Posts

Showing posts from July 29, 2018

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 22.89 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.89 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2322.86 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 5.00 मि.मि., पेण-30.00 मि.मि., मुरुड-14.00 मि.मि., पनवेल-27.60 मि.मि., उरण-33.00 मि.मि., कर्जत-43.20 मि.मि., खालापूर-20.00 मि.मि., माणगांव-20.00 मि.मि., रोहा-11.00 मि.मि., सुधागड-20.00 मि.मि., तळा-30.00 मि.मि., महाड-24.00 मि.मि., पोलादपूर-24.00, म्हसळा-30.20मि.मि., श्रीवर्धन-7.00 मि.मि., माथेरान-27.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 366.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 22.89 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   73.91 टक्के इतकी आहे. 0000

महसूल मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा

                                                                                                                अलिबाग,जि. रायगड (जिमाका)4- महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.वगळून) मंत्री ना.चंद्रकांत पाटील हे जि ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा   कार्यक्रम याप्रमाणे- सोमवार दि.6 रोजी सकाळी दहा वा. एनडी स्टुडिओ कर्जत रोड चौक फाटा जुना मुंबई-पुणे हायवे, कर्जत जि.रायगड येथे आगमन व श्री.नितीन चंद्रकांत देसाई आयोजित कार्यक्रमास उपस्थिती.    दुपारी साडेबारा वा. कर्जत येथून मुंबईकडे प्रयाण. 0000000

उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)4- उद्योग, खनिकर्म मंत्री ना.सुभाष देसाई हे जि ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा   कार्यक्रम याप्रमाणे- सोमवार दि.6 रोजी पहाटे तीन वा. माणगाव येथे आगमन.   सायं 5 वा. 20 मि.नि. माणगाव येथून मांडवी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण. 00000

पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)4- राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न,नागरी पुरवठा  आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा ना. रविंद्र चव्हाण हे रविवार दि.5 रोजी  जिल्ह्या च्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम याप्रमाणे- रविवार दि.5 रोजी शासकीय वाहनाने सकाळी 10.25 वा. सी.के.टी.महाविद्यालय, खांदा कॉलनी पनवेल येथे आगमन व आमदार प्रशांत ठाकूर विधानसभा सदस्य यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : सी.के.टी.महाविद्यालय खांदा कॉलनी पनवेल.   दुपारी एक वा. आमदार प्रशांत ठाकूर विधानसभा सदस्य यांच्या निवासस्थानी भोजन.  दोन वा. पनवेल येथून पलावा डोंबिवली निवासस्थाकडे  प्रयाण. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 24मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 24.31 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2299.98 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 1.00 मि.मि., पेण-10.00 मि.मि., मुरुड-4.00 मि.मि., पनवेल-12.40 मि.मि., उरण-8.00 मि.मि., कर्जत-32.80 मि.मि., खालापूर-30.00 मि.मि., माणगांव-33.00 मि.मि., रोहा-22.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-44.00 मि.मि., पोलादपूर-51.00, म्हसळा-14.80मि.मि., श्रीवर्धन-20.00 मि.मि., माथेरान-85.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 389.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 24.31 मि. मि.   इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   73.19 % इतकी आहे. 0000  

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 24.31 मि.मि.पावसाची नोंद

     अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 24.31 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2299.98 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 1.00 मि.मि., पेण-10.00 मि.मि., मुरुड-4.00 मि.मि., पनवेल-12.40 मि.मि., उरण-8.00 मि.मि., कर्जत-32.80 मि.मि., खालापूर-30.00 मि.मि., माणगांव-33.00 मि.मि., रोहा-22.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-6.00 मि.मि., महाड-44.00 मि.मि., पोलादपूर-51.00, म्हसळा-14.80मि.मि., श्रीवर्धन-20.00 मि.मि., माथेरान-85.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 389.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 24.31 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   73.19 टक्के इतकी आहे. 0000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.19 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2275.66मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 16.00 मि.मि., पेण-12.00 मि.मि., मुरुड-5.00 मि.मि., पनवेल-2.00 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-7.80 मि.मि., खालापूर-8.00 मि.मि., माणगांव-15.00 मि.मि., रोहा-13.00 मि.मि., सुधागड-14.00 मि.मि., तळा-15.00 मि.मि., महाड-11.00 मि.मि., पोलादपूर-11.00, म्हसळा-24.00मि.मि., श्रीवर्धन-5.00 मि.मि., माथेरान-17.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 179.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 11.19 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   72.41 % इतकी आहे. 0000

कृषी पणन मंडळाची काजू बी तारण योजना

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 - : राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष ना.सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पणन मंडळाने काजू बी तारणचा दर रुपये 80/- प्रती किलो वरुन रुपये 100/- प्रती किलो केला तसेच शेतमाल तारण योजनेत सुपारी पिकाचा समावेश करुन तारण कर्जाचा दर रुपये 100/- प्रती किलो असोली सुपारीसाठी केला.     यामुळे कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण योजनेत कोकणातील शेतक-यांनी पहील्यांदाच 72.68 मे.टन काजू बी तारणात ठेवली.   या पोटी कृषी पणन मंडळाने शेतक-यांना रु.72.68 लाख तारण कर्ज वाटप केले आहे.                   कृषी पणन मंडळ शेतमाल तारण योजना 1991 सालापासून राबवित असून या योजने अंतर्गत तूर,मुग,उडीद,सोयाबीन,सुर्यफुल,चना,भात(धान),करडई,ज्वारी,बाजरी,मका,गहु,काजू बी,बेदाणा,हळद,सुपारी या शेतीमालावर शेतक-यांना तारण कर्ज देण्यात येते.    शेतमालाच्या त्या दिवशीच्या बाजार भावाच्या 75 टक्के रक्कम 6 टक्के व्याज दराने 180 दिवसासाठी शेतक-यांना देण्यात येते.     यामुळे शेतक-यांना आपला माल तात्काळ विक्री न करता पैसे उपलब्ध होतात तसेच भविष्यात शेतमालाच्या बाजार भावात हो

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 11.19 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.19 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2275.66मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 16.00 मि.मि., पेण-12.00 मि.मि., मुरुड-5.00 मि.मि., पनवेल-2.00 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-7.80 मि.मि., खालापूर-8.00 मि.मि., माणगांव-15.00 मि.मि., रोहा-13.00 मि.मि., सुधागड-14.00 मि.मि., तळा-15.00 मि.मि., महाड-11.00 मि.मि., पोलादपूर-11.00, म्हसळा-24.00मि.मि., श्रीवर्धन-5.00 मि.मि., माथेरान-17.20 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 179.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 11.19 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   72.41 टक्के इतकी आहे. 0000

केंद्रीय मंत्री ना.गिते यांचा जिल्हा दौरा

               अलिबाग, जि.रायगड   (जिमाका)2- केंद्रीय अवजड उदयोग व सार्वजनिक उपक्रम मंत्री   ना. अनंत गिते हे शुक्रवार दि. 3 जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे. शुक्रवार दि.3 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मुंबईहून महाड एमआयडीसी ता. महाड जि. रायगड कडे प्रयाण.सायंकाळी सात वाजता महाड एमआयडीसी ता. महाड येथे आगमन.   शनिवार दि.4 रोजी सकाळी नऊ वा.पंचेचाळीस मि. वाजता महाड एमआयडीसी ता. महाड येथून आंबेडकर स्मारक चवदार तळे   कडे प्रयाण. सकाळी दहा वाजता आंबेडकर स्मारक चवदार तळे येथे आगमन. दुपारी तीन वाजता आंबेडकर स्मारक चवदार तळे ता. महाड जि. रायगड येथून इंदापूर येथे प्रयाण. दुपारी साडे तीन वाजता इंदापूर येथे आगमन. सायंकाळी चार वाजता इंदापूर येथून मुंबई कडे प्रयाण. 0000

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवारी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2 -    उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्ह्यातील पनवेल,उरण,कर्जत,खालापूर या चार तालुक्यात राबविण्यात येणार आहे.   या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना रविवारी दि. 5 रोजी पोलीओचा डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा  ही मोहिम राबविण्यासाठी सज्ज झाली आहे.  या मोहिमेसाठी ग्रामीण भागातील 16 प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे शहरी भागात बुथ उभारण्यात येणार असून प्रत्येक बुथवर रविवार दि.5 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना  पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पनवेल,उरण,कर्जत,खालापूर या चार तालुक्यातील ग्रामीण व शहरी  भागातील अपेक्षित लाभार्थी एक लाख 73 हजार 359 असून ग्रामीण भागात 1059 आणि शहरी भागात 166 असे एकूण 1225 बुथवर डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  या व्यतिरिक्त रेल्वे स्थानक, इ. गर्दीच्या ठिकाणी सूद्धा लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी 3026 आरोग्य कर्मचारी  नेमण्यात आले असून अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच खाजगी संस्थांचा देखील सहभाग आहे. 0 ते 5 वर्ष

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 17 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 17.24 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2264.48मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 2.00 मि.मि., पेण-16.40 मि.मि., मुरुड-6.00 मि.मि., पनवेल-4.20 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-7.20 मि.मि., खालापूर-6.00 मि.मि., माणगांव-12.00 मि.मि., रोहा-10.00 मि.मि., सुधागड-26.00 मि.मि., तळा-19.00 मि.मि., महाड-31.00 मि.मि., पोलादपूर-38.00, म्हसळा-42.00मि.मि., श्रीवर्धन-17.00 मि.मि., माथेरान-39.10 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 275.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 17.24 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   72.06 % इतकी आहे. 0000

गोवर रुबेला लसीकरण कार्यक्रम समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी

Image
                                                                                                                                                                                               अलिबाग,जि. रायगड (जिमाका)2- जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी गोवर रुबेला लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा असून त्यासाठी समाजातील डॉक्टर्स, शाळा, शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था या सगळ्यांचा सहभाग शासकीय यंत्रणेसोबत असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आज मिजल रुबेला गोवर लसीकरण अभियान राबविण्यासंदर्भात  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.   या कार्यशाळेचे  उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले.  यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.देवकर, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.बडगिरे तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ.अरुण काटकर, तालुका आरोगय अधिकारी, नगर पालिकांचे आरोग्य अधिकारी तसेच सहभागी यंत्रणा

महसूल दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा प्रत्येक गाव,वाडीत घरपोच दाखले पोहोचविणार जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांचा निर्धार

Image
श्रीवर्धन जि. रायगड दि.1 (जिमाका)- ब्रिटिश राजवटीतील महसुल विभाग व आत्ताचा महसुल विभाग यात फरक आहे. आत्ताचा महसुल विभाग हा विकासात्मक बदल घडवणारा आहे. त्यासाठी येत्या वर्षभरात रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडीत घरपोच दाखले पोहोचविण्याचा संकल्प करु या, असा निर्धार जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज श्रीवर्धन येथे केला. श्रीवर्धन येथे महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड अलिबाग  यांच्या वतीने श्रीवर्धन तहसील कार्यालयात महसुल दिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ.श्रीधर बोधे, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन प्रविण पवार,श्रीवर्धनचे तहसीलदार जयराज सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील महसुल विभागातील उत्तम कामगिरी करणाऱ्याअधिकारी कर्मचा ऱ्यां चा जिल्हृाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्य

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 7 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.1 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.64 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2247.23मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 0.00 मि.मि., पेण-9.0 मि.मि., मुरुड-7.00 मि.मि., पनवेल-4.40 मि.मि., उरण-1.00 मि.मि., कर्जत-5.70 मि.मि., खालापूर-8.00 मि.मि., माणगांव-14.00 मि.मि., रोहा-16.00 मि.मि., सुधागड-3.00 मि.मि., तळा-14.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-4.00, म्हसळा-8.80मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-12.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 122.30 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 7.64 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   71.51 % इतकी आहे. 0000

कातकरी बोली…आदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयार केली शिक्षक मार्गदर्शिका

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) 1-   आदिवासी वाड्यांवरील शाळांमध्ये दिले जाणारे प्रमाण भाषेतील शिक्षण हे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अरुची निर्माण करु शकते. आदिवासी मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवतांना त्याबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी संवाद दुवा म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘कातकरी बोलीभाषा अध्ययन साहित्यः शिक्षक मार्गदर्शिका’, तयार केली आहे. ही मार्गदर्शिका शिक्षकांसाठी असून त्यांना ती कातकरी वाड्यांवरील शाळेत कातकरी समाजाच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देतांना उपयुक्त ठरणार आहे.   रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षक गजानन पुंडलिकराव जाधव यांची ही मुळ संकल्पना. ही संकल्पना प्रत्यक्ष शिक्षक मार्गदर्शिका म्हणून मूर्त स्वरुपात साकारली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देतांना शिक्षकांना त्यांची बोलीभाषा येत असेलच असे नाही. मात्र विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना बोलीभाषेचा प्रयोग केल्यास शिक्षक विद्यार्थी यांच्यात जवळीक निर्माण होते. विद्यार्थ्याला नेमके काय म्हणावयाचे आहे ते समजून घेता येते. शिवाय   शालेय अभ्यासक्रमात प्रमाण भाषेतील शब्दांचे अर्थ जे विद्यार्थ्यांना

फेक न्यूजः परिणाम आणि दक्षता आधी सत्यता तपासा, मगच फॉरवर्ड करा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांचे आवाहन

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) 1-  ‘ फेक न्यूज’ म्हणजेच बनावट बातम्या या हेतूपुरस्कर पसरवल्या जातात. त्यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जातो. समाज माध्यमे हे एकमेकांशी संवाद साधण्याची माध्यमे आहेत. आणि अधिकृत माहितीची माध्यमे ही वृत्तपत्रे. वृत्तवाहिन्या व त्यांचे अधिकृत वेब पोर्टल्स आदी आहेत. सोशल मिडीयाला माहितीचे माध्यम समजून गल्लत करु नका. तेव्हा सोशल मिडीया वरील माहितीची सत्यता तपासा मगच फॉरवर्ड करा, याबाबत जनजागृती करा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी आज माध्यम प्रतिनिधींना येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा सायबर सेल आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फेक न्यूजः परिणाम आणि दक्षता’ या विषयावर  सर्व माध्यम प्रतिनिधींसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात कार्यशाळेचे आयोजन आज  करण्यात  आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर (भापोसे) तर प्रमुख अतिथी म्हणून कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग

महसूल दिनानिमित्त आज श्रीवर्धन येथे गुणगौरव सोहळा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.31 -   महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुनगौरव सोहळा बुधवार दि.1 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय मुख्य सोह्ळ्याचे आयोजन श्रीवर्धन येथे मध्यवर्ती प्रशासकीय भवन,तहसिल कार्यालय येथे करण्यात आले आहे.   महसूली वर्ष दिनांक 1 ऑगस्ट पासून सुरु होते. दि.19/7/2002 च्या शासन परिपत्रकान्वये दिनांक 1 ऑगस्ट हा दिवस महसूली दिन म्हणून साजरा करण्यात येतो.जिल्हा स्तरावरील महसूली कामे वेळच्या वेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अदयावत करणे, वसुलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांचा निपटारा करणे इत्यादी कामे वेळच्या वेळी व वेळापत्रकानुसार करणाऱ्या आणि महसुल वसुलीचे उदिद्ष्ट पार करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा गुणगौरव यानिमित्ताने केला जातो. यंदाचा महसूल दिन बुधवार दि.1 ऑगस्ट, रोजी सकाळी 11वाजता, मध्यवर्ती प्रशासकीय भवन, तहसिल कार्यालय श्रीवर्धन, जि.रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे. या महसूल दिनांला सन 2017-18 या महसूली वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचा गौरव सोहळा व सन 2017-18 या वर्षात शैक्ष

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3.48 मि.मि.पावसाची नोंद

           अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.31 -   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.48 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2239.59 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 2.00 मि.मि., पेण-4.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-5.80 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-1.90 मि.मि., खालापूर-3.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-3.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-3.00 मि.मि., महाड-3.00 मि.मि., पोलादपूर-1.00 म्हसळा-3.00 मि.मि., श्रीवर्धन-2.00 मि.मि., माथेरान-19.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 55.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 3.48 मि.मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   71.26    टक्के इतकी आहे. 00000

कातकरी बोली…आदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयार केली शिक्षक मार्गदर्शिका

अलिबाग,जि. रायगड (जिमाका)31-   आदिवासी वाड्यांवरील शाळांमध्ये दिले जाणारे प्रमाण भाषेतील शिक्षण हे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अरुची निर्माण करु शकते. आदिवासी मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवतांना त्याबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी संवाद दुवा म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘कातकरी बोलीभाषा अध्ययन साहित्यः शिक्षक मार्गदर्शिका’, तयार केली आहे. ही मार्गदर्शिका शिक्षकांसाठी असून त्यांना ती कातकरी वाड्यांवरील शाळेत कातकरी समाजाच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देतांना उपयुक्त ठरणार आहे.   रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षक गजानन पुंडलिकराव जाधव यांची ही मुळ संकल्पना. ही संकल्पना प्रत्यक्ष शिक्षक मार्गदर्शिका म्हणून मूर्त स्वरुपात साकारली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देतांना शिक्षकांना त्यांची बोलीभाषा येत असेलच असे नाही. मात्र विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना बोलीभाषेचा प्रयोग केल्यास शिक्षक विद्यार्थी यांच्यात जवळीक निर्माण होते. विद्यार्थ्याला नेमके काय म्हणावयाचे आहे ते समजून घेता येते. शिवाय   शालेय अभ्यासक्रमात प्रमाण भाषेतील शब्दांचे अर्थ जे विद्यार्थ्यांना नीट आकलन होत