Posts

Showing posts from October 1, 2017

प्रधानमंत्री पिक विमा योजना: शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यास बॅंकांसाठी 14 पर्यंत मुदत

             अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)-   प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 मध्ये राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती संबंधित बँकांनी केंद्र शासनाच्या www.agri-insurance.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ 14 ऑक्टोंबर, 2017 पर्यंत सुरु राहणार असून त्यानंतर शेतकरी सहभागाची माहिती अपलोड करता येणार नाही. संकेतस्थळावर अपलोड झालेल्या शेतकरी सहभागाची माहिती फक्त केंद्र व राज्य शासनाचे विमा हप्ता अनुदान अदा करण्यास ग्राह्य धरले जाणार असून त्यानुसार संबंधित विमा कंपनीकडून सुध्दा नुकसान भरपाईसाठी विचारात घेतली जाणार आहे. तरी सर्व संबंधित बँकानी योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती 14 ऑक्टोंबर, 2017 पूर्वी संकेस्थळावर अपलोड करावी. असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  

आढावा बैठक:मार्च 18 अखेर 21 पुलांची कामे पूर्ण होणार-ना. प्रकाश महेता

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)-  रायगड जिल्ह्यातील 48 जुन्या पुलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून  त्यापैकी 21 पुलांची  दुरुस्ती, पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील 7 पुलांची कामे पूर्ण झाले असून  उर्वरित 14 कामे मार्च 2018 पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांनी आज येथे व्यक्त केला. ना.महेता यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांच्या प्रगतीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेवाळे,  महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता शेख, कार्यकारी अभियंता तपासे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे  अधिक्षक अभियंता मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक एस. नंदनवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक एम.एन. देवराज, सह

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 30 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.:-7   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 30.89मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3615. 42 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 08.00 मि.मि., पेण-25.02 मि.मि., मुरुड-35.00 मि.मि., पनवेल-04.20 मि.मि., उरण-07.00 मि.मि., कर्जत-18.80 मि.मि., खालापूर-31.00 मि.मि., माणगांव-38.00 मि.मि., रोहा-105.00 मि.मि., सुधागड-66.00 मि.मि., तळा-34.00 मि.मि., महाड-08.00 मि.मि., पोलादपूर-29.00, म्हसळा-50.20 मि.मि., श्रीवर्धन-07.00 मि.मि., माथेरान-28.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 494.22 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 30.89मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   115.04% इतकी आहे. 00000

कर्जत उपजिल्हारुग्णालयास सर्व सुविधांची पुर्तता करु- राज्यमंत्री ना. देशमुख

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.5 (जिमाका)- कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधांची पुर्तता करुन स्थानिक आदिवासी व अन्य दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे  प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आज कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयात आयोजित बैठकीत केले.             बैठकीला माजी आमदार देवेंद्र साटम, आरोग्य विभागाच्या उपसंचालिका श्रीमती रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन चव्हाण, डॉ.रामकृष्ण पाटील, विविध विभागाचे अधिकारी, स्थानिक नागरीक उपस्थित होते.             ना. देशमुख पुढे म्हणाले की, येथील रिक्त पदे भरुन कामकाजात सुसुत्रता आणणे, दुर्गम भागातील लोकांना वेळेवर उपचार सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याच्या एक्सरे मशिन सुस्थितीत ठेवण्याच्या, पुरेसा औषधसाठा ठेवणे, कोल्ड स्टोरेज सुसज्ज करणे, सर्पदंशाची लस 24 तास उपलब्ध करणे आदी सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. तत्पूर्

परिवहन विभागाचे कॉल सेंटर नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

            अलिबाग,जि. रायगड, दि.5 (जिमाका)-   परिवहन कार्यालयामध्ये विविध कामांसाठी ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या लोकांना येणाऱ्या अडीअडचणींचे शंकानिरसन होण्यासाठी  परिवहन विभागाने 24 तास सेवा उपलब्ध असणारे कॉल सेंटर सुरु केले आहे. त्याचा दूरध्वनी क्र.022-62426666 असा आहे. या कॉल सेंटर वरुन अनुज्ञप्ती, नोंदणी, परवाना तसेच सर्व नमुन्यांची माहिती, शुल्क इत्यादी बाबतची सर्व माहिती  देण्यात येईल.  कॉल सेंटरवर नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे व एफएक्यू ची प्रत देण्यात आली आहे.  जास्तीत जास्त नागरिकांनी  कॉल सेंटरचा वापर करुन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी केले आहे.      ०००००

जिल्हा बॅंक समन्वय समिती बैठक रोजगारनिर्मिती क्षेत्राचा पतपुरवठा वाढवा-जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.5 (जिमाका)-  विविध शासकीय योजनांअंतर्गत स्वयंरोजगार स्थापन करु इच्छिणाऱ्या व त्याद्वारे रोजगार निर्मितीस वाव असणाऱ्या क्षेत्राला बॅंकांनी पतपुरवठा वाढवावा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.  जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर, रिजर्व बॅंकेचे मोहन सांगवीकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी भोर, नाबार्डचे एस.एस.रंगवाथन,  जिल्हा अग्रणी बॅंक मॅनेजर ए. नंदनवार,  जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती एम.एन. देवराज,  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील, तसेच सेंट्रल बॅंकेचे पुनितकुमार,  पंजाब नॅशनल बॅंकेचे एस.आर.नलावडे, बॅंक ऑफ बडोदाचे के साई क्रिष्णन,  बॅंक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर  सी.के.पराते, ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक दयानंद कुंभार तसेच सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.             यावेळी जिल्ह्यातील बॅंकांचा शा

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड, दि.5 (जिमाका)- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते  हे दिनांक 7 व 8 ऑक्टोबर रोजी    रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - शनिवार दि.7 रोजी दुपारी एक वाजता महाड एमआयडीसी  येथे आगमन. दुपारी तीन वाजता महाड एमआयडीसी येथून जि.रत्नागिरीकडे प्रयाण. सायं. सहा वाजता रत्नागिरी येथून नागोठणे कडे प्रयाण. रात्री दहा वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेल, नागोठणे येथे आगमन व मुक्काम. रविवार दि.8 रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र सिमलेस सुकेल, नागोठणे येथून खोपोली कडे प्रयाण. दुपारी चार वाजता खोपोली येथे आगमन. सायं. सहा वाजता खोपोली येथून मुंबई कडे प्रयाण. ०००००

जिल्ह्यात मनाई आदेश जारी

अलिबाग,जि. रायगड, दि.5 (जिमाका)- रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात 16 ऑक्टोंबर, 2017 रोजी 213 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांकरीता मतदान होणार असून सदर निवडणूकीची मतमोजणी 17 ऑक्टोंबर, 2017 रोजी होणार आहे. या कालावधीत  जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून  5 ऑक्टोंबर, 2017 रोजीचे 8 वाजता पासून ते 18 ऑक्टोंबर, 2017 रोजी मध्यरात्री पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) प्रमाणे मनाई आदेश जारी केले आहेत. ०००००

महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.5 (जिमाका)- महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती निमित्ती जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमापुजन करुन अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीधर बोधे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी तहसिलदार (सामान्य) श्री.नाडेकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ०००००

आढावा बैठक प्रदूषणाबाबत उपाययोजना करतांना स्थानिक रहिवाशांचा सहभाग घ्या- ना.पोटे

Image
             अलिबाग, जि. रायगड,दि.3 (जिमाका)-   रासायनिक कंपन्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत उपाययोजना करताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश राज्याचे उद्योग व खनिकर्म, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री ना. प्रवीण पोटे यांनी आज येथे आयोजित आढावा बैठकीत दिले. ना. पोटे हे आज जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी त्यांच्या अखत्यारीतील विभागांची आढावा बैठक घेतली. शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे ही बैठक पार पडली. यावेळी सार्वजनिक बांधकाम, उद्योग, पर्यावरण, औद्योगिक विकास महामंडळ विभागांचा आढावा घेण्यात आला.             यावेळी अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण भवन, जी.एस.मोहिते, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल एस.एन. कांबळे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड विश्वनाथ सातपुते, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी डॉ.हर्षवर्धन जाधव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ रोहा चे उपअभियंता एम.एस.जाधव, महाव्यवस्थापक उद्योग केंद्राचे श्री.पाटील आदि   उपस्थित होते.       

लोकशाही दिनी तीन अर्ज दाखल

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.3 (जिमाका)-  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.  सोमवारी महात्मा गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने आज (मंगळवार,दि.3)  लोकशाही दिन आयोजित करण्यात आला.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर, अपर पोलीस अधिक्षक संजीव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे जिल्हा व्यवस्थापक नंदनवार तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते. यावेळी तीन जणांचे अर्ज सादर करण्यात आले. त्यात महसूल विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख  या कार्यालयांशी संबंधित प्रत्येकी एक याप्रमाणे तीन अर्ज सादर झाले.  तसेच यावेळी  विभागनिहाय प्रलंबित अर्जांचा आढावाही जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी घेतला.  सर्व अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले. ०००००

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 1.44मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.:-3   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.44मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3584. 53 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-03.00 मि.मि., पोलादपूर-20.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 23.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 1.44मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   115.82% इतकी आहे. 00000

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
                अलिबाग जि. रायगड,दि.२- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी   यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी   उपस्थित होते . 0000

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम

Image
             अलिबाग जि. रायगड, दि.२- महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण रायगड जिल्ह्यात महाराष्ट्राचे स्वच्छता दूत   डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत कार्यालयीन परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच पोलीस मुख्यालय,जिल्हा परिषद,जिल्हा न्यायालय,जिल्हा सामान्य   रुग्णालय,जिल्ह्यातील सर्व प्रांत,तहसील कार्यालय,विविध शासकीय कार्यालय,सर्व ग्रामपंचायती   समोरील परिसर श्री सदस्यांनी स्वच्छ केले .यात सरकारी अधिकारी , कर्मचारी यांनी सहभाग घेतला. 0000000

आंबेपुर येथे स्वच्छ पंधरवाड्याचा शुभारंभ

Image
               अलिबाग जि. रायगड, दि.२-मिशन अंत्योदय ग्राम समृद्धी व स्वच्छ पंधरवड्याचा (दि. १ ते १५ ऑक्टोबर) आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आंबेपुर येथे शुभारंभ करण्यात आला.              आंबेपुर ग्रामपंचायतीच्या वतीने को.ए. सो.ना.ना.पाटील शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात आयोजित समारंभात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.यावेळी आमदार सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, जि.प.उपाध्यक्ष आस्वाद पाटील,जि. प.सद्स्य श्रीमती चित्रा पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी   अभय यावलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे,आंबेपुर उपसरपंच सुनील राऊत,प्र. सभापती प्रकाश पाटील,जि. प.स.सद्स्य रचना   पाटील,पोयनाडचे पोलीस निरीक्षक श्री. शेवाळे, ना.ना.पाटील संकुलचे मुख्याध्यापक आर.के.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.              प्रथम मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शात्री यांच्या प्रतिमेस   पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.              यावेळी आ.पंडितशेट पाटील म्हणाले की, गांधीजींनी सांगितले की खेड्याकडे चला, याचा मी आदर करतो. आपले गाव आप

स्वच्छता हीच सेवा:किल्ले रायगडावर स्वच्छता अभियान स्वच्छता राखून जपा पावित्र्य- जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड, दि.१-रायगड किल्ल्यावर येणाऱ्या सर्व पर्यटकांनी किल्ल्यावर स्वच्छता राखून किल्ल्याचे पावित्र्य राखले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले."स्वच्छता हीच सेवा"  या उपक्रमातंर्गत रायगड किल्ल्यावर   आयोजित स्वच्छता अभियानाप्रसंगी ते बोलत होते. या अभियानाची सुरवात किल्ल्यावरील होळीचा माळ येथून झाली. यावेळी महाड प्रांत विठ्ठल इनामदार,महाड तहसीलदार चंद्रसेन पवार,पोलादपूर तहसीलदार शिवाजी जाधव,रायगड विकास आराखड्याचे सल्लागार राहुल समेळ,महाड नगर परिषदेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर किशोर शिंदे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला हा किल्ला स्वच्छ आणि पवित्र राखणे आपले कर्तव्य आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाने आपल्या नजरेस पडेल तो कचरा  गोळा करावा जेणेकरून किल्ला स्वच्छ राहील. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटक येथील स्वच्छतेचा आदर्श आपल्या सोबत घेऊन जातील. गडावर येणाऱ्या पर्यटकांनी आपल्या सोबतच्या पाणी पिण्याच्या बाटल्या सोबतच घेऊन