Posts

Showing posts from August 1, 2021

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संवेदनशीलतेने दोन अनाथ मुलांना मिळाले घर

    अलिबाग, जि.रायगड दि.6 (जिमाका):- जिल्हयाच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना त्यांच्या पनवेल तालुक्याच्या दौऱ्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी दत्ता शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांकडून पनवेल तालुक्यातील बाघाचीवाडी, सारसाई, पो. आपटा, ता. पनवेल या आदिवासी पाडयावरील एका कुटुंबाच्या हलाखीच्या प‍रिस्थितीची   माहिती मिळाली होती. या कुटुंबातील 2 लहान भावंडे,   1 मुलगी वय वर्ष 9 व 1 मुलगा वय वर्ष 7 हे अनाथ असून त्यांना राहायला नीट घर नाही. त्यांचे वडील हयात नसून आई बेपत्ता आहे.     ते त्यांच्या 68 वर्षाच्या आजीबरोबरच कसाबसा उदरनिर्वाह करून लहानशा घरात राहतात. हे   घरही मोडकळीला आले असून राहण्यायोग्य नाही. हे कुटूंब घरात पावसाचे पाणी गळत असल्याने शाळेच्या वऱ्हांड्यात झोपत असल्याची माहिती मिळताच पुराने संपूर्ण बाधीत गावाचे योग्य पुर्नवसन करुन पूरबाधितांना दिलासा देणाऱ्या संवेदनशील जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तात्काळ पनवेल तहसिलदार श्री. विजय तळेकर आणि महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री. अशोक पाटील यांना तात्काळ त्या कुटुंबाचे व

पनवेल तालुक्यातील वारदोली तलाठी कार्यालयांकरिता मौजे बेलवली येथील शासकीय जागा हस्तांतरित महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे धडाडीचे निर्णय

    अलिबाग, जि.रायगड दि.6 (जिमाका):- तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.   ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती, या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली.     या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील वारदोली या तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.     त्यानुसार तलाठी सजा वारदोलीसाठी मौजे बेलवली येथील स.नं 66 क्षेत्र 1.10.00 हे.आर.पैकी 0.05.00 हे.आर. ही शासकीय जमीन महसूल मुक्त व सारामाफीने वारदोली तलाठी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच

पनवेल तालुक्यातील मोर्बे तलाठी कार्यालयांकरिता जागा हस्तांतरित महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे धडाडीचे निर्णय

      अलिबाग, जि.रायगड दि.6 (जिमाका):- तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.   ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती, या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली.     या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील मोर्बे या तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.     त्यानुसार तलाठी सजा मोर्बेसाठी स.नं 194 क्षेत्र 4.65.00 हे.आर.पैकी 0.05.00 हे.आर. ही शासकीय जमीन महसूल मुक्त व सारामाफीने संबधित तलाठी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार

अलिबाग तालुक्यातील बामणगाव तलाठी कार्यालयांकरिता जागा हस्तांतरित महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे धडाडीचे निर्णय

      अलिबाग, जि.रायगड दि.6 (जिमाका):- तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.   ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती, या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली.     या पार्श्वभूमीवर अलिबाग तालुक्यातील बामणगाव या तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.     त्यानुसार तलाठी सजा बामणगावसाठी क्षेत्र 0.03.00 हे.आर. ही जमीन महसूल मुक्त व सारामाफीने संबधित तलाठी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधि

पेण तालुक्यातील विविध तलाठी कार्यालयांकरिता जागा हस्तांतरित महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे धडाडीचे निर्णय

    अलिबाग, जि.रायगड दि.6 (जिमाका):- तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.   ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी कार्यालयाची इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती, या दृष्टीने पालकमंत्री या नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली.     या पार्श्वभूमीवर कामार्ली, उचेडे, आंबेघर, शिर्की, पाबळ या तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी   संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.     त्यानुसार तलाठी सजा कामार्लीसाठी क्षेत्र 0.04.00 हे.आर., उचेडे येथील तलाठी सजा कांदळेसाठी क्षेत्र 0.01.00 हे.आर.,तलाठी सजा आंबेघरसाठी क्षेत्र 0.05.00 हे.आर., तलाठी सजा शिर्कीसाठी क्षेत्र 0.02.00 हे.आर.,तलाठी सजा

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 4 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग,जि.रायगड,दि.6 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.58 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2577.89 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-             अलिबाग- 2.00 मि.मी., पेण- 9.00 मि.मी., मुरुड- 3.00 मि.मी., पनवेल- 2.40 मि.मी., उरण-2.00 मि.मी., कर्जत- 3.60 मि.मी., खालापूर- 3.00 मि.मी., माणगाव- 2.00 मि.मी., रोहा- 4.00 मि.मी., सुधागड-8.00 मि.मी., तळा- 4.00 मि.मी., महाड- 0.00 मि.मी., पोलादपूर- 9.00 मि.मी, म्हसळा- 5.00 मि.मी., श्रीवर्धन- 4.00 मि.मी., माथेरान- 12.20 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 73.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 4.58 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 80.15 टक्के इतकी आहे. 00000

आयकर विभागामध्ये खेळाडूंच्या भरतीबाबत जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून होणार क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी

  अलिबाग,जि.रायगड,दि.6 (जिमाका): केंद्र शासनाच्या आयकर विभागाव्दारे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरीता विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. एकूण 22 खेळ प्रकारातील खेळाडूंसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.   या भरतीची सविस्तर जाहिरात व माहिती www.incometaxmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या भरतीसाठी ज्या खेळाडूंनी भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे, असे खेळाडू पात्र ठरणार आहेत. संबंधित खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगिरी, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे प्रमाणित करून देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील ज्या खेळाडूंनी शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड-अलिबाग यांच्याकडे अर्ज सादर करावेत. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे Form-4 भरुन, स्पर्धा प्राविण्य प्रमाणपत्रासह अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.20 ऑगस्ट 2

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र बोधचिन्ह (LOGO) स्पर्धा जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरिकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.6 (जिमाका): राज्याची क्रीडा विषयक कामगिरी जास्तीत जास्त उंचाविण्याकरिता क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेवून, नोकरीच्या जास्तीत संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास व्यावसायिक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे, यानुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन, खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण मिळावे, हा राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्मितीचा उद्देश आहे. याच उद्देशाने शासनाने राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र स्थापन केले आहे. या आंतरराष्ट्रीय क्रीडा विदयापीठाचे बोधचिन्ह (LOGO) निश्चित करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून, या स्पर्धेच्या नियम, अटी व पुरस्कार विषयक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या स्पर्धेत भारतातील नागरिक भाग घेवू शकतात, तसेच या स्पर्धेसाठी हे बोधचिन्ह तयार करुन सादर करण्याचा अंतिम दि.10 ऑगस्ट, 2021 असा राहील. या स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय क

जलजीवन मिशन अंतर्गत गावस्तरीय गाव कृती आराखडा प्रशिक्षण संपन्न

  अलिबाग,जि.रायगड,दि.6 (जिमाका):- जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गाव कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील   यांच्या मार्गदर्शनाखाली गावकृती आराखडा अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरीय प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरांवरील यंत्रणेचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले.           रायगड जिल्हयांतील ग्रामीण भागातील 809 ग्रामपंचायतीमधील 1 हजार 841 महसुली गावांचे जल जीवन मिशन अंतर्गत कृती आराखडे तयार करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने हाती घेतली आहे.त्यासाठी 22 जुलै ते 7 ऑगस्ट 2021 या दरम्यान गाव कृती आराखडा पंधरवडा राबविण्यात येत आहे. जिल्हयांत ग्रामीण भागात 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबांपर्यंत नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करण्याचे उदिष्ट हाती घेण्यात आले आहे. त्यादृष्टीने ग्रामस्तरांवर गाव कृती आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत गावांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. यामध्ये राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मुंबई आणि युनिसेफ मुंबई

जिल्हा प्रशासनाने महाड तालुक्यातील नुकसानीची दि.26 जुलै ते 03 ऑगस्ट या कालावधीतील पंचनाम्यानुसार माहिती केली जाहीर

    अलिबाग,जि.रायगड,दि.4 (जिमाका):- महाड तालुक्यात दि.22 व 23 जुलै 2021 रोजी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती व दरड कोसळण्याची घटना घडली.   त्यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने पंचनाम्याची कार्यवाही तात्काळ सुरु केली.   दि.26 जुलै ते 03 ऑगस्ट   या कालावधीत करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार प्राप्त झालेली नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.   पंचनाम्याची कार्यवाही अजूनही सुरु आहे. पंचनाम्याच्या कार्यवाहीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. महाड तालुक्यातील नुकसानीबाबतची दि.26 जुलै ते 03 ऑगस्ट 2021 या कालावधीतील पंचनाम्यानुसार प्राप्त माहिती पुढीलप्रमाणे- महाड शहरातील बाधित झालेल्या घरांची संख्या-9 हजार 225, एकूण झालेल्या पंचनाम्यांची संख्या 6 हजार 471,   ग्रामीण विभागातील बाधित झालेल्या घराची संख्या- 5 हजार 343, एकूण झालेल्या पंचनाम्यांची संख्या 5 हजार 911.    एकूण बाधित कुटुंब संख्या 14 हजार 368, त्यापैकी पंचनामे   झालेली   कुटुंबे 11 हजार 104, पंचनामे शिल्लक असलेली कुटुंबे संख्या 3

माणगाव येथील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) च्या न्यायिक अधिकाऱ्याच्या निवासस्थानासाठी भाडेतत्वावर जागा घेण्यास मा.मुंबई उच्च न्यायालयाची मान्यता

  अलिबाग,जि.रायगड,दि.4 (जिमाका):- दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर), माणगाव या न्यायालयाच्या न्यायिक अधिकाऱ्याच्या निवासस्थानासाठी भाडेतत्वावर जागा घेण्यास मा.उच्च न्यायालयाने विशेष बाब म्हणून मान्यता दिली आहे. मा.मुंबई उच्च न्यायालयाने माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू करण्याकरिता नुकतीच तत्वतः मान्यता दिली होती. हे पालकमंत्री कु.आदिती   तटकरे यांनी बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य व सर्वसामान्य पक्षकारांची मागणी पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेच यश आहे. खासदार सुनिल तटकरे यांनी ते स्वत: राज्य मंत्रिमंडळात मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात माणगाव येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय स्थापन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच माणगाव अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची इमारत व माणगाव येथे जिल्हा न्यायालय सुरू झाले. माणगाव, श्रीवर्धन, रोहा व सुधागड-पाली येथील बार असोसिएशनमार्फत माणगाव येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू करण्याकरिता विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांन

बँक ऑफ इंडियाला वित्तीय वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत रु.720 कोटींचा नफा

  अलिबाग,जि.रायगड दि.4 (जिमाका) :-    भारतातील अग्रगण्य बँक ऑफ इंडियाने वित्त वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत रु.720 कोटीचा निव्वळ नफा मिळविला आहे, अशी माहिती बँक ऑफ इंडिया रायगड विभागाच्या विभाग प्रमुख श्रीमती शेपा विश्वास यांनी दिली आहे. बँकेचा निव्वळ नफा हा मार्च 2021 च्या संपलेल्या तिमाहीपेक्षा हा नफा 188 टक्क्यांनी जास्त आहे. ऑपरेटिंग नफा मार्च 2021 च्या तुलनेत 34 टक्क्यांनी वाढून रूपये 2 हजार 806 कोटी झाला आहे. बँकेच्या वित्त वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत CASA ठेवीमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 13.80 टक्के वाढ नोंदविली गेली. बँकेच्या व्याज नसलेल्या उत्पन्नात गेल्या वर्षापेक्षा 39 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेच्या ढोबळ थकित कर्जामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा 40 बिंदू ने घट झाली आहे. बँकेच्या निव्वळ थकित कर्जामध्ये 3.35 टक्के ने घट झाली आहे. बँकेचे किरकोळ, कृषी आणि MSME कर्ज 11.02 टक्क्यांनी वाढले आहे. किरकोळ कर्जामध्ये 10.57 टक्के, कृषी कर्जामध्ये 11.08 टक्के, MSME कर्जामध्ये 11.45 टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे. बँकेच्या जागतिक व्यवसायामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेप

कृषी विभागाच्या विविध योजनांतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार प्रथम प्राधान्याने लाभ

  अलिबाग,जि.रायगड दि.4 (जिमाका) :-   महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यांमध्ये दिनांक 21 व 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे सावित्री नदीला महापूर आला. या महापूराचे पाणी महाड शहरामध्ये घुसले, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरामधील अनेकांची शेतीसुद्धा पाण्याखाली गेली.              दि. 24 जुलै रोजी महाड नगरपालिकेच्या   इमारतीमध्ये खासदार श्री. सुनिल तटकरे,   पालकमंत्री कु.आदिती तटकरे   आमदार भरत गोगावले,   जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी,   जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अशोक दुधे यांच्या उपस्थितीत    सर्व विभागांचे अधिकारी आणि विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली.   या बैठकीत पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांबाबत चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.             दि. 21 व 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर या तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत प्रथम प्राधान्याने लाभ देण्याचे निश्चित झाले. कृषी विभागाकडून या न

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्हा सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्रात अव्वल 34 हजार 658 प्रकरणे सामंजस्याने मिटवून संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्हा ठरला अव्वल

    अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका):- न्यायालयात वर्षानुवर्षे वाद करीत बसून वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेवून लोकन्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयांच्या इतिहासात गेल्या दशकात प्रकर्षाने रूढ झालेला आहे. नुकत्याच (दि.1 ऑगस्ट 2021) रोजी अलिबाग येथे झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 34 हजार 658 प्रकरणे सामंजस्याने मिटवून संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा प्र.इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील दाखलपूर्व व प्रलंबित अशी एकूण 92 हजार 332 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखलपूर्व 33 हजार 220

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता दि.15 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत

  अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका):- जिल्ह्यातील मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता 10 वी., 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ.करिता महामंडळाकडून सरासरी 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून “ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती ” करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्येष्ठता व गुणानुक्रमांकानुसार प्रथम 03 ते 05 विद्यार्थ्यांची निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधार कार्ड, शाळेचा दाखला,गुणपत्रिका, 2 फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतीत आपले पूर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), श्रीराम समर्थ गृहनिर्मा

क्रांतीसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

  अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका) :- क्रांतीसिंह नाना पाटील   जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.        यावेळी तहसिलदार सतीश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 0000

कर्नाळा व फणसाड अभयारण्यात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतील “पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण” उपक्रमाचा शुभारंभ संपन्न

    अलिबाग,जि.रायगड,दि.02(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य व फणसाड अभयारण्य परिसरातील स्थानिक आदिवासी समाजातील बेराजगार युवक-युवतींना दि. 02 ते 06 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय पातळीवरील गाईड निर्माण करणाऱ्या "आयआयटीटीएम" या भारत सरकार मान्यता प्राप्त संस्थेमार्फत प्रशिक्षण शुभारंभ कार्यक्रम पनवेल येथील कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे आज संपन्न झाला.    या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी स्थानिक तरुण-तरुणींनी उत्तम प्रतिसाद द्यावा व पर्यटक मार्गदर्शक (गाईड)चे कौशल्य आत्मसात करावे, पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद देत गाईड प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या रानसई, चिंचवण, घेरावडी आणि फणसाड येथील एकूण 29 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) फणसाड श्री. नंदकिशोर कुप्ते, परिक्षेत्र वन अधिकारी श्री. प्रदीप चव्हाण, पर्यटन विभागाचे संचालक श्री. हनुमंत हेडे, पर्यटन विभागाचे आय टी अधिकारी व ट्रेनिंग हेड योगेश निरगुडा हे उपस्थित होते.   महाराष्ट्र हे पर्यटनदृष्ट्या संपन्न राज्य आहे. पर्यटनावर आधारि

साहित्यसंपदा आणि इतर संस्थांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

    अलिबाग,जि.रायगड,दि.02(जिमाका):- साहित्यसंपदा, शिवधारा ट्रेकर्स, तेजस्विनी सांस्कृतिक आणि सामाजिक फाउंडेशन अलिबाग आणि नादब्रम्ह.. एक स्वराविष्कार, गिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 'आम्ही समाजाचे देणे लागतो'   उपक्रम नुकताच यशस्वीरित्या पार पडला. साहित्य, कला, सांस्कृतिक व सामाजिक   क्षेत्रातील संस्थांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. केवळ आपल्या क्षेत्रापुरते मर्यादित न राहता सामाजिक भान जपत एकत्र येऊन केलेल्या उपक्रमाबद्दलची माहिती साहित्य संपदा प्रमुख वैभव धनावडे यांनी दिली. महाड, पोलादपूर येथील पूरग्रस्तांना व रस्ता खचल्यामुळे संपर्क तुटलेल्या गावांसाठी नुकतीच या संस्थांमार्फत मदत देण्यात आली. रिलायन्स नागोठणेचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक, कवी, स्तंभलेखक रमेश धनावडे, साहित्य संपदा संस्थापक वैभव धनावडे, प्रांताधिकारी पेण विठ्ठल इनामदार, तहसिलदार पोलादपूर समीर देसाई, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत सिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजूंना अन्नधान्य, चादर, कपडे, ब्लॅंकेट पाणी, सॅनेटरी पॅड्स आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पेण येथील जिते पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप

    अलिबाग,जि.रायगड,दि.02(जिमाका):- "अतिवृष्टी, दरड पडणे व पूरपरिस्थिती यामुळे जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, कर्जत, पेण व इतर तालुक्यातील अनेक गावातील कुटुंबावर संकट ओढवले आहे. शासन पातळीवर त्यांना मदत निश्चितच मिळेलच परंतु त्यांना तातडीने आधार मिळावा, यासाठी सुनील तटकरे प्रतिष्ठान तर्फे जिल्ह्यासह पेण मधील जिते पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप करण्यात येत आहे. झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण होऊन तहसिलदार यांच्यामार्फत यादीतील कुटुंबाना ही मदत दिली जाणार आहे. अशा संकटात धैर्याने उभे राहून आपण सर्वांनी उभारी घेतली पाहिजे " असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिते येथे अन्नधान्य किट वाटप कार्यक्रमात केले. सुनील तटकरे प्रतिष्ठान तर्फे जिल्ह्यातील पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार पेण येथील पूरग्रस्तांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. यावेळी पेण तहसिलदार डॉ.अरुणा जाधव, दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंदराव पाटील, नरेंद्र ठाकूर, उदय जवके,   दयानंद भगत, जितेंद्र ठाकूर, जि

पूरग्रस्त भागातील जनावरांच्या काळजीसाठी पशुसंवर्धन विभागाने कसली कंबर 20 पथकांकडून जवळपास 2 हजार 200 जनावरांवर करण्यात आले उपचार

    अलिबाग,जि.रायगड,दि.02(जिमाका):-   जिल्हयात दि.21 व 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड शहरात पूरामुळे तर अन्य तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले.  या नुकसानीत मोठ्या प्रमाणात जनावरांचेही नुकसान झाले. मृत जनावरांचे पंचनामे करणे, मृत जनावरांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे, जखमी व जिवंत जनावरांना औषधोपचार करणे, त्यांचे लसीकरण करणे, या कामांना पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी निधी चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के,जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ.बंकट आर्ले यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने सुरुवात केली. झालेल्या पशुहानीचा दि. 30 जुलै  2021 रोजी पर्यंतचा अहवाल पुढीलप्रमाणे- अतिवृष्टीबाधित 9 तालुक्यातील 44 गावांमधील एकूण मृत जनावरे- गाय-106, म्हैस-123,  बैल-50, वासरे/रेडके- 25, शेळया/मेंढया- 134, खेचर/गाढवे-4, घोडे-2, कोंबड्या-47 हजार 272.  या पंचनाम्यासाठी एकूण 20 पथके नेमण्यात आली होती. मुंबई विभागातून ठाणे/पालघर व देवनार येथून मनुष्यबळ प्राप्त करून देण्यात आले. तर मुंबई पशुवैद्यकीय मह

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेतील शिकाऊ उमेदवारांनी अंतिम परीक्षेचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता संस्थेशी संपर्क साधावा

    अलिबाग,जि.रायगड,दि.02(जिमाका):- अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 105 वी (एप्रिल 2017), 106 वी (ऑक्टोबर 2017) आणि 107 वी एप्रिल 2018) शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र पनवेल येथे झालेल्या परिक्षेचे अंतिम प्रमाणपत्र मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, पनवेल या आस्थापनेमध्ये डी.जी.ई.टी नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. हे प्रमाणपत्र वितरणासाठी उपलब्ध असून संबंधित प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रमाणपत्र कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत मूळ गुणपत्रकासह स्वतः उपस्थित राहून प्राप्त करुन घ्यावे, असे सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, पनवेल श्री.वि.द.टिकोले यांनी कळविले आहे. 00000000

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेतील शिकाऊ उमेदवारांनी प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता कागदपत्रे जमा करावीत

    अलिबाग,जि.रायगड,दि.02(जिमाका):- अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 105 वी (एप्रिल 2017), 106 वी (ऑक्टोबर 2017) आणि 107 वी एप्रिल 2018) शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र पनवेल येथे झालेल्या परिक्षेमधील ज्या उमेदवारांचे Contract Registration Offline झालेले आहे, अशा उमेदवारांचे अंतिम प्रमाणपत्र त्यांच्या Contract Registration संबंधातील कागदपत्रांची पूर्तता न झाल्याकारणाने कार्यालयात उपलब्ध झालेले नाहीत. त्या संबंधीत प्रशिक्षणार्थ्यांनी प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता प्रशिक्षणार्थ्यास दिलेल्या गुणपत्रिका, आस्थापनेकडील Offline Contract form, प्रशिक्षणार्थ्यांना मिळालेल्या स्टायपेंडची नोंद असलेले संपूर्ण कालावधीचे आस्थापनेकडील Bank Statement ही कागदपत्रे कार्यालयात स्वतः उपस्थित राहून अथवा आपण ज्या आस्थापनेमध्ये आपले शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्या आस्थापनेशी संपर्क साधून आस्थापनेमार्फत सर्व कागदपत्रे कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत जमा करावी, असे सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, पनवेल श्री.वि.द.टिकोले यांनी

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ताई ठाकरे यांनी दिली महाड-पोलादपूर येथील पूरग्रस्त भागास भेट महिलांना धान्य किट व सॅनिटरी नॅपकिन्स इ. साहित्य वाटप करून महिलांशी साधला संवाद

    अलिबाग,जि.रायगड,दि.02(जिमाका):- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र शासन अंगीकृत) अध्यक्षा श्रीमती ज्योती ताई ठाकरे (राज्यमंत्री दर्जा) यांनी काल (दि.1 ऑगस्ट)   रोजी महाड   मधील नडगाव, भोराव तसेच पोलादपूर तालुक्यातील चरई सोनारवाडी, भोईवाडी, बौद्धवाडी आणि पोलादपूर बाजारपेठ येथील महिलांना धान्य किट व सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादी साहित्य वाटप करून महिलांशी संवाद साधला.   त्यांनी पूरग्रस्त भागास   प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महाड शहरातील राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान( NULM) अंतर्गत असलेल्या   महिला गटांतील महिलांना भेट दिली. तसेच माविम अंतर्गत येणाऱ्या प्रगती लोकसंचलीत साधन केंद्र-कर्जत, ओमसाई प्रेरणा ,अलिबाग CMRC नी मदतीसाठी कशा प्रकारे मदतकार्य केले, याचा आढावा घेतला.   NULM च्या शहरी भागातील   वस्ती स्तर संघांनी   महाड पूरग्रस्त कुटुंबांना कशा प्रकारे मदतीचा हात दिला, याची माहिती घेण्यात आली.   अशा प्रकारे माविम च्या महिलांनी पूरग्रस्तांना मदत करुन भगिनी भाव जोपासण्याचे कार्य केले. या संपूर्ण कार्यात ओम साई प्रेरणा CMR

20KV महाड उपकेंद्राचा वीजपुरवठा कार्यान्वित करण्यास महापारेषणला आले यश

  अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):- महाड परिसरातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे महाड - कळंबानि   -   पेढांबे या अतिउच्च दाबाच्या वाहिनीचे लोकेशन नं.09 आणि 10 चे मनोरे पडून 220KV महाड उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे महाड परिसरातील वीज प्रवाह बंद होऊन मोबाईल नेटवर्क सुद्धा बंद झाले होते. हा वीज पुरवठा तात्काळ सुरु होण्याच्या दृष्टीने महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती पाहणी करून मनोरे उभारण्याची व्यवस्था केली. परंतु   पूर परिस्थिती, सतत पडणारा पाऊस आणि खंडित मोबाईल नेटवर्क यामुळे पुढील कामासाठी लागणारे साहित्य पुरवण्यासाठी सुद्धा परिस्थिती खूप कठीण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा महापारेषण च्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने सतत 9 दिवस अथक आणि अविरत परिश्रम करून हे दोन मनोरे पुन्हा उभारून 220KV महाड उपकेंद्राचा   वीजपुरवठा दि.01 ऑगस्ट   रोजी सुरळीतपणे   कार्यान्वित केला. 0000000

पूरग्रस्तांना मदत करताना सार्वजनिक व वैयक्तिक आरोग्याच्या साधनांना प्राधान्य द्यावे --जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):-   महाड व पोलादपूर मध्ये नुकत्याच आलेल्या महापूरामध्ये महाड शहराबरोबरच पोलादपूर व महाड तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे . शासन , सामाजिक संस्था व अनेक स्वयंसेवी लोक पूरग्रस्त लोकांना मदत करीत आहेत, यामध्ये बऱ्याचदा गरज   नसणाऱ्या वस्तूही देणगी स्वरूपात पूरग्रस्तांना मिळत आहेत.   सध्या पूरग्रस्तांना कशा प्रकारे मदत करायची,   हे जाणून घेण्यासाठी स्वदेस फाउंडेशने   ग्रामविकास समितीसाठी डिजिटल स्वदेस अंतर्गत वेबिनार चे काल (दि.01 ऑगस्ट) रोजी आयोजन करण्यात आले होते.   यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पूरग्रस्तांना मदत करताना सार्वजनिक व वैयक्तिक आरोग्याच्या साधनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, पूरग्रस्तांना मदत करताना वैयक्तिक स्वच्छतेसाठी नेलकटर, कंगवा, सॅनिटरी नॅपकिन, मच्छर अगरबत्ती व मच्छर पासून बचाव करणाऱ्या वस्तूंचे आवश्‍यकतेनुसार वाटप करावे. ताप ,थंडी,उलट्या येत असल्यास 12 वर्षावरील सर्वांसाठी   डॉक्ससीसीलाइन, 12 वर्षाखालील मुलांसाठी अमोक्सिसिलिन, 5

कर्नाळा व फणसाड अभयारण्यात होणार पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ स्थानिक युवक-युवतींनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.1 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य व फणसाड अभयारण्य परिसरातील स्थानिक आदिवासी समाजातील बेराजगार युवक-युवतींना दि. 02 ते 06 जुलै 2011 रोजी राष्ट्रीय पातळीवरील गाईड निर्माण करणाऱ्या "आयआयटीटीएम" या भारत सरकार मान्यता प्राप्त संस्थेमार्फत प्रशिक्षण कार्यक्रम पनवेल येथील कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे आयोजित केला आहे.             या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी स्थानिक तरुण-तरुणींनी उत्तम प्रतिसाद द्यावा व पर्यटक मार्गदर्शक (गाईड)चे कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले आहे.   महाराष्ट्र हे पर्यटनदृष्ट्या संपन्न राज्य आहे. पर्यटनावर आधारित विविध उद्योगधंदे पर्यटनस्थळी व तीर्थक्षेत्र स्थळी विकसित होत आहेत. त्याचप्रमाणे पर्यटनस्थळी "तज्ञ पर्यटक मागर्दशक"(गाईड) हा उत्तम पर्याय विकसित होत आहे. स्थानिक पातळीवरील मार्गदर्शन विषयक ज्ञान, कौशल्य आत्मसात करुन त्याच्या सहाय्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, त्यासाठीचे कौशल्य आत्मसात