महसूल दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा प्रत्येक गाव,वाडीत घरपोच दाखले पोहोचविणार जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांचा निर्धार




श्रीवर्धन जि. रायगड दि.1 (जिमाका)- ब्रिटिश राजवटीतील महसुल विभाग व आत्ताचा महसुल विभाग यात फरक आहे. आत्ताचा महसुल विभाग हा विकासात्मक बदल घडवणारा आहे. त्यासाठी येत्या वर्षभरात रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडीत घरपोच दाखले पोहोचविण्याचा संकल्प करु या, असा निर्धार जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज श्रीवर्धन येथे केला.
श्रीवर्धन येथे महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड अलिबाग  यांच्या वतीने श्रीवर्धन तहसील कार्यालयात महसुल दिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ.श्रीधर बोधे, उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन प्रविण पवार,श्रीवर्धनचे तहसीलदार जयराज सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील महसुल विभागातील उत्तम कामगिरी करणाऱ्याअधिकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हृाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभापासून दाखल्यांअभावी वंचित राहता कामा नये या उद्देशाने काम करु या. ते म्हणाले, लोकाच्या मनात महसुल विभागाबद्दल सर्वात जास्त आदर आहे,हा आदर वृध्दींगत कसा होईल याची काळजी आपण  घेतली पाहीजे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याची ताकत फक्त महसुल विभागात आहे. राज्यात रायगड जिल्हा महसुल विभागात पुढे आहे. याचे सर्व श्रेय कर्मचारी वर्गाला जाते.महसुल विभागात पुण्याचे काम आहे.मान सन्मान या खात्यात मिळतो याचे उत्तम उदाहरण नाशिक जिल्ह्यात असुन तेथे तहसीलदाराचे मंदिर उभारले असुन त्या ठिकाणी मोठा उत्सव व जत्रा भरत असते. आंबेनळी घाटात जो दुर्देवी अपघात झाला त्या वेळी महसुल विभागाने संवेदनशिल आपत्कालीन व्यवस्थापन राबवल्याबद्दल त्यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतूक केले.
आपत्ती प्रसंगी जनतेला मदत व बचाव करण्यासाठी ‘फास्ट रिस्पॉन्स फोर्स’ स्थापन करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.  तसेच महसुल विभागातील कर्मचारी वर्गाच्या 10 वी 12 वी तील पाल्यांना शासनाची परवानगी घेवुन करीअर गायडन्स, महिला कर्मचाऱ्यांसाठी योगा प्रशिक्षण असे अभिनव उपक्रम राबविण्यास आपले प्राधान्य असेल असे सूतोवाच त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते लोकशाहीर साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.श्रीवर्धन येथील र.ना. राऊत माध्यमीक विद्यालयातील विद्यार्थिनीनी स्वागत गीत गावुन तसेच भिमराव सुर्यभान यांच्या महसुल दिनावर आधारीत गीत गायनाने कार्यक्रमाला प्रत्यक्षात सुरुवात झाली.
प्रास्तावीक उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांनी केले तर आभार श्रीवर्धनचे तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांनी मानले.
मुख्य सोहळ्यापुर्वी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी कार्ले वाडी येथे जावुन आदिवासींना  प्रत्यक्ष दाखले वाटप केले तर कार्यक्रम संपल्यानंतर श्रीवर्धन भट्टीचा माळ येथील व्यावसायीक रुपेशशेठ मोरे यांच्या सहकार्यातुन चिखलप येथे उभारलेल्या  तलाठी कार्यालयाचे उदघाटन करुन कार्यान्वीत केले.
यावेळी पोलादपुरचे तहसीलदार शिवाजी जाधव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन )डॉ.श्रीधर बोधे,निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच तलाठी संघटना अध्यक्ष जांभळे, महसुल कर्मचारी संघटना जिल्हा अध्यक्ष राकेश सावंत, कर्मचारी दर्शना कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.
त्यांची नावे याप्रमाणे-
कोतवालः- शंकर वाला( खालापुर), भास्कर नाक्ती  (म्हसळा), संनिल काळे(अलिबाग)
शिपाईः- संजय शिंदे  (उरण),  प्रशांत शेळके (रोहा), वसंत भोये  (माणगाव)
वाहन चालकः- हितेश म्हात्रे
तलाठीः-बाळासाहेब बांगर(पेण),परेश मोरे(तळा),अनंत म्हात्रे(मुरुड)
लिपिक टंकलेखकः- प्रेरणा राऊत(अलिबाग), रविंद्र  भोसले,मंगेश ढेबे 
मंडळअधिकारीः- गणेश तेलंगी (पोलादपुर), सचिन घाग (सुधागड), सी.आर.पाटील (पेण)
अव्वल कारकुनः-सुनिती देशपांडे (अलिबाग), दर्शना कांबळे (अलिबाग),श्रेया  गायकर(पेण)
महसुल नायब तहसीलदारः-  बि.टि.गोसावी
तहसीलदारः- जयराज सुर्यवंशी, श्रीवर्धन
उपजिल्हाधिकारीः- श्रीधर बोधे
उपविभागीय अधिकारीः- विठ्ठल ईनामदार महाड 
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक