केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबाबत " मार्गदर्शिका पुस्तिका " तयार करण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

 

 

अलिबाग, जि.रायगड, दि.22(जिमाका):- केंद्र व राज्य शासनामार्फत सामाजिक घटकांच्या सर्वागिण विकासासाठी वैयक्तिक व सामुदायिक स्वरुपाच्या अनेक योजना संबंधित प्रशासकीय विभागामार्फत राबविण्यात येतात. या योजनांचे निकष, लाभार्थी निवड, अनुज्ञेय लाभ व तत्सम बाबींची माहिती सहज, सुलभ व एकत्रित स्वरुपात तयार करुन ग्रामस्तरापर्यंत उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी  " मार्गदर्शिका पुस्तिका " तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

 त्यांनी दिलेल्या निर्देशात केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व सामुदायिक स्वरुपाच्या योजना व अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय विभागांची निश्चिती करावी, संबंधित विभागाकडून सदर योजनाबाबतचे शासन निर्णय, परिपत्रके व अधिसूचना संकलित कराव्यात. त्यानुसार जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा नियोजन समिती व इतर विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत त्यांच्या स्तरावर स्वतंत्र " मार्गदर्शिका पुस्तिका " तयार करावी, कार्यवाही करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा नियोजन समिती व इतर विभागांसाठी स्वतंत्ररित्या वर्ग 1 दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, " मार्गदर्शिका पुस्तिके " चा प्रारुप मसुदा ऑक्टोबर, 2020 अखेर तयार करुन राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड यांच्या कार्यालयाकडे विचारविनिमयासाठी सादर करावा,तद्नंतर साधारणत:  दि.15 नाव्हेंबर, 2020 पूर्वी या " मार्गदर्शिका पुस्तिकांची " छपाई संबंधित विभागाच्या स्तरावर पूर्ण करण्यात यावी,  मार्गदर्शिका पुस्तिकांच्या " प्रती जिल्हास्तर, उपविभागस्तर, तालुकास्तर व ग्रामस्तर कार्यालयांसाठी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी, तसेच ही पुस्तिका जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका व संबंधित विभागांच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक