Posts

Showing posts from March 4, 2018

पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सारथी 4.0 प्रणाली कार्यान्वित

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण,जि.रायगड कार्यालयांतर्गत असलेल्या पेण,अलिबाग,मुरुड,महाड,पोलादपूर,तळा,श्रीवर्धन,म्हसळा, रोहा, माणगांव, सुधागड पाली, तालुक्यातील अनुज्ञप्तीधारक (लायसन्सधारक)यांच्यासाठी   त्यांची कामे ऑनलाईन करता यावीत म्हणून मार्च 2017 पासून कार्यालयात सारथी 4.0 संगणकप्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे परिवहन विभागाच्या विविध सेवांचे शुल्क् तसेच कर ऑनलाईन भरता येणार आहेत. मार्च 2018 पासून आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स आणि कंडक्टर लायसन्स् हे सारथी 4.0 ऑनलाईन प्रणालीवर सुरु करण्यात आली आहे तरी सर्व कंटक्टर लायसन्स धारकांनी आपले लायसन्स ऑनलाईन सारथी 4.0 या प्रणालीवर नवीन अनुज्ञप्ती,नुतनीकरण व दुय्यम प्रतसाठी रकमेचा ऑनलाईन भरणा करुनच आपले कंडक्टर लायसन्स व आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स मिळवावेत. मार्च-2017 पासून सारथीविषयक अनुज्ञप्तीचे पत्ताबदल,ना-हरकत दाखला इत्यादी सेवा सारथी 4.0 प्रणालीवर सुरु करण्यात आली आहे. तरी सर्व अनुज्ञप्ती धारकांनी ज्यांची अनुज्ञप्ती (Licence) हस्त् लिखित स्वरुपात आहेत, त्यांनी प्रथम

माहितीचा अधिकार अंतर्गत कोषागार कार्यालयांची ऑनलाईन सुविधा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड अलिबाग तसेच अधिनस्त उपकोषागार कार्यालयासंबंधीचे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त होणाऱ्या सविस्तर माहितीसाठी शासनाने Online RTI ही सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेले आहे. तरी जिल्हा कोषागार कार्यालय तसेच अधिनस्त उपकोषागार कार्यालयासंबंधीची अधिक माहितीसाठी https://rtionline.maharashtra.gov.in .   या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड अलिबाग यांनी केले आहे. ०००००

वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- राज्याचे गृह(ग्रामीण), वित्त व नियोजन   विभागाचे राज्यमंत्री ना. डीपक केसरकर हे रविवार दि.11 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे - रविवार दि. 11 रोजी पहाटे दोन वा. माणगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह माणगावकडे प्रयाण.   पहाटे सव्वा दोन वाजता माणगाव शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. माणगाव येथून मोटारीने महाडकडे प्रयाण. साडेदहा वा. शासकीय विश्रामगृह महाड येथे आगमन व राखीव.   सकाळी 11 वा. क्रांतीदिनानिमित्त चवदार तळे व क्रांतीस्तंभ पाहणी.   दुपारी 12 वा. महाड क्रांतीदिना निमित्त पूर्व तयारीबाबत बैठक, दुपारी एक वाजता महाड क्रांतीदिनानिमित्त कायदा व सुरक्षा संदर्भात बैठक. (स्थळ:डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महाड). सोईनुसार महाड येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण किंवा धरमतर जेट्टी ता. पेण कडे प्रयाण. ०००००

पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10:- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे   रविवार, दि.11 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- रविवार दि.11 रोजी सकाळी 11 वा. महाड येथे आगमन व   क्रांती दिनानिमित्त चवदार तळे व क्रांतीस्तंभ पाहणी.   दुपारी 12 वा.   महाड क्रांतीदिना निमित्त पूर्व तयारीबाबत बैठक, तसेच   दुपारी एक वा. महाड क्रांतीदिनानिमित्त कायदा व सुरक्षा संदर्भात बैठक. (स्थळ:डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महाड). दुपारी दोन वाजता श्री.रवि कुलकर्णी, महाड यांच्या निवासस्थानी भेट. सायं.चार वाजता महाड येथून गोरेगांव, ता.माणगांवकडे प्रयाण. सायं. सहा वाजता गोरेगांव,ता.माणगांव येथे आगमन व पद्मश्री पुरस्कार सन्मानीत श्री. मनोज जोशी यांच्या नागरी सत्कार समारंभास उपस्थिती. स्थळ: जिजामाता मैदान, गोरेगांव, ता.माणगांव जि.रायगड. सायंकाळी साडेसात वाजता गोरेगांव, ता. माणगांव येथून पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण. ०००००

राष्ट्रीय चक्रीवादळ धोकेनिवारण प्रकल्प: भूमिगत विद्युत प्रणाली प्रकल्प अंमलबजावणी: अलिबागचे होणार आपत्तीपासून रक्षण आणि सौंदर्यीकरणात भर: सार्वजनिक चर्चासत्रात सर्व यंत्रणांचा व लोकप्रतिनिधींचा सहभाग

Image
अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.10- अलिबाग शहरात 79 कोटी रुपये खर्चून भुमिगत विद्युत वितरण प्रणाली प्रकल्प अंमलबजावणी होणार असून   यामुळे अलिबाग व परिसराचे आपत्तीपासून रक्षण होतांनाच शहराच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय चक्रीवादळ धोकेनिवारण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी आजच्या सार्वजनिक चर्चासत्रात दिली.   जागतिक   बॅंक, केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोकेनिवारण प्रकल्प अंतर्गत अलिबाग शहर व संलग्न गावांत भूमिगत विद्युत प्रणाली   प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याप्रकल्पाची माहिती सर्व संबंधित समाज घटकांना व्हावी यासाठी   जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रास   अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, राष्ट्रीय चक्रीवादळ धोकेनिवारण प्रकल्पाचे सी.आर. मिश्रा, पर्यावरण तज्ज्ञ राजेश सोनुने, महावितरणचे   कार्यकारी अभियंता माणिकराव तपासे,   वरसोली चे सरपंच मिलिंद कवळे, वाहतुक पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे,   आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागरकुमार पाठक, तसेच सामा

दिव्यांगांच्या उन्नतीसाठी सर्व समाजघटकांचे प्रयत्न आवश्यक-राज्य अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांचे प्रतिपादन

Image
अलिबाग जि.रायगड (जिमाका) दि.9- दिव्यांगांच्या उन्नतीसाठी समाजातील सर्व घटकांनी संघटित पणे प्रयत्न व जनजागृती करावी असे प्रतिपादन   अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी केले.   रायगड जिल्हा परिषद,अपंग कल्याण आयुक्तालय पुणे व सुहित जीवन ट्रस्ट पेण यांच्या संयुक्त विद्यमाने   दिव्यांगांचे त्वरित निदान, हस्तक्षेप व पुनर्वसन जनजागृती एकदिवशी कार्यशाळा सी सॉम फार्महाऊस पेण येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले.   कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नारायण डांबसे, पेण पंचायत समितीच्या सभापती स्मिता पेणकर , उपसभापती शैलेश पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ॲड.निलिमा पाटील, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, तहसिलदार अजय पाटणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील, जि.प. चे समाज कल्याण अधिकारी गजानन लेंडी, डॉ.अश्विनी वैशंपायन, किशोर वेखंडे, वासंती देव आदि उपस्थित होते.               यावेळी नितीन पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेने तीन टक्के निधी

जिल्हास्तरीय मुद्रा बँक समिती बैठक जनजागृतीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
अलिबाग जि.रायगड (जिमाका) दि.9- अर्थसहाय्य देऊन लहान व्यवसाय उद्योगांच्या उभारणीला चालना देणे या हेतूने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजना सुरु केली आहे. रायगड जिल्ह्यात या योजने अंतर्गत आधिकाधिक तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळविण्यासाठी योजने संदर्भातील जनजागृतीवर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे केले. जिल्हास्तरीय मुद्रा बँक समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. जिल्हाधिकारी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ए.एम.नंदनवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, समितीचे अशासकीय सदस्य सतिश धारप, कल्पना दास्ताने, मिलिंद पाटील, अक्षय ताडफळे, नितीन कांदळगावकर, कल्पना राऊत, राजेंद्र राऊत तसेच जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी रामदास बघे, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी व्यवस्थापक बी.आर.पाटील, संजय वर्तक आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी म्हणाले की, बँकेच्या अधिकाऱ्यांसाठी मुद्रा योजने संदर्भात उद्बोधन वर्ग आयोजीत करणे, उत्तम कामगिरी केलेल्या अधिका

जागतिक महिला दिन कार्यक्रम : मतदानातही महिलांनी सहभाग वाढवावा निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:- लोकशाही बळकट करण्यासाठी महिलांनी मतदानात जास्तीत जास्त सहभाग द्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी आज केले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 8 मार्च महिला दिना निमित्त महिला मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व तहसिल कार्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती. लता गुरव, अलिबाग तहसिलदार  प्रकाश संकपाळ, निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती. सुरेखा घुगे,  जिल्हा युथ आय कॉन तपस्वी गोंधळी, दयानंद देसाई व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मतदानाचा हक्क साऱ्यांनीच बजावलाच पाहिजे, मतदानाची आकडेवारी जास्तीत जास्त कशी वाढेल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगून श्री.पाणबुडे यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अलिबाग तहसिलदार  प्रकाश संकपाळ, जिल्हा युथ आयकोन श्रीमती. तपस्वी गोंधळी जिल्हाधिकारी कार्यालयातील श्रीमती दर्शना पाटील यांनीही मार्गदर्शन केले. श्री. पाणबुडे यांच्या हस्ते महिलांना मतदा

दि.9 मार्च रोजी : दिव्यांगासाठी उद्या पेण येथे कार्यशाळा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7 -रायगड जिल्हा परिषद व सुहित जीवन ट्रस्ट पेण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 मार्च रोजी पेण येथे दिव्यांगासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे हे उपस्थित राहाणार आहेत.  प्रशिक्षण व कार्यशाळेचे ठिकाण -वनगे हॉल, पेण खोपोली बायपास रोड, पेण जि.रायगड. वेळ सकाळी दहा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत तसेच दुपारी दोन वाजता भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.  तरी दिव्यांगांच्या योजनासंबंधी माहिती जास्तीत जास्त जनतेला व्हावी. यासाठी या कार्यशाळेस आपण उपस्थित राहावे,असे आवाहन जगन्नाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग रायगड   यांनी केले आहे. 0000

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प : अलिबाग भुमिगत विद्युत प्रणालीबाबत शनिवारी सार्वजनिक सभा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7 - राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत अलिबाग शहरात भूमिगत विद्युत प्रणाली राबविण्यात येणार आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधी व विविध समाजघटकांना माहिती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार दि. 10 रोजी सकाळी 11.00 वाजता सार्वजनिक सभा बोलावण्यात आली आहे. याबाबत जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार जागतिक बँक व भारत सरकार अर्थ सहायित राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत अलिबाग शहरातील सध्याची कार्यरत विद्युत प्रणाली भूमिगत करण्याच्या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी पुढील काही दिवसात करण्यात येणार असून  या प्रकल्पाची माहिती नागरिकांना व्हावी, तसेच या योजनेची अंमलबजावणी करतांना रहिवाशांना, व्यावसायिकांना तसेच सामान्य जनतेला होणारे अडथळे,गैरसोई इ.बाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी शनिवार  दिनांक  10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.             या सभेसाठी सर्व लोकप्रतिनिधी तसेच अलिबाग शहरातील सर्व कार्यालयांचे प्र

केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7:- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे शनिवार दिनांक 10 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. शनिवार दिनांक 10 रोजी सकाळी साडे नऊ वाजता  मुंबई येथून इंदापूर ता.माणगांव जि. रायगडकडे प्रयाण. दुपारी एक वाजता इंदापूर येथे आगमन.सायंकाळी सहा वाजता  इंदापूर जि. रायगडहून मुंबईकडे प्रयाण. 0000

मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी शुक्रवारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- रायगड जिल्ह्यातील पथक,उपपथकामधील पुरुष,महिला मानसेवी होमगार्डची सदस्य नोंदणी शुक्रवार दि.9 मार्च रोजी पोलीस कवायत मैदान, रायगड अलिबाग येथे सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा यावेळात घेण्यात येणार आहे, असे जिल्हा होमगार्ड समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील यांनी कळविले आहे. त्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे- शिक्षणी कमीत कमी दहावी उत्तीर्ण, वय-20 ते 50 वर्षे, उंची महिलांकरीता 150 से.मी. व पुरुषांकरिता 162 से.मी. आणि छाती 76 सें.मी. फुगवून 81 सें.मी. तसेच उमेदवारास विहित केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारिरीक चाचणी द्यावी लागेल.पात्र उमेदवार हे वेतनी सेवेत असतील तर त्यांना वेतनी सेवेत असल्यास कार्यालयाचे अथवा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र,पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल व सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक व इतर अन्य तपशीलाच्या पुष्ट्यर्थ सर्व संबंधीत मुळ प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.उमेदवारास नोंदणीचेवेळी त्यांना स्वखर्चाने यावे लागेल व दोन पासपोर्ट साईज फोटो तस

पेण येथे शुक्रवारी दिव्यांगासाठी कार्यशाळा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6 - रायगड जिल्हा परिषद व सुहित जीवन ट्रस्ट पेण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.9 रोजी पेण येथे दिव्यांगासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे हे उपस्थित राहाणार आहेत. सदर कार्यशाळा -वनगे हॉल,पेण खोपोली बायपास रोड, पेण जि.रायगड. येथे सकाळी दहा ते दुपारी साडेचार  यावेळात होणार आहे.  या कार्यशाळेत दिव्यांगांच्या योजनासंबंधी माहिती सहभागींना दिली जाणार आहे. या कार्यशाळेस उपस्थित राहावे,असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले आहे. ०००००

आपले सरकार सेवा केंद्र: स्थापनेसाठी प्रस्ताव मागविले; 31 मार्च पर्यंत मुदत

अलिबाग,जि.रायगड (जिमाका) दि.6:-   शहरी व ग्रामीण भागात लोकसंख्येच्या प्रमाणात रिक्त जागी आपले सरकार सेवा केंद्र माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या दि.19 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. त्या बाबत रिक्त जागांविषयीची माहिती www.raigad.nic.in या संकेत स्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी इच्छुक स्थानिक उमेदवाराने जिल्हाधिकारी कार्यालायत अर्ज करावा. अर्ज सादर करण्यासाठी 31 मार्च 2018 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करताना सादर करावयाची कागदपत्रे- विनंती अर्ज, सेवा केंद्र स्थापनेच्या जागेचा भाडे करार अथवा स्वत:चा असेल तर त्या बाबतचा पुरावा, आधार कार्ड झेरॉक्स, शैक्षणिक किमान अर्हता 12 वी पास चे प्रमाणपत्र, संगणकीय ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आपण देत असलेल्या B2C सेवांचा मागील सहा महिन्यांचा तपशील., तरी रायगड जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र सुरु करु इच्छिणाऱ्या व्यक्तिंनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावेत, असे आवाहन सामान्य शाखेचे तहसिलदार के. डी. नाडेकर यांनी केले आहे. 000000

लोकशाही दि: तक्रारींचे निराकरण वेळीच करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे निर्देश

Image
         अलिबाग,जि. रायगड दि.5-   लोकशाही दिन, आपले सरकार वेब पोर्टल या सारख्या अधिकृत व्यासपीठावर सामान्य जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे वेळीच निराकरण करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी कटाक्षाने प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,    अपर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) चंद्रकांत वाघमारे आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी    लोकशाही दिनानिमित्त आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. तसेच आपले सरकार या वेवपोर्टलवर जिल्ह्यातून झालेल्या तक्रारींचाही आढावा घेतला. ज्या ज्या विभागाशी संबंधित तक्रार असेल त्या विभागाने तात्काळ त्या तक्रारीची दखल घ्यावी व पुर्तता करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.   लोकशाही दिनात आज एकूण 6 अर्

पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते रस्ते कामांचा शुभारंभ

Image
अलिबाग, जि. रायगड(जिमाका)  दि.४ :- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण,माहीती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते तळा तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर झालेल्या रस्त्यांचे भुमिपुजन व जिल्हा नियोजन मंडळातुन विविध मंजुर झालेल्या विकासकामांचे भुमिपुजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्ष अदितीताई तटकरे,आमदार प्रशांत ठाकुर, नगराध्यक्ष सौ.रेश्मा मुंढे, कृष्णा कोबनाक,सतिश धारप, रवी मुंढे,मिलींद पाटील, प्रांताधिकारी बाळासाहेब तिडके,प्रभारी तहसीलदार श्री.वसावे,तळा पोलीस निरीक्षक संजय साबळे,  गटविकास अधिकारी व्ही.व्ही यादव आदी उपस्थित होते.             प्रारंभी सोनसडे येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भुमिपुजन करण्यात आले . याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता शहराला जोडून दळणवळण सुकर होण्यासाठी ही योजना राबविली जात आहे .                                             आ.प्रशांत ठाकुर यांनी आपल्या मनोगतात  विविध विकासकामांची माहीती यावेळी दिली. यावेळ