पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सारथी 4.0 प्रणाली कार्यान्वित



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,पेण,जि.रायगड कार्यालयांतर्गत असलेल्या पेण,अलिबाग,मुरुड,महाड,पोलादपूर,तळा,श्रीवर्धन,म्हसळा, रोहा, माणगांव, सुधागड पाली, तालुक्यातील अनुज्ञप्तीधारक (लायसन्सधारक)यांच्यासाठी  त्यांची कामे ऑनलाईन करता यावीत म्हणून मार्च 2017 पासून कार्यालयात सारथी 4.0 संगणकप्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे परिवहन विभागाच्या विविध सेवांचे शुल्क् तसेच कर ऑनलाईन भरता येणार आहेत.
मार्च 2018 पासून आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स आणि कंडक्टर लायसन्स् हे सारथी 4.0 ऑनलाईन प्रणालीवर सुरु करण्यात आली आहे तरी सर्व कंटक्टर लायसन्स धारकांनी आपले लायसन्स ऑनलाईन सारथी 4.0 या प्रणालीवर नवीन अनुज्ञप्ती,नुतनीकरण व दुय्यम प्रतसाठी रकमेचा ऑनलाईन भरणा करुनच आपले कंडक्टर लायसन्स व आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स मिळवावेत.
मार्च-2017 पासून सारथीविषयक अनुज्ञप्तीचे पत्ताबदल,ना-हरकत दाखला इत्यादी सेवा सारथी 4.0 प्रणालीवर सुरु करण्यात आली आहे. तरी सर्व अनुज्ञप्ती धारकांनी ज्यांची अनुज्ञप्ती (Licence) हस्त् लिखित स्वरुपात आहेत, त्यांनी प्रथम कार्यालयात येऊन अनुज्ञप्तीची सर्व वैध कागदपत्रे,आधार क्रमांक,पॅन क्रमांक,मोबाईल क्रमांक इ. तपशीलासह सारथी 4.0 प्रणालीवर अनुज्ञप्तीची नोंद करावी. जेणे करुन अनुज्ञप्तीचे पुढील सर्व कामकाज ऑनलाईन सारथी 4.0 प्रणालीवर करता येईल.असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,पेण जि.रायगड यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक