महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ताई ठाकरे यांनी दिली महाड-पोलादपूर येथील पूरग्रस्त भागास भेट महिलांना धान्य किट व सॅनिटरी नॅपकिन्स इ. साहित्य वाटप करून महिलांशी साधला संवाद

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.02(जिमाका):- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र शासन अंगीकृत) अध्यक्षा श्रीमती ज्योती ताई ठाकरे (राज्यमंत्री दर्जा) यांनी काल (दि.1 ऑगस्ट)  रोजी महाड  मधील नडगाव, भोराव तसेच पोलादपूर तालुक्यातील चरई सोनारवाडी, भोईवाडी, बौद्धवाडी आणि पोलादपूर बाजारपेठ येथील महिलांना धान्य किट व सॅनिटरी नॅपकिन्स इत्यादी साहित्य वाटप करून महिलांशी संवाद साधला.  

त्यांनी पूरग्रस्त भागास  प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महाड शहरातील राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान( NULM) अंतर्गत असलेल्या  महिला गटांतील महिलांना भेट दिली. तसेच माविम अंतर्गत येणाऱ्या प्रगती लोकसंचलीत साधन केंद्र-कर्जत, ओमसाई प्रेरणा ,अलिबाग CMRC नी मदतीसाठी कशा प्रकारे मदतकार्य केले, याचा आढावा घेतला.  NULM च्या शहरी भागातील  वस्ती स्तर संघांनी  महाड पूरग्रस्त कुटुंबांना कशा प्रकारे मदतीचा हात दिला, याची माहिती घेण्यात आली.  अशा प्रकारे माविम च्या महिलांनी पूरग्रस्तांना मदत करुन भगिनी भाव जोपासण्याचे कार्य केले. या संपूर्ण कार्यात ओम साई प्रेरणा CMRC अलिबाग यांच्या टीमने  मोलाचे सहकार्य केले.  संपूर्ण माविम टीम चे मोलाचे सहकार्य लाभले.   माविम मुख्यालय यांचेही या मदतकार्यासाठी  वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते, अशी माहिती  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहायक जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती वर्षा पाटील यांनी दिली.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक