आगामी लोकसभा निवडणूक पूर्वतयारी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29:- आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूयवंशी यांनी आज जिल्हा निवडणूक यंत्रणेतील सहायक निवडणूक अधिकारी, तसेच विविध समिती प्रमुखांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,  उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने, उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र मठपती, उपविभागीय अधिकारी अलिबाग शारदा पोवार, उपविभागीय अधिकारी पेण प्रतिमा पुदलवाड, उपविभागीय अधिकारी महाड विठ्ठल इमानदार आदी सर्व अधिकारी, तहसिलदार व निवडणूक यंत्रणेतील नोडल अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी मतदार यादी अद्यावतीकरण, तसेच निवडणूक पूर्वतयारी व ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राबाबत केली जात असलेली जनजागृती याबाबत आढावा घेण्यात आला. मयत मतदारांच्या नावांची पडताळणी करुन ते वगळणे, मतदार यादीतील छायाचित्र दर्जा व फोटो जुळणी, दिव्यांग मतदार नोंदणी याबाबत आढावा घेण्यात आला. निवडणूक विषयक   कामे यंत्रणेने दक्षता ठेवून व विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक