Posts

Showing posts from October 18, 2020

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त मात्र पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांनी गुगल लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरावेत

  अलिबाग, जि.रायगड, दि.22(जिमाका) : - ऑक्टोबर 2020 मध्ये रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित शासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.                  अदयापही शासकीय यंत्रणा पंचनामा करण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचली नसेल, तर संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी   https://docs.google.com/ forms/d/1W944r3a8eXfK_ H8V8zEiOhl7vLDHr8I4pvqLm93BJL0 /edit    या गुगल लिंकवर नुकसानीचा अर्ज भरावा, तसेच ज्यांचे नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, त्यांनीच हा अर्ज भरावा, याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.   000000  

जिल्ह्यात 35 धानखरेदी केंद्रांना मंजूरी

अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका): - आधारभूत किंमत भात खरेदी योजनेंतर्गत मार्केटींग फेडरेशन, मुंबई यांनी नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्था, जिल्हा मार्केटींग रायगड यांच्यामार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम 2020-2021 मध्ये जिल्हयातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा या तालुक्यातील 35 मंजूर धानखरेदी केंद्रांवर खरेदी सुरु करण्यात येणार आहे.  भात खरेदीचा कालावधी हा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील शासन निर्णय क्रमांक : खरेदी -1020/ प्र.क्र.104/ना.पु.29 दि.29 सप्टेंबर, 2020 अन्वये खरीप पणन हंगाम दि. 1 ऑक्टोबर, 2020 ते दि.31 मार्च, 2021 आणि रब्बी पणन हंगाम दि. 1 मे, 2021 ते दि. 30 जून, 2021  असा विहित केला आहे.  भात खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7/12 चा उताऱ्याची व गाव नमुना-8 (अ) ची छायांकित प्रत खरेदी केंद्रावर धान विक्रीकरीता आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून धान / भरडधान्य खरेदी करण्यात येईल. शेतकऱ्यांचे 7/12 उतारानुसार पीकाखालील क्षेत्र, या वर्षीची पीक परिस्थिती   (पैसेवारी),

केंद्र व राज्य शासनाची धोरणे, योजना व कायदे यांच्या अंमलबजावणीसाठी “अभ्यास गट" स्थापित करण्याचे पालकमंत्री आदिती तटकरेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

  अलिबाग, जि.रायगड, दि.22(जिमाका): - रायगड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाची विविध धोरणे, योजना व कायदे यांच्या अंतर्गत विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यानुसार केंद्र व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील विभागामार्फत त्यांची विहित कालावधीमध्ये अंमलबजावणी पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तथापि जिल्ह्यातील सर्वच सामाजिक घटकांपर्यत लाभ पोहोचविणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, शासनाचे अर्थसहाय्य प्राप्त करणे, प्रशासकीय विभागामध्ये समन्वय राखणे, त्यामधील अडीअडचणी सोडविणे व त्यानुषंगाने जिल्हास्तरावर जाणकार, अनुभवी व अभ्यासू अधिकारी यांचा सहभाग घेण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाची धोरणे, योजना व कायदे यांच्या अंमलबजावणीसाठी " अभ्यास गट " स्थापित करण्यासंबंधी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. पालकमंत्री कु.तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली जिल्हास्तरावर प्रशासकीय विभागातील जाणकार, अनुभवी व अभ्यासू वरिष्ठ अधिकारी यांचा " अभ्यासगट " स्थापित करावा . त्यामध्ये प्

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबाबत " मार्गदर्शिका पुस्तिका " तयार करण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

    अलिबाग, जि.रायगड, दि.22(जिमाका): - केंद्र व राज्य शासनामार्फत सामाजिक घटकांच्या सर्वागिण विकासासाठी वैयक्तिक व सामुदायिक स्वरुपाच्या अनेक योजना संबंधित प्रशासकीय विभागामार्फत राबविण्यात येतात. या योजनांचे निकष, लाभार्थी निवड, अनुज्ञेय लाभ व तत्सम बाबींची माहिती सहज, सुलभ व एकत्रित स्वरुपात तयार करुन ग्रामस्तरापर्यंत उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी  " मार्गदर्शिका पुस्तिका " तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.  त्यांनी दिलेल्या निर्देशात केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व सामुदायिक स्वरुपाच्या योजना व अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय विभागांची निश्चिती करावी, संबंधित विभागाकडून सदर योजनाबाबतचे शासन निर्णय, परिपत्रके व अधिसूचना संकलित कराव्यात. त्यानुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा नियोजन समिती व इतर विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत त्यांच्या स्तरावर स्वतंत्र " मार्गदर्शिका पुस्तिका " तयार करावी, कार्यवाही करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली जिल्हा परिषद,

शहीद पोलिसांना जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण रायगड पोलिस कवायत मैदान येथे पोलीस स्मृतिदिन समारंभ संपन्न

Image
  अलिबाग, जि.रायगड, दि.21, (जिमाका): देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना आज जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस कवायत मैदान येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.             यानिमित्ताने पोलिस स्मृतिदिन संचलन समारंभ देखील पार पडला. प्रारंभी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.               यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, रोहा पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, अलिबाग पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम, संचलन प्रमुख राखीव पोलीस निरीक्षक भास्कर शेंडे व पोलीस दलातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.                याप्रसंगी आपल्या संदेशात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विविध पोलिस दलांमधील 26 पोलिस अधिकारी आणि 240 पोलिस अंमलदारांना आपले कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झाल्याबद्धल श्रद्धांजली वाहिली व या वीरश्रेष्ठांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले. 00000