Posts

Showing posts from May 12, 2024

गेल कंपनी उसर कंपनीकडून सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

    रायगड दि.16(जिमाका)   :-  गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून वेलवली ते उसर अशी सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वेलवली ते उसर कंपनीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दि.17 मे 2024  रोजी सकाळी 3.00 ते सकाळी 8.00   वाजेपर्यंत बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी  जारी केली आहे. यावेळी पर्यायी मार्ग म्हणून रोहा ते अलिबाग बाजूकडे येणाऱ्या सर्व वाहनांना वावेफाटा-चौलनाका-नागाव-सहाण बायपास मार्गे बेलकडे फाटा ते अलिबाग मार्ग तसेच अलिबाग ते रोहा बाजूकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना अलिबाग-बेलकडे फाटा-सहाण बायपास  मार्गे नागाव-चौलनाका- वावेफाटा मार्गे रोहा असे पर्यायी मार्ग आहेत. भारत सरकारच्या गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून  वेलवली  ते उसर अशी सेल (CARGO) चर्चा वाह तू क करण्याचे काम  Total Movements  Pvt. Ltd या कंपनीला मिळालेले आहे.  सेलची लांबी 10.20. रूंदी 5.97 मिटर व उंची 5.52 मिटर व लांबी 7.70 मिटर, रुंदी 5.97 मिटर व उंची 5.63 मिटर आहे. अलिबाग ते रोहा रस्ता रा.प.म.91 किलोमीटर 2/200 ते 14/00 दरम्यान उसर येथील गेल कंपनीपर्यंत या सेलची वाहतुक ही दि.17 मे 2024 र

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या पाली-सुधागड येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

      रायगड,दि.16(जिमाका):-  सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हे मधली आळी, राम मंदिर रोड तळ्याशेजारी ता.पाली-सुधागड, जि.रायगड येथे कार्यरत आहे. या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. अनु.जाती 80 टक्के, अनु.जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्र रेषेखालील कुटूबांतील विद्यार्थींनी 5 टक्के, विशेषमागास प्रवर्ग 2 टक्के, अनाथ 2 टक्के, अपंग 3 टक्के. या वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.  वसतिगृहात विद्यार्थींनींकरिता मोफत निवासव्यवस्था आहे. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक,उकडलेली दोन अंडी, सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच  भोजन व्यवस्थेमध्ये जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो. वसतिगृहात 8 वी ते 10 वी च्या प्रवेशितांना अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील  विनामुल्य पुरविले जाते. तसेच 11 वी पासू

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी इच्छुकांनी 10 जून पूर्वी अर्ज सादर करावेत

    रायगड,दि.15(जिमाका):-  सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्यात येणार असून प्रवेश घेवून इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दि.10 जून 2024 पूर्वी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण ता.पेण येथे सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले आहे.   या प्रवेशासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, पालकाने विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी, यासाठी मुलाच्या पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु.1 लाख इतकी असावी, इयत्ता 1 ली ते प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 6 वर्षे पूर्ण असावे, वय 31 डिसेंबर 2024 रोजी 6 वर्षे पूर्ण असावे, त्याचा जन्म 01 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 दरम्यान झालेला असावा, अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राम

समग्र शिक्षा अंतर्गत“मोफत पाठ्यपुस्तक”योजना पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन दिली जाणार

    रायगड,दि.15(जिमाका):-  जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका शाळा आणि खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करु नयेत. ही पाठ्यपुस्तके सर्व पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करुन दिली जातील, असे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी केले आहे. समग्र शिक्षा अंतर्गत इ. 01 ली ते इ. 08 वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तका अभावी शिक्षणात अडथळा येवू नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100  टक्के उपस्थिती टिकविणे,गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी शासनाने समग्र शिक्षा अंतर्गत "मोफत पाठ्यपुस्तक" ही योजना सुरु केली आहे. इ.01 ली ते इ. 08 वीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या 01 लाख 84 हजार 162 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके (एकात्मिक पुस्तक संच) शासनामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहेत. 0000000

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या अलिबाग येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

  रायगड,दि.15(जिमाका):-   सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थीनींकरिता मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, दिव्या अपार्टमेंट, यामाहा शोरुम, आर.सी.एफ.गेटसमोर, वेश्वी अलिबाग येथे कार्यरत आहे.              या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून गरीब, हुशार, होतकरू, मागासवर्गीय अनु.जाती 80 टक्के, अनु.जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्र रेषेखालील कुटूबांतील विद्यार्थींनी 5 टक्के, विशेषमागास प्रवर्ग 2 टक्के, अनाथ 2 टक्के, अपंग 3 टक्के यांना गुणवत्तेनसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थींनीकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा-दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक, उकडलेली दोन अंडी, सफरचंद, ऋतुमानानुसार एक फळ व दुध तसेच भोजन व्यवस्थेमध्ये जेवण (डाळ, भात, चपाती, भाजी/उसळ, लोणचे पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मांसाहार) देण्यात येते.                अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके शैक्षणिक व लेखन साहित्य देखील विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रू.600/- निर्वाहभत्ता दिला जातो. शाल