मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी किंवा सवलत आस्थापनांनी काटेकोर पालन करावे – जिल्हाधिकारी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25:- ३२ रायगड आणि 33 मावळ मतदार संघात अनुक्रमे २३ आणि २९ एप्रिल २-१९ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान असून या दिवशी येथील मतदारांना भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश उद्योग ,उर्जा कामगार विभागाने दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी सर्व आस्थापनांनी करावी असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी निर्देश दिले आहेत.
मतदारांना त्यांचा हक्क बजावता येणे गरजेचे आहे, मात्र काही अस्थापना, उद्योग-व्यवसाय त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा सवलत देत नाही असे निदर्शनास आले आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी त्या मतदारसंघाबाहेर कार्यरत असलेल्या येथील मतदारांना भरपगारी सुट्टी द्यावी किंवा अपवादात्मक परिस्थितीत दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी असे परिपत्रकात म्हटले आहे. मात्र सवलत देण्यापूर्वी जिल्हाधिकारी अथवा मनापा आयुक्त यांची मान्यता घ्यावी लागेल. याबाबतीत एखाद्या आस्थापनेविरुध्द तक्रार आल्यास कारवाई केली जाणार आहे.
------------------------

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड