जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी प्रभावी कारवाईसाठी औषधे विक्रेत्यांनी दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य --जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

 

रायगड (जिमाका)दि.19:- जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे करण्याकरीता  औषधे विक्रेते यांनी दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.  मुलांमधील अंमली पदार्थाचा गैरवापर व अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला प्रतिबंध करण्यासाठी सर्व औषध विक्री दुकानांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन प्रभावीपणे परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जिल्हा कार्यक्षेत्राकरिता  फौजदारी प्रक्रीय संहिता चे कलम 133 नुसार आदेश दिले आहेत.

फौजदार प्रकीया संहिता 1973 चे कलम 133(ख)मध्ये एखादा उदीम किंवा व्यवसाय चालवणे अथवा माल किंवा व्यापारी माल ठेवणे हे समाजाच्या आरोग्याला किंवा शरीरस्वास्थ्याला अपायकारक आहे आणि परिणामी असा उद्योग किंवा व्यवसाय याला मनाई करावयास हवी. असा माल किंवा व्यापारी माल हटविण्यास हवा अथवा त्यावर नियंत्रण घालण्यात आले आहे

जिल्हा हद्दीतील सर्व औषधे विक्रेते दुकानदारांना सदर आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सदर आदेशानुसार विक्री करणारे विक्रेते यांनी त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. जिल्हा औषध नियंत्रण विभागसी.डब्ल्यू.पी.ओ. विभागाने जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व औषध विक्रेते दुकानदारांना सीसीटिव्ही कॅमेरे लावणेत आले अगर नाही याबाबत पडताळणी करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. आदेश निर्गमित केलेल्या दिनांकापासून सर्व औषध विक्रेते दुकानदार यांनी एक महिन्याच्या आत सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत. जर मेडिकलफॉर्मसी दुकानदार यांनी सीसीटिव्ही कॅमेरा लावणेंत आलेला नाही,असे आढळून आल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईलअसे सदर आदेशाद्वारे निर्गमित केले आहे.

राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगनवी दिल्ली यांनी एक युद्ध नशे विरुद्ध व नशा मुक्त भारत या विषयाबाबत एकत्र कृती आराखडा तयार केला असून जिल्हानिहाय माहिती तातडीने देण्याबाबत सूचना केल्या होत्याया अनुषंगाने सदर आदेश दिले आहेत.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक