Posts

Showing posts from February 12, 2017

राष्ट्रीय लोक अदालत रायगड जिल्ह्यात 324 प्रकरणे निकाली

Image
राष्ट्रीय लोक अदालत रायगड जिल्ह्यात 324 प्रकरणे निकाली             अलिबाग दि.14(जिमाका) :-  राष्ट्रीय विधी व सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे दिनांक 11 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा न्यायालय,रायगड-अलिबाग येथे आणि जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात 324 प्रकरणे निकाली काढण्यात आली.             यावेळी मु.गो.सेवलीकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश,रायगड  तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग,  के.आर.पेटकर, जिल्हा न्यायाधीश-1,  एल.डी.हुली, दिवाणी न्यायाधीश व.स्तर, अलिबाग, तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड आणि अन्य न्‍यायीक अधिकारी, जिल्हा सरकारी वकील, ॲड.प्रसाद पाटील, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रविण ठाकूर, सचिव ॲड. अे.डी.पाटील, मेट्रो सेंटर पनवेलचे भूसंपादन अधिकारी तसेच वकील वर्ग व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.             सदर लोक अदालतीमध्ये संपूर्ण जिल्हयातून न्यायालयातील 2079 इतकी प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी

सण उत्सव काळात शांतता व कायदा सुव्यवस्था राखावी -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
सण उत्सव काळात शांतता व कायदा सुव्यवस्था राखावी                                                        -जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.13 (जिमाका) :- आगामी  काळातील सण उत्सवाच्या वेळी रायगड जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी सर्वांनी दक्ष रहावे असे आवाहन  जिल्हाधिकारी  श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले.   आगामी काळात येणाऱ्या सण व उत्सवाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक तसेच समिती सदस्य, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक संदिप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र दंडाळे आदि उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना त्या पुढे म्हणाल्या की, आगामी काळात येणारे सर्व सण, उत्सव शांततेत व आनंदीमय वातावरणात पार पाडावेत.  एकात्मता ही आपली शक्ती आहे. तिचे दर्शन या काळात होणे आवश्यक आहे. तसेच   गावांगावामध्ये स्थानिक स्व

निर्भय,मुक्त व पारदर्शी निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

निर्भय,मुक्त व पारदर्शी निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज                                                      ---जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.13 (जिमाका) :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका-2017 निर्भय, मुक्त,पारदर्शीपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेस जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक संदिप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र दंडाळे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले पुढे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेसाठी एकूण 59 गट  तर  पंचायत समितीसाठी 118 गण आहेत.  1 हजार 940 मतदान केंद्र आहेत.  233 झोन बनविण्यात आले आहेत.   मतदान 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत होणार आहे. तर मतमोजणी 23 फेब्रुवारी 2017 रोजी होणार आहे. आचार संहिता भंगाच्या तक्रारीसाठी जि