निवृत्ती वेतन धारकांना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत मुदत



अलिबाग जि.रायगड (जिमाका)दि.31 : जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयामार्फत निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतन धारकाची 1 नोव्हेंबर रोजी हयात असल्याच्या दाखल्याबाबत संबंधित बँकेत यादी पाठविण्यात आलेली आहे.  निवृत्ती वेतन धारकांनी संबंधित बँकेत जाऊन त्या यादीवरील आपल्या नावासमोर हयात असल्याबाबत दिनांकासह स्वाक्षरी करावी व आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांकासह नमूद करावे.  तसेच मनीऑर्डरने निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्त वेतन धारकांनी  सक्षम अधिकाऱ्यांच्या साक्षांकनासह आधारकार्ड, पॅनकार्ड व मोबाईल क्रमांक नमूद करुन हयातीचा दाखला 20 नोव्हेंबर अखेरपर्यंत सादर करावेत.
त्याचप्रमाणे सन 2019-20 मधील ज्या निवृत्तीवेतन धारकांच्या वेतनावरील रक्कम आयकर करप्राप्त आहे अशा निवृत्तीवेतन धारकांनी आपले आयकर बाबत आपली बचतीची स्वसाक्षांकित कागदपत्र व पॅनकार्ड या कार्यालयाकडे माहे नोव्हेंबर 2019  मध्ये  सादर करावीत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रायगड-अलिबाग फिरोज मुल्ला  यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक