Posts

Showing posts from October 15, 2023

युवकांनी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे जिल्हयामध्ये 14 ठिकाणी उद्धाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
    रायगड (जिमाका) , दि. 19 :-  आगामी काळात जिल्ह्यात वाढत्या उद्योग क्षेत्रामुळे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे.  प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले.  महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हयातील  14  गावांमध्ये  प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यातील या केंद्रांचे उद्धाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे  झाले. यनिमित्ताने अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायत केंद्र येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व युवक यांच्याशी सवांद साधताना डॉ . म्हसे बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण ,  तहसिलदार विवेक पाटील ,  जिल्हा कौशल्य विकास ,  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार ,  शिक्षणाधिकारी श्रीमती पुनिता गुरव ,  जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे  तसेच विविध विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते.   ग

जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी प्रभावी कारवाईसाठी औषधे विक्रेत्यांनी दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य --जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

  रायगड (जिमाका) ,  दि. 19:-   जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे करण्याकरीता  औषधे विक्रेते यांनी दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.  मुलांमधील अंमली पदार्थाचा गैरवापर व अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला प्रतिबंध करण्यासाठी सर्व औषध विक्री दुकानांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन प्रभावीपणे परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जिल्हा कार्यक्षेत्राकरिता   “ फौजदारी प्रक्रीय संहिता ”   चे कलम  133  नुसार आदेश दिले आहेत. फौजदार प्रकीया संहिता  1973  चे कलम  133( ख)मध्ये  “ एखादा उदीम किंवा व्यवसाय चालवणे अथवा माल किंवा व्यापारी माल ठेवणे हे समाजाच्या आरोग्याला किंवा शरीरस्वास्थ्याला अपायकारक आहे आणि परिणामी असा उद्योग किंवा व्यवसाय याला मनाई करावयास हवी. असा माल किंवा व्यापारी माल हटविण्यास हवा अथवा त्यावर नियंत्रण घालण्यात आले आहे जिल्हा हद्दीतील सर्व औषधे विक्रेते दुकानदारांना सदर आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सद

जात प्रमाणपत्र पडताळणी त्रुटींच्या पूर्ततेसाठी शिबिराचे आयोजन अर्जदारांनी शिबिराचा लाभ घ्यावा,

    रायगड(जिमाका) ,  दि. 19 :- शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर प्रयोजनार्थ सादर जात वैधता प्रमाणपत्र प्रस्तावांच्या अनुषंगाने दि. 15  ते दि. 31  ऑक्टोबर  2023  या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत राज्यात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता  11  वी व  12  वी विज्ञान किंवा तंत्रनिकेतन (डिप्लोमा इंजिनिअरींग) या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी, शासकीय/निमशासकीय सेवेतील कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेले उमेदवार, इ. अर्जदारांनी दि.  30  सप्टेंबर  2023  पूर्वी समितीस दाखल केलेल्या अर्जांच्या बाबतीत ज्या अर्जदारांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, अशा अर्जदारांसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, 1402  अ,प्लॉट नं.  9 ,स.नं.  76 / 2  ब, सेंट मेरीज् कॉन्व्हेंट , स्कूल मागे, चेंढरे, अलिबाग येथे गुरुवार, दि. 26  ऑक्टोबर  2023  रोजी सकाळी  11  वाजता  जात प्रमाणपत्राची पडताळणी त्रुटीपूर्ततेसाठी शिबिर आयोजित करण्यात आले असून अर्जदारांन

सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक तसेच पोट निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

  रायगड (जिमाका) ,  दि. 18  :- जिल्ह्यातील  210  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व  40  रिक्त जागांच्या पोट निवडणूकांसाठी  5  नोव्हेंबर  2023  रोजी मतदान होणार असून  6  नोव्हेंबर  2023  रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोग ,  महाराष्ट्र यांनी जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणूका जाहिर झाल्यापासून निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी आदेश अंमलात राहील. जिल्हादंडाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता  1973  चे कलम  144  अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन कार्यवाहीचा एक भाग म्हणून निवडणूकीच्या कालावधीमध्ये शस्त्राचा गैरवापर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. अलिबाग ,  मुरुड ,  पेण ,  पनवेल ,  कर्जत ,  खालापूर ,  माणगांव ,  तळा ,  रोहा ,  सुधागड ,  महाड ,  पोलादपूर ,  श्रीवर्धन व म्हसळा या तालुक्यातील जिल्हा कार्यक्षेत्राच्या हद्दीतील (पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) बंदी करण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणूक तसेच पोट निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील परवानाधारकास शस्त्र अधिनियम  1959  चे कलम  21  व  2

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या वेळेत वाढ

    रायगड जिमाका दि.17 :  राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3 ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे ,  असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदांच्या ;  तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 05 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून 03 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आली होती. त्यानुसार नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती.  नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते ,  मात्र त्याची प्रिंट काढतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या उर्वरित 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीतील मुदत सकाळी 11 ते दुपारी 3 ऐवजी आ

जिल्हयातील 14 गावांमध्ये सुरु होणार प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे 19 ऑक्टोंबर रोजी उद्धाटन

  रायगड(जिमाका) , दि. 17 :-  ग्रामीण भागातील युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार/स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे आणि जिल्हयातील मनुष्यबळाला कौशल्यपूर्ण बनविणे यासाठी  14  गावांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. या केंद्रांचे उद्धाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे गुरुवार दि. 19  ऑक्टोंबर रोजी दुपारी  4.00  वाजता होणार आहे ,  या कार्यक्रमात जास्तीत जास्त युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम पूर्वतयारी बाबत बैठक झाली .  यावेळी उपजिल्हाधिकारी  ( सा . प्र .)  विठ्ठल इनामदार ,  जिल्हा कौशल्य विकास ,  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार यासह जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी व विविध शासकीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.  सन  2023 - 24  च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये वित्त मंत्री यांनी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य ,  रोजगार ,  उद्योजकता व नाविन्यता विभ

सामजिक न्याय व बहुजन कल्याण विभागाच्या महाविद्यालयीन शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांचे आवाहन

    रायगड (जिमाका) ,  दि. 16  :- सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज ,  इमात्र ,  विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी चालू शैक्षणिक वर्ष २०२३ २४ करिता नवीन आणि नूतनीकरणासाठी अर्ज करता येणार असून रायगड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना / विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन डॉ. योगेश म्हसे जिल्हाधिकारी रायगड यांनी केले आहे.  अर्ज विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर  https://mahadbtmahait.gov.in/ Home/Index   या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. सन  2018 - 19  या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टल या प्रणालीद्वारे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती. राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क ,  परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना ,  राजर्षी शाहू महाराज मॅट्रिकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजना राबविण्यात येतात. तरी योजनेच्या माहितीसाठी सहाय्यक आयुक्त ,  समाज कल्याण ,  रायगड-अलिबाग ,  कच्छि भवन ,  नमीनाथ मंदिराजवळ ,  सेंटमेरी स्कू

आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेनुसार उद्योग सुरु करण्यासाठीच्या बंधन शिथिल

    रायगड (जिमाका) ,  दि. 16  :-  आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्याला एक उत्पादन ठरवून दिले होते ,  त्या क्षेत्रातच नवा उद्योग सुरु करायचे बंधन आता शिथिल करण्यात आले आहे. हा बदल जिल्ह्यातील तरुण ,  तरुणी ,  बेरोजगार ,  महिला बचत गट आणि शेतकयांसाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रक्रिया उद्योग पापड ,  लोणचे ,  चटण्या ,  फरसाण ,  बेकरी ,  शेवया ,  दिवाळीचे पदार्थ ,  दुध आणि दुग्ध प्रक्रिया ,  फळ आणि भाजी प्रक्रिया ,  मासे सुखाविणे ,  शीतगृह ,  पोहा गिरणी ,  काजू प्रक्रिया ,  मसाले यांसारखे अनेक खाद्य प्रक्रीयेसंधार्भातले उद्योग सहभागी होऊ शकतात. आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत ( PMFME-PM Formulation of Micro Food Processing Enterprises Scheme)  सहभागी होण्यासाठी योजनेची वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 1 . ज्यांनी अगोदर दुसऱ्या योजनांमधून लाभ घेतला आहे ,  त्यांना सुद्धा लाभ घेता येणार. 2 . योजना शहरी आणि ग्रामीण अश्या दोन्ही स्तरावर हि कार्यान्वित करता येणार आहे. 3 . नवीन