Posts

Showing posts from March 11, 2018

गुढीपाडव्याला आरटीओ कार्यालय सुरु

अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.17- गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्यभरात नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा तसेच त्या अनुषंगिक कर वसूलीचे कामकाज,महसूल उदीष्ट् पुर्तता करण्यासाठी दिनांक 18 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टीचे दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे.असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे . ०००००

रायगड जिल्हा कृषि महोत्सवः 22 पासून खांदेश्वर येथे

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13:-   महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाव जिल्हा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.22 ते 26 मार्च   या कालावधीत जिल्हा कृषि महोत्सव व महिला स्वयंसहाय्यता गटांचा शेतमाल विक्री मेळावा खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड येथे आयेाजित केला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग सार्वजनिक उपक्रम ना.अनंत गिते, राज्याचे कृषि, फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाशिव खोत, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ.कविता चोतमोल, लोकसभा सदस्य खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्य आमदार जयंत पाटील, आमदार सुनिल तटकरे, आमदार अनिल तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, विधानसभा सदस्य   आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुरेश लाड,   आमदार भर

शिक्षण, आरोग्य, पाणी सुविधांनिर्मितीसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचे योगदान द्या-जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन

Image
अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.17- जिल्ह्यातील उद्योगांनी आपला सामाजिक उत्तरदायित्व निधी खर्च करतांना तो जिल्ह्यातील   आरोग्य, शिक्षण, पाणी या सारख्या जीवनावश्यक सेवासुविधांसाठी उपलब्ध करुन द्यावा आणि सामान्य, गोरगरिबांचे जीवन अधिक सुखकर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी   यांनी आज येथे केले.   जिल्ह्यातील उद्योग घटकांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. याबैठकीस जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या सह जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर,   निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,   उद्योग उपसंचालाक दिलीप सोनवणे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सुनिल चव्हाण तसेच सर्व उद्योग घटक, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.   यावेळी आरोग्य सेवांच्या बळकटी करणासाठी ग्रामिण भागातील   सेवासुविधांसाठी 19 कोटी 13 लाख रुपये खर्च अपेक्षित असून इतक्या निधीत ग्रामिण आरोग्य यंत्रणा बळकट होऊन उत्तम सुविधा लोकांना उपलब्ध होतील. तर जिल्हा रुग्णालयात   साधने व सुविधांच

जिल्हा अरिष्ट समुह गट बैठक क्षेत्रांनुसार उद्योगांसाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन नियोजन करा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

Image
अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.17- जिल्ह्यात सहा विविध क्षेत्रांमध्ये औद्योगिक वसाहतींचे एकत्रिकरण झालेले आहे. या सहाही विभागात कुठलीही आपत्तीची घटना घडल्यास त्या त्या ठिकाणी वेळीच मदत व बचाव कार्य सुरु करता यावे या दृष्टीने   सहा क्षेत्रांसाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन सज्जता ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले. जिल्हा आरिष्ट समुह गटाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या सह जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर,   निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,   उद्योग उपसंचालाक दिलीप सोनवणे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सुनिल चव्हाण तसेच सर्व उद्योग घटक, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.   यावेळी माहिती सादर करण्यात आली की,   जिल्ह्यातील रासायनिक उद्योगांची संख्या अधिक आहे.   फॅक्टरी ॲक्ट अनुसार स्थापित असलेल्या उद्योगांची ही संख्या 1355 असून   त्यात 422 रासायनिक उद्योग आहेत. तर त्यापैकी 58 उद्योग

जलजागृती सप्ताह प्रत्येक गावात जलदूत तयार करणे आवश्यक ---जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.16-    महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात 16 ते 22 मार्च 2018 या कालावधीत   जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.   या सप्ताहात पाण्याचे महत्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक गावात जलदूत तयार करुन जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन   जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे केले.    जलसंपदा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जलजागृती सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर कोकण पाटबंधारे   प्रकल्प मंडळ ठाणे अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ होते.   तर कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एन.साळुखे,   जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, रायगड पाटबंधारे विभाग कोलाडचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अधियंता एस.डी.गाढे, पर्यावरण समितीच्या सचिव श्रीमती संगिता जोशी, प्राध्यापक हेमंत सामंत तसेच जलसंपदा विभागातील अधिकारी,कर्मचारी   उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन जिल्