Posts

Showing posts from December 23, 2018

रायगड जिल्हा कृषि महोत्सव: प्रगतीशिल शेतकरी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29:- जिल्ह्यात अनेक प्रयोगशिल शेतकरी आहेत.   आपल्या शेताची प्रयोगशाळा करुन   हे शेतकरी आपली प्रगती साधत असतात.   अशा धडपडणाऱ्या   प्रगतीशिल शेतकऱ्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते सन्मानित करुन जिल्हा कृषि महोत्सवात प्रोत्साहित करण्यात आले. सन्मानित शेतकरी : श्री.निशिकांत नारायण ठाकूर, कोपर ता.अलिबाग.   सौ.नेत्रा समिर महागावंकर, भोईघर ता.मुरुङ   श्री.गजानन रमाकांत दळवी, तांबाटी ता.खालापूर. श्री.तुकाराम धर्मा फडके,मोठी भिंगारी ता.पनवेल.   श्री.चंद्रकांत शिवाजी कडव, भानसोली ता.कर्जत.   श्री.संदिप गणपत मोरे, कुंभे ता.कर्जत.   श्री.अनंता वाळकु ठाकरे, वावे ता.कर्जत.   श्री.मोरेश्वर हशा थळी, नागाव ता.उरण.    श्री.भास्कर रामभाऊ गावडे, रानवडे ता.माणगाव.   श्री.रविंद्र मोतीराम तपकिर, नगरोली ता.माणगाव.   श्री.विलास राघो हर्नेकर, कोशिंबळे ता.माणगाव.   श्री.अनंत नारायण चाळके, बेलघर ता.तळा.    श्री.अमोल सुरेश मापुस्कर, आदगाव ता.श्रीवर्धन.   श्री.मनोहर नाना जाधव, चाळीचा कोंड ता.पोलादपूर.   श्री.गणेश खांबे, चांभारखिंड ता.महाङ   00000

गोवर रुबेला लसीकरण मोहिम: जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 41 हजार बालकांना लसीकरण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात रायगड जिल्ह्यात बुधवार (दि.28 डिसेंबर) अखेर जिल्ह्यातील 5 लाख 41 हजार 336  बालकांना लसीकरण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (गुरुवार दि.28) दिवसाअखेर जिल्ह्यातील 117 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 17 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 1189 विद्यार्थ्यांना तर 38 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 6 हजार 389 विद्यार्थ्यांना अशा एकूण 7 हजार 578 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात 4 हजार 45 मुले व 3 हजार 533 मुलींचा समावेश आहे.   तर मोहिम सुरु झाल्यापासून आज अखेर एकूण 2 लाख 81 हजार 33 मुले   व 2 लाख 60   हजार 303 मुली असे एकूण 5 लाख 41 हजार 336 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी   माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी   डॉ.सचिन देसाई यांनी दिली आहे.   या अभियान

लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..! बुधवारी ‘लोकसंवाद’

मोबाईल , लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणार मुंबई ,   दि. 2 9 : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ ,   त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   ‘ लोक संवाद ’   साधून जाणून घेणार आहेत. बुधवार दि. 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट लाईव्ह संवाद मोबाईल , संगणक , टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे. हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या   devendra.fadnavis   या फेसबुक पेजवर , Dev Fadnavis   या ट्विटर हॅण्डलवर आणि   Devendra.Fadanavis   या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या   facebook.com/MahaDGIPR   या फेसबुक पेज आणि   youtube.com/maharashtradgipr   यु ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी व ग्रामीण) ,   उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना ,   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना , प

आगामी लोकसभा निवडणूक पूर्वतयारी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29:- आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूयवंशी यांनी आज जिल्हा निवडणूक यंत्रणेतील सहायक निवडणूक अधिकारी, तसेच विविध समिती प्रमुखांच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,   उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने, उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र मठपती, उपविभागीय अधिकारी अलिबाग शारदा पोवार, उपविभागीय अधिकारी पेण प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय अधिकारी महाड विठ्ठल इमानदार आदी सर्व अधिकारी, तहसिलदार व निवडणूक यंत्रणेतील नोडल अधिकारी उपस्थित होते.   यावेळी मतदार यादी अद्यावतीकरण, तसेच निवडणूक पूर्वतयारी व ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राबाबत केली जात असलेली जनजागृती याबाबत आढावा घेण्यात आला. मयत मतदारांच्या नावांची पडताळणी करुन ते वगळणे, मतदार यादीतील छायाचित्र दर्जा व फोटो जुळणी, दिव्यांग मतदार नोंदणी याबाबत आढावा घेण्यात आला. निवडणूक विषयक     कामे यंत्रणेने दक्षता ठेवून व विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत असे निर्देश

रायगड जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटनः तरुणांनो,शेतकरी व्हा आणि आदर्श निर्माण करा- पालकमंत्री ना. चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28:- शेती आणि मत्स्य शेतीत आर्थिक सुबत्तेची ताकद आहे, त्यामुळे रोजगारासाठी युवकांनी शहराकडे न वळता तंत्रज्ञानाची जोड घेऊन शेतीचा विकास करून शेतकरी व्हा आणि लोकांसमोर आदर्श निर्माण करा, असे आवाहन राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज खांदेश्वर ता. पनवेल येथे केले. रायगड जिल्ह्याचा कृषि महोत्सव दिनांक 28 ते 31 डिसेंबर या कालावधी त खांदेश्वर रेल्वे स्टेशन , सेक्टर क्र. 29, कामोठे , ता. पनवेल , जि. रायगड येथे आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचे उद्घाटन आज पालकमंत्री ना. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. या उद्घाटन सोहळ्यास सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक डॉ.अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका हेमलता म्हात्रे, संतोषी तुपे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, कोकण विभाग कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनि

तटीय नियमन क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी निधीबाबत न्यायालयास विनंती केलेली नाही- जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28:- मा.उच्च न्यायालय मुंबई येथे दि.20 रोजी येथील जनहित याचिका क्रमांक 107/2009 च्या सुनावणीच्या वेळी दाखल केलेल्या शपथपत्रात अलिबाग तालुक्यातील तटीय नियमन क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी निधी देण्याबाबत  महाराष्ट्र शासनाला निर्देश द्यावेत,अशी विनंती मा. न्यायालयास केलेली नाही, असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जनहित याचिका क्रमांक 107/2009 च्या सुनावणीच्या अनुषंगाने सदर अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांना निधी देण्याबाबत शासनास निर्देश द्यावेत,असे शपथपत्र दाखल केल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यासंदर्भात खुलासा देतांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणतात की. सदर जनहित याचिकेसंदर्भात दि.20 रोजी सुनावणी मुंबई येथे होती. त्यावेळी जिल्हाधिकारी रायगड यांनी शपथपत्र दाखल केले, तथापि या शपथपत्रात अलिबाग तालुक्यातील तटीय नियमन क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आवश्यक निधी देण्याबाबत महाराष्ट्र शासनास निर्देश देण्याबाबत   मा. न्यायालयास विनंती करण्यात आलेली नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यव

ईव्हिएम, व्हीव्हीपॅट यंत्र वापर व जनजागृतीसाठी पथक रवाना

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28:- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणकीसाठी एम-3 बनावटीचे ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हीव्हीपॅट (VVPAT: Voter Verified Paper Audit Trail) मशीन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून  या मशिन वापराबाबत व त्यासंदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून  जिल्ह्यात गुरुवार दि.27 पासून जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाअंतर्गत अलिबाग तालुक्यासाठी तयार करण्यात आलेले पथक आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रचार व जनजागृतीसाठी रवाना झाले. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने,   अलिबाग उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, महाड उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार तसेच विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते. या जनजागृती उपक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व आपल्या मनातील शंकांचे निरसन करुन मतदान यंत्रावरील मतदानाचे प्रात्यक्षिक व सराव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. वि

दर्जेदार सेवा हा ग्राहकांचा हक्क-विजयशेवाळे

Image
अलिबाग,जि.रायगड,दि.27(जिमाका)- ग्राहकांना चांगल्या व दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी ग्राहकांच्या हितासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी हा त्यांचा हक्कआहे. यासाठी त्यांच्या तक्रारींचे निराकरण होणे आवश्यक असून त्यासाठी ग्राहक चळवळीतील शासकीय व अशासकिय सदस्यांनी प्रभावीपणे काम करण्याची गरजआहे,असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष विजय शेवाळे यांनी केले.   राष्ट्रीय ग्राहक दिन येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने आज साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबूडे, उल्का पावसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे, सहा जिल्हा   पुरवठा अधिकारी सु रेंद्र ठाकूर, नायब तहसीलदार तथा प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी संदीप पाणमंद,   अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त   दिलीप संगत, वैद्यमापन शास्त्र सहाय्यक नियंत्रक सिताराम कदम, पुरवठाअधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून सत्यवान कांबळेआदीउपस्थितहोते. यावेळी शेवाळे यांनी सांगितले की,   अन्न औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त तक्रारांची संख्या मोठ्या प्रमाणात

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे   शुक्रवार दि.28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- शुक्रवार दि.28 रोजी दुपारी तीन वा. रायगड जिल्हा कृषि महोत्सव 2018-19 उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ : सेक्टर 29,सिडको मैदान, खांदेश्वर रेल्वे स्टेशनजवळ.   चार वा. खांदेश्वर येथून पलावा, डोंबिवलीकडे प्रयाण. 00000

वंचित गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी निधी उपलब्धता करु- पालकमंत्री ना. चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27:- वाशी खारेपाट विभागात मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम होत असल्याने या परिसरातील नागरिकांना पिण्याचा पाण्याचा मुबलक व नियमित पुरवठा होईल. या परिसरातील काही गावे या योजनेपासून वंचित असतील तर अशा वंचित गावांपर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जादा निधीची उपलब्धता करु, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज वाशी ता. पेण येथे केले. खारेपाट विभागाच्या हेटवणे-शहापाडा-वाशी येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून होणाऱ्या नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ ना. चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. वाशी ता.पेण येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर,पेण च्या नगराध्यक्ष श्रीमती प्रितम पाटील, वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच वरक पाटील, वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल, जिल्हा नियोजन समि

गोवर रुबेला लसीकरण मोहिमः जिल्ह्यात 5 लाख 25 हजार बालकांना लसीकरण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.27- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  दरम्यान मंगळवार (दि.27 नोव्हेंबर) ते बुधवार (दि.26 डिसेंबर) अखेर या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 5 लाख 25 हजार 536 बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. या अभियानात रायगड जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 7 लाख 93 हजार 451 बालकांना या लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार बुधवार दि.26 डिसेंबर रोजी दिवसअखेर   जिल्ह्यातील 68 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 17 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 1 हजार 357 विद्यार्थ्यांना तर 51 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 8हजार 861 विद्यार्थ्यांना अशा एकूण 10 हजार 218 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तर आज अखेर एकूण 2 लाख 72 हजार 715 मुले   व 2 लाख 52 हजार 821 मुली   असे एकूण 5 लाख 25 हजार 536 विद्यार्थ्यांना ल

पत्रपरिषद : उद्यापासून (दि.28 डिसेंबर) कामोठे येथे रायगड जिल्हा कृषि महोत्सव

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.26:- रायगड जिल्ह्याचा कृषि महोत्सव दिनांक 28 ते 31 डिसेंबर या कालावधी त खांदेश्वर रेल्वे स्टेशन , सेक्टर क्र. 29, कामोठे , ता. पनवेल , जि. रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे , अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक पांडुरंग शेळके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रायगड जिल्हा कृषि महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व आत्मा प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे   यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माहिती देण्यात आली कि, बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कृषि विस्ताराला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपआपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दींगत होऊ शकतो. आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थीक दृष्ट्या उन्नत होऊन जागतीक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिद्ध कर