Posts

Showing posts from September 9, 2018

ग्रामंपचायत निवडणूक : मतदानासाठी 26 रोजी स्थानिक सुट्टी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15-   माहे ऑक्टोंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या   व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूकांसाठी तसेच सरपंच पदासाठी थेट निवडणूकीद्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांच्या पोट निवडणूकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये 121 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 1 ग्रामपंचायतीची सरपंच पदाच्या पोट निवडणूकीसाठी बुधवार दि.26रोजी मतदान होणार आहे. त्या अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्षेत्रात दि. 26 रोजी मतदानाच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे. 00000

सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी मुंबईसह नागपूरमध्ये मंगळवारी पेन्शन अदालत

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15-   राज्य शासनाच्या सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी लेखा व कोषागारे संचालनालयामार्फत मुंबई आणि नागपूर येथे मंगळवार दि. 18 रोजी “ पेन्शन अदालत ”   आयोजित करण्यात आली आहे. सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यावेळीउपस्थित रहावे,असे आवाहन वित्त विभागाने केले आहे. केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या दि. 18 जुलै 2018 रोजीच्या ज्ञापनान्वये देशभरात सर्व राज्ये, केंद्र शासित प्रदेशांमध्ये “ पेन्शन अदालत ” आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात अशा पेन्शन अदालतीचे मंगळवार दि. 18 रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही पेन्शन अदालत मुंबई आणि नागपूर अशा दोन ठिकाणी आयोजित करण्यात येईल.  मुंबईत आयोजित होणाऱ्या पेन्शन अदालतीचे काम सकाळी 10.30 ते पूर्ण दिवस असे चालणार आहे. याचे स्थळ पु.ल. देशपांडे  महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई असे आहे. दुसरी पेन्शन अदालत नागपूर येथे आयोजित होईल. तिचा वेळ सकाळी 9 ते पूर्ण दिवस असा आहे तर स्थळ साई सभागृह, गांधी नगर, नागपूर असे

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 0.89 मि.मि.पावसाची नोंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 15 -    रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.89 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 2933.18 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती निवारण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- अलिबाग 2.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-8.20 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-0.00, म्हसळा-0.00 मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-2.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 14.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 0.89 मि. मि.    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   93.33 टक्के इतकी आहे. 00000

आंतरराष्ट्रीय समुद्रतट स्वच्छता अभियान 2018 : अलिबाग येथे समुद्र किनाऱ्यावर तटरक्षक दलातर्फे स्वच्छता मोहीम

Image
अलिबाग, जि.रायगड दि.15,(जिमाका) – अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर आज आंतरराष्ट्रीय समुद्रतट अभियान दियानिमित्त भारतीय तटरक्षक दलाच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी- कर्मचारी, भारतीय तटरक्षक दलातील सैनिक, जेएसएम कॉलेजचे विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी चे विद्यार्थी यांनी एकरितरित्र्या समुद्र किनारपट्टीवरील प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्य पदार्थाचे आवरणे, निरुपयोगी झाडांची मुळे, समुद्रातून वाहून आलेला कचरा स्वच्छ   केला. नगरपरिषदेच्या कचारावाहू वाहनात भरण्यात आला. या प्रसंगी भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर अरुण सिंग यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय समुद्रतट स्वच्छता अभियान संपूर्ण जगभरात गेल्या 30 वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरु आहे. समुद्र आणि समुद्र किनारपट्टी कचरा मुक्तीमुळे महासागरातील प्रदुषणाला आळा बसणार असून याचा फायदा आपल्याला तसेच समुद्रातील जीवांना होणार आहे. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आंतरराष्ट्रीय समुद्रतट स्वच्छता अभियानात ज्या विभागांनी, शाळांनी सहभाग घेतला त्या विभागांना कमांडर अरुण सिंग यांच्या हस्ते प्रश

लोकराज्य अभियान : अनुभव समृध्द होण्यासाठी वाचन आवश्यक आ.प्रशांत ठाकूर

Image
पनवेलच्या ठाकूर विधी महाविद्यालयात लोकराज्य वाचक मेळावा संपन्न अलिबाग, जि.रायगड दि.12,(जिमाका) – हातातल्या मोबाईल मध्ये माहितीचा भांडार उपलब्ध आहे. परंतु   आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. मान्यवरांच्या अनुभवातुन शिकुन अनुभव समृध्द होण्यासाठी वाचन आवश्यक असून त्या दृष्टीने लोकराज्य वाचक अभियानाचे महत्व अनन्य साधारण आहे. असे प्रतिपादन सिडकोचे अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर यांनी आज येथे केले. पनवेल येथील श्रीमती भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात परिसंवाद सभागृहात मराठी वाड्:मय मंडळ व जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शितला गावंड, पंचायत समिती सदस्य ॲङ राज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलींद दुसाने आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तर या कार्यक्रमाला नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी हेही आवर्जून उपस्थित होते. यावेळी आ.ठाकूर यांच्या हस्ते लोकराज्य मासिकाच्या सप

जागतिक मानसिक आरोग्य कार्यक्रम : मानसिक आरोग्य प्राधान्याने जपा- डॉ.अजित गवळी

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.11- मानसिक आरोग्य उत्तम असेल तर शारिरीक आरोग्य ही उत्तम राखता येते. त्यामुळे मानसिक आरोग्यास प्रत्येकाने प्राध्यान्याने जपावे. मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती आढळल्यास त्यास जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार कक्षात आणावे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी   यांनी सोमवारी (दि.10) येथे केले.   जागतिक मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत   जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवार दि.10 ते 17 सप्टेंबर या कालावधीत आत्महत्या प्रतिबंधक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग विद्यार्थिनींनी प्रभात फेरी काढून केले. यावेळी डॉ. गवळी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला.   यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी तथा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे, भिषक तज्ज्ञ डॉ. राजीव तांबाळे तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. अमोल भुसारे यांनी मानसिक आजार, त्याची लक्षणे, घ्यावयाची काळजी, तसेच त्यावर उपलब्ध उपचार सुविधा याबाबत   उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे खोली क्रमांक

तटरक्षक दलाचा उपक्रम : अलिबाग, मुरुड, काशिद येथे शनिवारी समुद्र किनारा स्वच्छता मोहिम

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.11- आंतरराष्ट्रीय समुद्र तट स्वच्छता अभियानांतर्गत शनिवार दि.15 रोजी भारतीय तटरक्षक दलातर्फे   अलिबाग, काशिद आणि मुरुड येथील समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.   स्वच्छ भारत अभियान राबविणे, समुद्र किनारे स्वच्छतेचे प्रात्यक्षिक देणे आणि किनारपट्टीवरील रहिवाशांमध्ये समुद्र किनारे स्वच्छते विषयी जागरुकता निर्माण करुन त्याचे सामाजिक आर्थिक फायदे समजावून सांगणे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.15 रोजी सकाळी साडेसात वा. अलिबाग समुद्र किनाऱ्यावर या मोहिमेचा प्रारंभ होईल. या अभियानात सहभागाचे आवाहन सहा. कमांडंट शुभ्रा घोष यांनी केले आहे. 00000

राष्ट्रीय लोकअदालत : 398 प्रकरणात तडजोडीने 10 कोटी रुपयांची वसूली

Image
अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.11- येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार दि.8 रोजी राष्ट्रीय लोकअदालत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी   जिल्ह्यात आयोजित लोकअदालतील एकूण   प्रलंबित 398 प्रकरणात तडजोड होऊन   10 कोटी 10 लाख 28 हजार 925 रुपये रकमेची वसूली करण्यात आली. तर दाखलपूर्व 13 हजार 766 प्रकरणात   4 कोटी 83 लाख 80 हजार 175 रुपये इतक्या रकमेची वसुली झाली. अशी एकूण 14 कोटी 94 लाख 9 हजार 100 रुपये रकमेची वसूली झाली.   यासंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे   सचिव जयदीप मोहिते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार,   रायगड जिल्ह्यात लोकदालत उपक्रमात 398 प्रकरणात एकूण 10 कोटी 10 लाख 28 हजार 925 रुपयांची वसूली करण्यात आली. त्यात न्यायालयात प्रलंबित भूसंपादनाच्या 59 प्रकरणात 4 कोटी 27 लाख रुपये, मोटार अपघात दाव्यांच्या 37 प्रकरणात   1 कोटी 75 लाख 3 हजार रुपये तर अन्य 302 प्रकरणात तडजोडीने 4 कोटी 8 लाख 25 हजार 925 रुपये इतकी रक्कम तडजोडीने मान्य झाली. अशी एकूण   10 कोटी 10 लाख 28 हजार 925 रुपये रकमेची तडजोडीने वसूली झाली   तर दाखलपूर्व 13 हजार 766 प्रकरणात तडजोडीने 4

लोकराज्य वाचक अभियान : पनवेल येथील ठाकुर विधी महाविद्यालयात आज लोकराज्य वाचक मेळावा : सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.11- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ पनवेल येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकुर विधी महाविद्यालय येथे बुधवार दि.12 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी सिडकोचे अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दरमहा प्रकाशित होणारे ‘लोकराज्य’ हे मासिक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी   सध्या ‘लोकराज्य वाचक अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ पनवेल येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकुर विधी महाविद्यालयाच्या परिसंवाद सभागृहात, बुधवार दि.12 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर यांच्या हस्ते या अभियानाचा   शुभारंभ होणार आहे. या वेळी कोकण विभागाचे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे हे ही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच वाचकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शितला गावंड आणि रायगड जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने य