Posts

Showing posts from March 28, 2021

“अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रम” योजनेंतर्गत श्रीवर्धन व माणगाव नगरपंचायत अंतर्गत कामांसाठी रु.50 लक्ष निधी वितरणास शासनाची मंजूरी

  अलिबाग,जि.रायगड,दि.1 (जिमाका):- राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली असून त्यात जिल्ह्यातील श्रीवर्धन व माणगाव येथील प्रस्तावित कामांचा समावेश आहे.   राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या कामांना मंजूरी देऊन निधी उपलब्ध करणेबाबत मागणी केली होती.   त्यानुसार जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील नगरपंचायत अंतर्गत नूर मस्जिद कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे व माणगाव येथील नगरपंचायत अंतर्गत मोहल्ला कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे, या कामांसाठी शासनाकडून प्रत्येकी रू. 25 लक्ष असे एकूण 50 लक्ष इतके अनुदान वितरीत करण्यात आले आहे. अल्पसंख्याक विकास विभागाने सन 2008-09 पासून राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम कार्यान्वित केला आहे. या योजनेंतर्गत खासदार, आमदार व जिल्हाधिकारी यांच्याकडून महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत यांच्या प्राप्त प्रस्तावांना मंजूर देवून निधी वितरीत करण्यात येतो.   या अंतर्गत खासदार, आमदार व जिल्हाधिकारी

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग, जि.रायगड, दि.1 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             गुरुवार, दि.1 एप्रिल 2021 रोजी, सोईनुसार मुंबई येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी, ता.रोहाकडे प्रयाण. सुतारवाडी येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार दि.2 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9.30 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने पाचाड, ता.महाडकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. पाचाड येथे आगमन व रायगड किल्ला जतन, संवर्धन व विकास आराखडा प्राधिकरणाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ : मौजे पाचाड, धर्मशाळेसमोर, ता.महाड. बैठकीनंतर पाचाड येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे. सुतारवाडी येथे आगमन व राखीव. ०००००००

"नगरपरिषद क्षेत्रातील यात्रास्थळांच्या विकास कार्यक्रमासाठी सहायक अनुदान" योजनेंतर्गत श्रीवर्धनमधील श्री सोमजाई देवस्थान ट्रस्टला रु.2 कोटी 68 लक्ष निधी वितरणास शासनाची मंजूरी

    अलिबाग,जि.रायगड,दि.1 (जिमाका):- "नगरपरिषद क्षेत्रातील यात्रास्थळांच्या विकास कार्यक्रमासाठी सहायक अनुदान ” योजनेंतर्गत राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून श्रीवर्धन नगरपरिषदेला श्री सोमजाई देवस्थान ट्रस्ट या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता एकूण रक्कम रुपये 2 कोटी 68 लक्ष इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजूरी आहे. यामध्ये राज्यशासन, नगर परिषद व देवस्थान असे मिळून मंजूर प्रकल्पाची एकूण रक्कम रुपये 6 कोटी 24 लाख इतकी निश्चित करण्यात आली आहे.                राज्यशासनाच्या हिस्स्यातील रु.4 कोटी 18 लक्ष रकमेपैकी रुपये 2 कोटी 68 लक्ष निधी वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. मंजूर प्रकल्पाच्या एकूण रुपये 6 कोटी 24 लाख इतक्या रक्कमेपैकी श्रीवर्धन नगर परिषदेचा हिस्सा रु.1 कोटी 03 लक्ष असून श्री सोमजाई देवस्थान ट्रस्टचा हिस्सा रु.1 कोटी 03 लक्ष असणार आहे.               राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या/यात्रास्थळांच्या ठिकाणी भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. बऱ्याच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी वर्षामधील काही ठराविक कालावधीमध्य

माणगाव येथे विभागीय क्रीडा संकुल उभारणीसाठी क्रीडा विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने क्रीडा संकुल स्थापण्याची प्रक्रिया शीघ्र गतीने

    अलिबाग,जि.रायगड, दि.1 (जिमाका):- कोकण विभागाचे विभागीय क्रीडा संकुल नवी मुंबई येथे उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. परंतु नवी मुंबई परिसरात या संकुलासाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध होणे शक्य न झाल्याने   क्रीडा राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या कल्पनेतून विभागाचे क्रीडा संकुल मध्यवर्ती झाल्यास कोकण विभागातील सर्वच खेळाडूंना याचा लाभ होईल, असा विचार पुढे आला.   त्यानुषंगाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केलेल्या अखंडित पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मौजे नाणोरे येथे   विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.              मौजे नाणोरे येथील क्रीडा संकुलासाठी स.नं.130/0 मधील 10.00 हेक्टर (24 एकर) शासकीय जागा विभागीय क्रीडा संकुल, कार्यकारी समिती, मुंबई विभागाच्या नावावर करण्यात आली आहे. या संकुलासाठी रुपये त्र्याऐंशी कोटी चव्वेचाळीस लक्ष सोळा हजार रकमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने मान्यता दिली आहे.              शासनाच्या मान्यताप्राप्त अंदाजपत्रकानुसार विभागीय क्रीडा संकुलामध्ये 400 मी.सिंथेटीक

राज्यातील आदिम जमातींकरिता राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरेंचा पुढाकार रायगडमध्ये उभारणार आदिवासी बहुउद्देशीय संकुल

    अलिबाग,जि.रायगड, दि.1 (जिमाका):- राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांच्या पुढाकारातून तसेच सातत्यपूर्ण प्रयत्नातून जिल्ह्यातील सुधागड-पाली तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथे आदिम जमाती (PVTG) (कातकरी) यांच्याकरिता बहुद्देशीय संकुल उभारण्यासाठी शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कु. आदिती तटकरे यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात तशी घोषणा करण्यात आली होती.   या प्रकल्पाकरीता मौजे जांभूळपाडा ता. सुधागड येथे स.नं.106 क्षेत्र 19-75-00 हे.आर एवढी शासकीय जमीन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. आदिवासी जमातीची कुटुंबे अतिदुर्गम व अविकसित अशा सीमाभागात राहत असल्यामुळे या कुटूंबांना जीवनावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होणे कठीण असते.                    या प्रकल्पामुळे त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण, आरोग्य तपासणी व उपचार, दैनंदिन आवश्यक अन्न किंवा वापर वस्तूंचा पुरवठा, मनोरंजन व करमणूक आणि त्यांच्या उपजीविकेवर आधारित व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून आदि

जिल्हा न्यायाधीश कार्यालयातील जुने वाहन खरेदी करु इच्छिणाऱ्यांनी मोहोरबंद किंमतीच्या निविदा सादर कराव्यात

  अलिबाग,जि.रायगड, दि.1 (जिमाका):- प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांच्या नियंत्रणाखालील जिल्हा न्यायाधीश-1 यांना मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील पुरविण्यात आलेले शासकीय वाहन मारुती बलेनो व्हीएक्सआय क्र. एम. एच.01/ पीए / 5050 हे दि.16 मे 2019 रोजी निर्लेखित करण्यात आले आहे. हे वाहन जास्त किंमत देवून खरेदी करु इच्छिणाऱ्या लोकांकडून मोहोरबंद किंमतीच्या निविदा मागविण्यात येत आहेत. हे वाहन जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांच्या न्यायालयाच्या आवारात पाहण्यासाठी उपलब्ध ठेवण्यात आले आहे. ते कार्यालयीन वेळेत इच्छुक लोकांना पाहता येईल.               ज्या कोणा इच्छुक व्यक्तीस हे वाहन खरेदी करावयाचे असेल त्यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांच्या नावाने मोहोरबंद किमतीच्या निविदा दि.16 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड अलिबाग यांच्या कार्यालयात पोहोचतील अशा बेताने सादर कराव्यात.दि 16 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत प्राप्त न झालेल्या निविदा किंवा अपूर्ण असलेल्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाहीत. अनामत रक्कम म्हणून रु.5 हजार