आंतरराष्ट्रीय समुद्रतट स्वच्छता अभियान 2018 : अलिबाग येथे समुद्र किनाऱ्यावर तटरक्षक दलातर्फे स्वच्छता मोहीम




अलिबाग, जि.रायगड दि.15,(जिमाका) – अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर आज आंतरराष्ट्रीय समुद्रतट अभियान दियानिमित्त भारतीय तटरक्षक दलाच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी अलिबाग नगरपरिषदेचे कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी- कर्मचारी, भारतीय तटरक्षक दलातील सैनिक, जेएसएम कॉलेजचे विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी चे विद्यार्थी यांनी एकरितरित्र्या समुद्र किनारपट्टीवरील प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्य पदार्थाचे आवरणे, निरुपयोगी झाडांची मुळे, समुद्रातून वाहून आलेला कचरा स्वच्छ  केला. नगरपरिषदेच्या कचारावाहू वाहनात भरण्यात आला.
या प्रसंगी भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर अरुण सिंग यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय समुद्रतट स्वच्छता अभियान संपूर्ण जगभरात गेल्या 30 वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरु आहे. समुद्र आणि समुद्र किनारपट्टी कचरा मुक्तीमुळे महासागरातील प्रदुषणाला आळा बसणार असून याचा फायदा आपल्याला तसेच समुद्रातील जीवांना होणार आहे. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आंतरराष्ट्रीय समुद्रतट स्वच्छता अभियानात ज्या विभागांनी, शाळांनी सहभाग घेतला त्या विभागांना कमांडर अरुण सिंग यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक