६ : उमेदवारांकडून छुप्या मार्गाने मतदारांना वस्तू किंवा रोख स्वरूपात प्रलोभने देण्याचे प्रकार घडू नये म्हणून निवडणूक यंत्रणा डोळ्यात तेल घालून जिल्ह्यातील मोठी किराणा सामान , भांडया कुंड्यांची दुकाने, कपडे, फर्निचर, खतांची दुकाने यावरही लक्ष ठेवून असणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात पोलीस तसेच भरारी पथकांना याबाबतीत सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कुठलाही दबाव व प्रलोभानाशिवाय जिल्ह्यातील निवडणूक पार पडली पाहिजे यावर भर असणार आहे.              अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनीही निवडणुकीच्या या धामधुमीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही तसेच अवैधरित्या मद्याची वाहतूक होणार नाही याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.   रोख रक्कम विविध माध्यमांतून वाटण्याचे प्रकार होत असतात , यासाठी अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात पण निवडणूक पथकांची यावर नजर असून कुणाचीही हयगय केली जाणार नाही. विशेषत: महिलांचे बचत गटांची बँकांतील खाती, जन धन खाती यामध्ये संशयास्पदरित्या   अचानक रकमा टाकलेल्या आ

कोकण विभागीय आयुक्त निवडणुकीसाठी प्रवेश योग्यता निरीक्षक

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25   भारत निवडणूक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे सर्व विभागीय आयुक्त हे प्रवेश योग्यता निरीक्षक असणार आहेत, त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील हे विभागासाठी   प्रवेश योग्यता निरीक्षक असतील. सर्व प्रवेश योग्यता निरीक्षक आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यात समन्वय असावा म्हणून अपंग कल्याण उपायुक्त, पुणे नितीन ढगे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना मतदान करण्यात कुठले अडथळे येत नाहीत ना तसेच सर्व मतदान केंद्रांवर या दृष्टीने सुविधा दिल्या आहेत किंवा नाही हे पाहण्याचे काम प्रवेश योग्यता निरीक्षक करतील.   00000

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी किंवा सवलत आस्थापनांनी काटेकोर पालन करावे – जिल्हाधिकारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:-   ३२ रायगड आणि 33 मावळ मतदार संघात अनुक्रमे २३ आणि २९ एप्रिल २-१९ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान असून या दिवशी येथील मतदारांना भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश उद्योग ,उर्जा कामगार विभागाने दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी सर्व आस्थापनांनी करावी असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी निर्देश दिले आहेत. मतदारांना त्यांचा हक्क बजावता येणे गरजेचे आहे, मात्र काही अस्थापना, उद्योग-व्यवसाय त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा सवलत देत नाही असे निदर्शनास आले आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी त्या मतदारसंघाबाहेर कार्यरत असलेल्या येथील मतदारांना भरपगारी सुट्टी द्यावी किंवा अपवादात्मक परिस्थितीत दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी असे परिपत्रकात म्हटले आहे. मात्र सवलत देण्यापूर्वी जिल्हाधिकारी अथवा मनापा आयुक्त यांची मान्यता घ्यावी लागेल. याबाबतीत एखाद्या आस्थापनेविरुध्द तक्रार आल्यास कारवाई केली जाणार आहे. ------------------------

सुधारित : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश जारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:-   नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील   25-ठाणे लोकसभा मतदार संघ व मावळ   33लोकसभा मतदार संघामध्ये शुक्रवार   29   एप्रिल रोजी मतदान होणार असून गुरुवार   23मे   2019   रोजी मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक प्रक्रीया शांत,   निर्भयपणे व नि:पक्षपाती पार पाडण्यासाठी   फौजदारी प्रक्रीया संहिता, 1973   चे कलम   144   प्रमाणे मनाई आदेश प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत असे   नवी मुंबईचे पोलीस आयुक्त   संजय कुमार   यांनी कळविले आहे. -----------------

कोकण विभागीय आयुक्त निवडणुकीसाठी प्रवेश योग्यता निरीक्षक

अलिबाग , जि. रायगड (जिमाका) दि. 25   भारत निवडणूक आयोगाने घोषित केल्याप्रमाणे सर्व विभागीय आयुक्त हे प्रवेश योग्यता निरीक्षक असणार आहेत, त्यानुसार डॉ जगदीश पाटील हे विभागासाठी   प्रवेश योग्यता निरीक्षक असतील. सर्व प्रवेश योग्यता निरीक्षक आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यात समन्वय असावा म्हणून अपंग कल्याण उपायुक्त, पुणे नितीन ढगे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांना मतदान करण्यात कुठले अडथळे येत नाहीत णा तसेच सर्व मतदान केंद्रांवर या दृष्टीने सुविधा दिल्या आहेत किंवा नाही हे पाहण्याचे काम प्रवेश योग्यता निरीक्षक करतील.   --------------

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी किंवा सवलत आस्थापनांनी काटेकोर पालन करावे – जिल्हाधिकारी

अलिबाग , जि. रायगड (जिमाका) दि. 25:-   ३२ रायगड आणि 33 मावळ मतदार संघात अनुक्रमे २३ आणि २९ एप्रिल २-१९ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान असून या दिवशी येथील मतदारांना भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश उद्योग ,उर्जा कामगार विभागाने दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी सर्व आस्थापनांनी करावी असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी निर्देश दिले आहेत. मतदारांना त्यांचा हक्क बजावता येणे गरजेचे आहे, मात्र काही अस्थापना, उद्योग-व्यवसाय त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा सवलत देत नाही असे निदर्शनास आले आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी त्या मतदारसंघाबाहेर कार्यरत असलेल्या येथील मतदारांना भरपगारी सुट्टी द्यावी किंवा अपवादात्मक परिस्थितीत दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी असे परिपत्रकात म्हटले आहे. मात्र सवलत देण्यापूर्वी जिल्हाधिकारी अथवा मनापा आयुक्त यांची मान्यता घ्यावी लागेल. याबाबतीत एखाद्या आस्थापनेविरुध्द तक्रार आल्यास कारवाई केली जाणार आहे. ------------------------

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश जारी

अलिबाग , जि. रायगड (जिमाका) दि. 25:-   नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील   25- ठाणे लोकसभा मतदार संघ व मावळ   33 लोकसभा मतदार संघामध्ये शुक्रवार   29   मार्च रोजी मतदार होणार असून गुरुवार   23 मे   2019   रोजी मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक प्रक्रीया शांत ,   निर्भयपणे व नि:पक्षपाती पार पाडण्यासाठी   फौजदारी प्रक्रीया संहिता , 1973   चे कलम   144 प्रमाणे मनाई आदेश प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत असे   नवी मुंबईचे पोलीस आयुक्त   संजय कुमार   यांनी कळविले आहे. -----------------