Posts

Showing posts from October 27, 2019

पालकमंत्री यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद

Image
अलिबाग जि.रायगड (जिमाका) दि.02 :   अलिबाग तालुक्यातील मौजे खंडाळा, रामराज,   पेण तालुक्यातील वाशी खारेपाट व हमरापूर विभाग, पनवेल तालुक्यातील तारा या गावातील अतीवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भात पिकाच्या शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच तलाठी, कृषीसेवक, कृषी विभाग, जिल्हा प्रशासनास, यांना लवकरात लवकर पिक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास सादर करावे असे ही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी पालकमंत्री यांच्या सोबत अलिबाग आमदार महेंद्र दळवी, पेण आमदार रविशेठ पाटील, पनवेल आमदार प्रशांत ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकरी रायगड जिल्हा परिषद दिलीप हळदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, महसूल, कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 00000

अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा चनामे तात्काळ करावेत पालकमंत्री रविंद्र चव्हाण

Image
अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.02 : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शासकीय यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून , नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करुन शेतकऱ्यांना जास्तीतजास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.   जिल्हा स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा , असे निर्देश राज्यमंत्री, बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिले.   अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आढावा   बैठकीत   ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी,   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी   अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्यश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उपविभागीय अधिकारी अलिबाग शारदा पोवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके, तहसिलदार सचिन शेजाळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच विविध शासकीय वि

निवृत्ती वेतन धारकांना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत मुदत

अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.31 : जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतन धारकाची 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याच्या दाखल्याबाबत संबंधित बँकेत यादी पाठविण्यात आलेली आहे.   निवृत्ती वेतन धारकांनी संबंधित बँकेत जाऊन त्या यादीवरील आपल्या नावासमोर हयात असल्याबाबत दिनांकासह स्वाक्षरी करावी व आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांकासह नमूद करावे.   तसेच मनीऑर्डरने निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्त वेतन धारकांनी   सक्षम अधिकाऱ्यांच्या साक्षांकनासह आधारकार्ड, पॅनकार्ड व मोबाईल क्रमांक नमूद करुन हयातीचा दाखला 20 नोव्हेंबर अखेरपर्यंत सादर करावेत. त्याचप्रमाणे सन 2019-20 मधील ज्या निवृत्तीवेतन धारकांच्या वेतनावरील रक्कम आयकर करप्राप्त आहे अशा निवृत्तीवेतन धारकांनी आपले आयकर बाबत आपली बचतीची स्वसाक्षांकित कागदपत्र व पॅनकार्ड या कार्यालयाकडे माहे नोव्हेंबर 2019   मध्ये   सादर करावीत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड-अलिबाग फिरोज मुल्ला   यांनी केले आहे. 00000

राष्ट्रीय एकता दौडचे अलिबाग येथे यशस्वी आयोजन

Image
रायगड-अलिबाग दि.31- ( जिमाका) : सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव व्हावा व जनतेसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने अलिबाग बीच येथे आयोजित एकता दौडचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे,जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी आणि अभिनेता देव दत्त नागे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला.   या राष्ट्रीय दौडमध्ये पोलीस दलाचे   जवान, शासकीय कार्यालय, शाळा , महाविद्यालयातील विद्यार्थी , स्वयंसेवी संस्था , खेळाडू, क्रीडा संघटना , व्यापारी, सर्व नागरिकांनी सहभाग घेतला.   यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस दलाचे जवान, नागरिक, शालेय विद्यार्थी यांना एकात्मतेची शपथ देण्यात आली. 000000

राष्ट्रीय एकता दिवस आणि एकता दौडचे आयोजन

रायगड-अलिबाग दि.30- ( जिमाका) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त सकाळी सात वाजता राष्ट्रीय एकता दौड चे रायगड जिल्हा   पोलिस दल व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या विद्ममाने आयोजित केली आहे.     सदर एकता दौड क्रीडा भवन, अलिबाग बीच येथून सुरु होऊन अलिबाग शहरातील प्रमुख रस्त्यावरुन जाणार आहे यावेळी एकता दौड बरोबरच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात येणार आहे. तसेच पोलीस प्रशासनातर्फे मानवंदना आणि संचलन होणार आहे.   जास्तीत जास्त अलिबागकरांनी यावेळी उपस्थित रहावे असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 000000