रायगड जिल्हा कृषि महोत्सवः 22 पासून खांदेश्वर येथे




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13:-  महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाव जिल्हा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.22 ते 26 मार्च  या कालावधीत जिल्हा कृषि महोत्सव व महिला स्वयंसहाय्यता गटांचा शेतमाल विक्री मेळावा खांदेश्वर रेल्वे स्टेशन, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड येथे आयेाजित केला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग सार्वजनिक उपक्रम ना.अनंत गिते, राज्याचे कृषि, फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाशिव खोत, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ.कविता चोतमोल, लोकसभा सदस्य खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्य आमदार जयंत पाटील, आमदार सुनिल तटकरे, आमदार अनिल तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, विधानसभा सदस्य  आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुरेश लाड,  आमदार भरत गोगावले, आमदार र्धेर्यशिल पाटील, आमदार मनोहर भोईर, आमदार सुभाष पाटील, आमदार अवधुत तटकरे, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.रायगड जगन्नाथ भोर, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, विभागीय कृषि सहसंचालक ठाणे विकास पाटील, संचालक (आत्मा) सुभाष खेमनार हे विनीत आहे.
कृषि महोत्सव कार्यक्रम रुपरेषा
गुरुवार दि. 22 रोजी सकाळी अकरा वा. उद्घाटन समारंभ, दुपारी एक वा. एकात्मिक कृषि पध्दती मॉडेल-डॉ.एल.एस.चव्हाण, सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र कर्जत, दुपारी तीन वा. काढणी पश्चात तंत्रज्ञान व व्यवस्थापन, डॉ.के.एच.पुजारी, शास्त्रज्ञ, के.व्ही.रोहा.
शुक्रवार दि.23 रोजी सकाळी आकरा वा. खरेदीदार-विक्रेता संमेलन-डॉ.भास्कर पाटील, व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, पुणे. पंडिया राजन, सहाय्यक संचालक एमपीईडीए पनवेल. दुपारी एक वा. महिला स्वयंसहाय्यता गट प्रभावी चळवळ-रामदास बघे, सहा.प्रकल्प अधिकारी (रोजगार), जि.ग्रा.वि.यंत्रणा रायगड.
शनिवार दि.24 रोजी सकाळी आकरा वा. एस.आर.टी. तंत्रज्ञान चंद्रशेखर भडसावळे सगुणा बाग कर्जत. शेततलावातील मत्स्य व्यवस्थापन डॉ.विवेक वर्तक-शास्त्रज्ञ के.व्ही.के.रोहा.
रविवार दि.25 रोजी सकाळी आकरा वा. सेंद्रीय शेती काळाची गरज-हेमंत गुरसाळे, व्यवस्थापक शेतकरी प्रशिक्षण केंद्र, आर.सी.एफ. थळ. दुपारी एक वा. खारभूमी व्यवस्थापन, डॉ.एस.बी.दोडके, शास्त्रज्ञ खारभूमी संशोधन केंद्र पनवेल.
सोमवार दि.26 रोजी सकाळी आकरा वा. पिकस्पर्धा विजेता, आत्मांतर्गत गट पारितोषिक विजेता सन्मान समारंभ. दुपारी एक वा.प्रगतशिल शेतकरी प्रतिक्रिया/मनोगत, दुपारी तीन वा. समारोप कार्यक्रम.
०००००

Comments

  1. नमस्कार, अभिनंदन आणि शुभेच्छा, पुन्हा कधी आहे असा कार्यक्रम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक