नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

 

अलिबाग,दि.10 (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि.14 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल, मुंबई-पुणे महामार्ग, गांधी हॉस्पिटलसमोर, ता.पनवेल, जिल्हा-रायगड येथे आयोजित केला आहे.

जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील 1 हजार 367 व त्याहून अधिक रिक्त पदांच्या भरतीसाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात एस.एस.सी. पास/नापास, एच.एस.सी. पास, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, इत्यादी नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02141-222029 वर संपर्क साधावा. हा रोजगार मेळावा विनामूल्य आहे.

तरी जास्तीत जास्त संख्येने नोकरी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी केले आहे.

00000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक