Posts

Showing posts from October 9, 2022

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे मनाई आदेश जारी

    अलिबाग,दि.14 (जिमाका):-   ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2022, माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम मा.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.07 सप्टेंबर 2022 रोजीपासून आचारसंहिता अंमलात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत, परिमंडळ-2 मधील पनवेल तहसिल विभागांतर्गत पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या  हद्दीत खेरणे ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून या निवडणुकीत एकूण 04 प्रभागांमध्ये सरपंच पदाकरीता 02 सदस्य तसेच 11 सदस्य पदांकरिता एकूण 22 उमेदवार निवडणूक लढवित असून एकूण 01 इमारतीमधील 04 बुथवर दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 07.30 ते 17.30 वा. च्या दरम्यान मतदान होणार आहे.   या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी दि.17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 08.00 वा. पासून सुरु होणार असून मतमोजणी तहसिलदार कार्यालय, पनवेल येथे होणार आहे. दरम्यान मतपेट

दिवाळीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना मिळणार सवलतीच्या दराने शिधाजिन्नस संच

    अलिबाग,दि.14 (जिमाका):-   महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटूंब योजनेच्या  (PHH) पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त शासनाने नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येक शिधापत्रिकाधारकास 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेला शिधाजिन्नस संच उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. शासनाने रायगड जिल्हयातील 15 तालुक्यातील सर्व शासनमान्य रास्तभाव दुकानांमार्फत पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधा जिन्नस संच रु.100/- या दराने वितरीत करण्याचे ठरविले आहे.             जिल्हयातील अंत्योदय अन्न योजनेचे 83 हजार 251 शिधापत्रिकाधारक व प्राधान्य कुटूंब योजनेतील 3 लाख 64 हजार 824 शिधापत्रिकाधारक अशा एकूण 4 लाख 48 हजार 075 शिधापत्रिकाधारकांना म्हणजेच कुटूंबांना दिवाळी सणानिमित्त फक्त रु.100/- मध्ये शिधाजिन्नस संच मिळणार आहे.             सध्या खुल्या बाजारात 1 किलो रवा रु.40 ते 50, 1 किलो चणाडाळ रु. 70 ते 80, 1 किलो साखर रु.40 ते 44 व 1 लिटर पामतेल रु.100 असे उपलब्ध आहे. शासनाने सवलतीच्य

किसान क्रेडिट कार्डसाठी विशेष मोहीम शेतकऱ्यांनी क्रेडीट कार्डचा फार्म भरुन देण्यासाठी सहकार्य करावे

  अलिबाग,दि.13(जिमाका):-   प्रधा नमंत्री किसान सन्मान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड आवश्यक आहे. याकरिता दि.18ऑक्टोबर 2022 रोजी किसान क्रेडिट कार्डसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड प्रत्येक शेतकऱ्याकडे असणे आवश्यक असून शेतकऱ्यांना ज्या बँकेत सन्मान योजनेची रक्कम जमा होते, त्या बँकेत फार्म भरुन देण्याचे आहे. त्यामुळे ज्याच्यांकडे कार्ड नाही अशा शेतकऱ्यांनी सन्मान योजनेची रक्कम ज्या बँकेत जमा होते त्या बँकेत फार्म फरुन द्यावयाचे आहेत. यासाठी दि.18 ऑक्टोबर 2022 रोजी किसान क्रेडिट कार्डसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून कृषी सहाय्यकांनी आपल्या गावात शेतकऱ्यांकडून फार्म भरून घेवून दत्तक बँकेत जमा करावयाचे आहेत, तसेच शेतकऱ्यांनी क्रेडीट कार्डचा फार्म भरुन देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे. 000000

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत हिराकोट तलाव सुशोभिकरण कामांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

Image
  अलिबाग, दि.13 (जिमाका):-   जिल्हा नियोजन समिती रायगड सन 2021-22 अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत हिराकोट तलाव येथे करण्यात आलेल्या रिटेनिंग वॉल चे बांधकाम, रेलिंग बसविणे आणि उद्यान विकसित करणे, या कामांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित हरवडे यांनी केले. ऐतिहासिक हिराकोट तलावाच्या संवर्धन व जतनाचे महत्वपूर्ण काम जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आले. अलिबाग शहरास सरखेल कान्होजी आंग्रे यांचा ऐतिहासिक वारसा असून तो जतन करण्याची जबाबदारी पार पाडण्याचे भाग्य लाभले, याचे समाधान असल्याची भावना मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी व्यक्त केली. 00000

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -पालकमंत्री उदय सामंत

Image
       अलिबाग, दि.13 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करावयाचे आहे. आपण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून रायगड जिल्ह्यासाठी शासनाकडून सन 2022-23 करिता प्राप्त झालेला विकासनिधी संबंधित यंत्रणांनी विहीत कालावधीत खर्च करावा, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री  ना.श्री.उदय सामंत यांच्या  अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, सर्वश्री आमदार जयंत पाटील, बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, रवींद्र पाटील, आमदार कु.आदिती तटकरे, सर्वश्री आमदार महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अलिबाग उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, रोहा उपवनसंरक्षक श्री.अप्पासाहेब निकत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पनवेल महानगर

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहर 2022-23 करिता प्रस्ताव द्यावेत

  अलिबाग,दि.13 (जिमाका):-   शासनाने आंबा व काजू पिकांसाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. रायगड जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनी लि.मुंबई ही कंपनी नेमलेली आहे. या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमासंरक्षण मिळते. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित पिकांसाठी (आंबा व काजू) योजना ऐच्छिक आहे. या योजनेंतर्गत पुढील जोखमीच्या बाबींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस नमूद कालावधीपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल. काजू पिकासाठी अवेळी पाऊस दि.1 डिसेंबर ते दि.28 फेब्रुवारी, कमी तापमान दि.01 डिसेंबर ते दि.28 फेब्रुवारी, विमा संरक्षित रक्कम रु.01 लाख, गारपीट दि.01 जानेवारी ते दि.30 एप्रिल, विमा संरक्षित रक्कम 33 हजार 333. आंबा पिकासाठी अवेळी पाऊस दि.1 डिसेंबर ते दि.15 मे, कमी तापमान दि.1 जानेवारी ते दि.10 मार्च, जास्त तापमान दि.1 मार्च ते दि.15 मे, वेगाचा वारा दि.10 एप्रिल ते दि.15 मे विमा संरक्षित रक्कम रु.01 लाख 40 हजार, गारपीट दि.1 फेब्रुवारी ते दि.31 मे विमा संरक्षित रक्कम रु.46 हजा

धान व भरडधान्य खरेदीकरिता NeML पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्यासाठी दि.25 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

  अलिबाग,दि.12 (जिमाका):-  केंद्र शासनाने खरीप पणन हंगाम 2022-23 अंतर्गत राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता शेतकरी नोंदणी करण्याबाबत कळविले होते. त्यानुषंगाने मंजूर झालेल्या धान व भरडधान्य खरेदी केंद्रावर सब एजंट संस्थांमार्फत धान व भरडधान्य शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत दि.15 ऑक्टोबर 2022 पर्यंत होती. परंतु NeML पोर्टलवरील मागील हंगामातील दि.11 ऑक्टोबर 2022 रोजीच्या शेतकरी नोंदणीच्या अहवालानुसार शेतकरी नोंदणी अल्प प्रमाणात झाल्याचे दिसून आले. या कारणास्तव धान व भरडधान्य खरेदीकरिता NeML पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्यासाठी दि.25 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार शेतकरी नोंदणी करताना या हंगामापासून ज्या शेतकऱ्यांचा 7/12 आहे. त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष LIVE PHOTO अपलोड करणे आवश्यक आहे, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होत नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्याने LIVE PHOTO अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्या शेतकऱ्यांन

उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

Image
अलिबाग,दि.12 (जिमाका):-  राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत हे बुधवार, दि.12 ऑक्टोबर व गुरुवार, दि.13 ऑक्टोबर 2022 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे: बुधवार, दि.12 ऑक्टोबर रोजी  सायंकाळी 6:30 वाजता सुदर्शन केमिकल्स, रोहा विश्रामगृह येथे आगमन व राखीव (स्थळ- सुदर्शन केमिकल्स, रोहा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्र, रोहा, जि.रायगड). सोयीनुसार रोहा येथून मोटारीने अलिबागकडे प्रयाण. रात्री सोयीनुसार तुषार शासकीय विश्रामगृह, अलिबाग, रायगड येथे आगमन व राखीव. गुरुवार, दि.13 ऑक्टोबर 2022 रोजी  सकाळी 11 वाजता रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन व विकास समिती रायगड बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 वाजता रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथे डोंगरी विकास समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद. दुपारी 2:30 ते 3 राखीव. दुपारी 3:15 वाजता जिल्हा नियोजन समिती रायगड, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत हिराकोट तलाव येथे रिटनिंग वॉलचे बांधकाम करणे, रेलिंग बसविणे तसेच उद्यान विकस

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदांवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,दि.12 (जिमाका):-  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दि.29 ऑगस्ट 2022 च्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी रायगड कार्यालयाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर 28 व शासकीय सदस्यांची नेमणूक करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील 15 तालुक्यातील इच्छुक अर्जदारांकडून दि.07 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांची नियुक्तीसंबंधी तपशिलवार माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  https://raigad.gov.in/  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच सर्व तहसिल कार्यालयाच्या सूचना फलकांवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक अर्जदारांनी संबंधित तहसिल कार्यालयाकडे अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे संपर्क करुन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी केले आहे. 00000

स्मार्ट प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे शेतकरी उत्पादक कंपन्यांना आवाहन

Image
  अलिबाग,दि.10 (जिमाका):-  जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांची व शेतकरी गटाची सभा नुकतीच अलिबाग येथे पार पडली. यावेळी जिल्हा अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) प्रमुख तथा प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा कृषी अधीक्षक उज्जवला बाणखेले, स्मार्ट प्रकल्पाचे विभागीय नोडल अधिकारी श्री.रामेश्वर पाचे, जिल्हा नोडल अधिकारी तथा प्रकल्प उपसंचालक आत्मा श्री.सतिश बोऱ्हाडे आणि पुरवठा व मूल्य साखळी विकास तज्ञ श्री.भाऊसाहेब गावडे तसेच तालुक्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अध्यक्ष/प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रीमती उज्जवला बाणखेले यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना स्मार्ट योजनेचे महत्व पटवून सांगितले. राज्य शासन जागतिक बँकेच्या माध्यमातून 60 टक्के अनुदान देत असून आपण स्मार्ट प्रकल्पामध्ये सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. श्री.रामेश्वर पाचे यांनी शेतकरी कंपन्यांना प्रस्ताव तयार करण्यामध्ये असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. त्यामध्ये सभासद संख्या व वार्षिक उलाढाल या अटी शिथिल करण्यात याव्यात, अशी मागणी कंपनी प्रतिनिधींनी मां

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

  अलिबाग,दि.10 (जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि.14 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल, मुंबई-पुणे महामार्ग, गांधी हॉस्पिटलसमोर, ता.पनवेल, जिल्हा-रायगड येथे आयोजित केला आहे. जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील 1 हजार 367 व त्याहून अधिक रिक्त पदांच्या भरतीसाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात एस.एस.सी. पास/नापास, एच.एस.सी. पास, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, इत्यादी नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती  www.mahaswayam.gov.in  या वेबपोर्टलवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02141-222029 वर संपर्क साधावा. हा रोजगार मेळावा विनामूल्य आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने नोकरी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी केले आहे. 00000  

जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांनी रोजगार मेळाव्याकरिता रिक्त पदांची माहिती वेबपोर्टलवर सादर करावी

  अलिबाग,दि.10 (जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथे बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी आपल्या आस्थापनेकडे भरावयाची रिक्त पदे  https://rojgar.mahaswayam.gov. in  या वेबपोर्टलवर भरावीत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी केले आहे. ही माहिती भरताना प्रथम या वेबपोर्टलवरील Employment Employer (List a Job) Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरून आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details Job Details Agree and Post Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रिक