Posts

Showing posts from October 4, 2020

“माझे कुटुंब-माझी जबाबदारी” नवरात्रौत्सवाचे स्वागत करु..शासनाच्या नियमांचे पालन करु..!

  विशेष लेख क्र.30                                                                                             दिनांक :- 09 ऑक्टोबर 2020   कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा नवरात्रौत्सव / दूर्गापूजा / दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शासनाने दि. 29 सप्टेंबर 2020 रोजी सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020 मार्गदर्शक सूचना, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, शासन परिपत्रक क्रमांक- आरएलपी -0920 / प्र.क्र .156 / विशा-1,ब, या परिपत्रकाद्वारे सार्वजनिक नवरात्रौत्सव 2020 मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. काय आहेत या सूचना जाणून घेवूया लेखातून अन् या सूचनांचे पालन करुन शासनाला सहकार्य करु…! v   सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहील. v     कोविड -19 मुळे उदवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादि

समाज कल्याण कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित

        अलिबाग,जि.रायगड दि.09 (जिमाका) :-   सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड- अलिबाग हे कार्यालय नमिनाथ जैन मंदिर, कच्छी भवन, श्रीबाग चेंढरे, अलिबाग, रायगड या नवीन जागेत दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून स्थलांतरित झाले आहे.         या कार्यालयाच्या नवीन पत्त्याची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रविकिरण पाटील यांनी केले आहे. 000000

पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा

    अलिबाग,जि.रायगड दि.09 (जिमाका) :-   राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.. शुक्रवार दि.09 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.45 वा. सुनिती शासकीय निवासस्थान मुंबई येथून शासकीय वाहनाने कळंबोली ता.पनवेलकडे प्रयाण. दुपारी 2.00 वा. कळंबोली ता.पनवेल येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. स्थळ : मनपा सभागृह, कळंबोली, ता.पनवेल.   सायंकाळी 4.00 वा . पनवेल येथून शासकीय वाहनाने कर्जतकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वा. कर्जत येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. स्थळ :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दहिवली, कर्जत. मुक्काम :कर्जत. शुक्रवार दि.10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वा. कर्जत येथून शासकीय वाहनाने खोपोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. खोपोली येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. स्थळ : चंद्रविलास हॉल, खोपोली. दुपारी 12.30 वा.राखीव. दुपारी 1.00 वा. खोपोली येथून शासकीय वाहनाने पेण

कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 44 हजार 759 जणांनी केली करोनावर मात

          *अलिबाग,जि.रायगड दि. 08 (जिमाका):-* स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 44 हजार 759 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 338 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 782, पनवेल ग्रामीण-557, उरण-126, खालापूर-134, कर्जत-59, पेण-155, अलिबाग-275, मुरुड-33, माणगाव-79, तळा-8, रोहा-155, सुधागड-18, श्रीवर्धन-15, म्हसळा-7, महाड-49, पोलादपूर-17 अशी एकूण 3 हजार 469 झाली आहे.           कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-18 हजार 680, पनवेल ग्रामीण-5 हजार 583, उरण-1 हजार 718, खालापूर-2 हजार 273, कर्जत- 1 हजार 540, पेण-3 हजार 416, अलिबाग-4 हजार 242, मुरुड-366, माणगाव- 1 हजार 740, तळा-148, रोहा-2 हजार 085, सुधागड-363, श्रीवर्धन-354, म्हसळा-294, महाड- 1 हजार 572, पोलादपूर-385 अशी एकूण 44 हजार 759 आहे.                        आज दिवसभर

दिलखुलास'कार्यक्रमात 'दृढनिश्चय सर्वांगीण विकासाचा' या विषयावर पर्यटन,फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची मुलाखत*

  मुंबई,दि.8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'दृढनिश्चय सर्वांगीण विकासाचा' या विषयावर उद्योग, खनिकर्म, पर्यटन,फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण,राजशिष्टाचार,माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री अलिबाग (रायगड) कुमारी आदिती तटकरे यांची   मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दिनांक 9 , शनिवार दिनांक 10 व सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते ७.40 या वेळेत प्रसारित होईल.तसेच तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या  ॲपवर  ही याच वेळेत ऐकता येईल.ही  मुलाखत निवेदिका रेश्मा बोडके यांनी घेतली  आहे.         या मुलाखतीत राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय,बीच शॅक धोरण,तिर्थक्षेत्र पर्यटन, फलोत्पादन विभागाच्या योजनांना देण्यात येणारी गती,क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या योजना व उपक्रम, रायगड जिल्हयातील पर्यटनाला  व ‍विकासाला देण्यात येणारी गती,निसर्ग चक्री वादळामुळे जिल्हयात  झालेले नुकसान व शासनाकडून करण्यात आलेली मदत, कोविड कालावधीत उद्योग विभागासाठी घेण्यात

"होवू या सारे एकसंघ, करूया एचआयव्हीला प्रतिबंध" आंतरराष्ट्रीय युवा दिन व पंधरवडानिमित्त जिल्हा रुग्णालयाकडून आयोजित विविध स्पर्धांचे निकाल जाहीर

  वृत्त क्रमांक:-1257                                                                                             दिनांक:- 08 ऑक्टोबर 2020     अलिबाग,जि.रायगड,दि.8 (जिमाका) :-   आंतरराष्ट्रीय युवा दिन व पंधरवडानिमित्त यावर्षी   विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थानी सहभागी होऊन ऑनलाईन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी केले होते.   या आवाहनाला   उत्कृष्ट   प्रतिसाद देऊन खालील विध्यार्थानी सहभाग घेतला.    त्यामध्ये एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती या   विषयावर ऑनलाईन पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आली असून त्यामध्ये डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी   आर्टस्, कॉमर्स व   सायन्स कॉलेज, गोवे   कोलाड   येथील कु. प्रार्थना प्रसन्ना बेटकर हिने प्रथम क्रमांक मिळविला असून तिला रु. 500/-, लोकमान्य शिक्षण प्रसारक   मंडळ, आर्टस्, सायन्स व कॉमर्स कॉलेज चोंढी, तालुका अलिबागची   कु.    आसावरी अनिल राऊत,   व्दितीय   क्रमांकास रु.300/- तर   के.एम.सी. कॉलेज खोपोली येथील कु.   रुपेश मधुकर शिद, या विध्यार्थास   तृतीय क्रमांकास

कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 44 हजार 307 जणांनी केली करोनावर मात

          *अलिबाग,जि.रायगड दि. 07 (जिमाका):-* स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 44 हजार 307 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 430 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 775, पनवेल ग्रामीण-588, उरण-130, खालापूर-163, कर्जत-63, पेण-157, अलिबाग-293, मुरुड-30, माणगाव-87, तळा-12, रोहा-166, सुधागड-26 श्रीवर्धन-17, म्हसळा-7, महाड-56, पोलादपूर-27 अशी एकूण 3 हजार 597 झाली आहे.           कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-18 हजार 471, पनवेल ग्रामीण-5 हजार 515, उरण-1 हजार 698, खालापूर-2 हजार 237, कर्जत- 1 हजार 530, पेण-3 हजार 404, अलिबाग-4 हजार 206, मुरुड-366, माणगाव- 1 हजार 729, तळा-144, रोहा-2 हजार 070, सुधागड-354, श्रीवर्धन-352, म्हसळा-294, महाड- 1 हजार 562, पोलादपूर-375 अशी एकूण 44 हजार 307 आहे.                        आज दिवसभर

माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिमेत रुरल अँड यंग फाउंडेशन आणि अभाविप चे प्रशासनास मोलाचे सहकार्य 26 स्वयंसेवकांनी 763 कुटुंबांना भेटी देऊन 2 हजार 229 नागरिकांची केली आरोग्य तपासणी

Image
  “   अलिबाग,जि.रायगड,दि.7 (जिमाका) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दि. 15 सप्टेंबर पासून संपूर्ण राज्यात “ माझे कुटुंब-माझी जबाबदारी ” ही महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली.  या मोहिमेस संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळाला. या मोहिमेचे स्वरूप अधिक व्यापक होण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी होण्यासाठी शासनाकडून आवाहन करण्यात आले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देताना रायगड जिल्ह्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अलिबाग शाखा तसेच रुरल अँड यंग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या उत्साहाने प्रशासनाच्या हातात हात घालून “ माझे कुटुंब-माझी जबाबदारी ” ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.  या अभियानात स्थानिक प्रशासन आणि अभाविप व रुरल अँड यंग फाउंडेशन, रायगड यांच्या 26 स्वयंसेवकांनी तहसिलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी दिप्ती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुक्यातील सारळ, पेढांबे, किहीम, कुसुंबळे, खंडाळे (सागरगड वाडी) व नागाव अशा सहा ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य सर्वेक्षणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. यावेळी या स्वयंसेवकांनी नागरिकांच्या शरीराचे ताप

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी दि.31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावेत

         अलिबाग,जि.रायगड,दि.7 (जिमाका)- शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व सस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरवण्यात येते. सन 2018- 2019 व 2019-20 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थांकडून दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. पुरस्काराचे स्वरूप व अर्हता पुढीलप्रमाणे- राज्यस्तरीय पुरस्कार : रु.1 लाख एक रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा.   ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याचे 5वर्ष पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.   विभागीय पुरस्कार :- रु.25 हजार एक रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 7 वर्षे कार्य असावे.   नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा.   संस्था राजकारणापासून अलि

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 43 हजार 914 जणांनी केली करोनावर मात

          *अलिबाग,जि.रायगड दि. 06 (जिमाका):-* स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 43 हजार 914 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 314 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 729, पनवेल ग्रामीण-597, उरण-141, खालापूर-161, कर्जत-70, पेण-165, अलिबाग-304, मुरुड-28, माणगाव-84, तळा-12, रोहा-154, सुधागड-28, श्रीवर्धन-19, म्हसळा-7, महाड-49, पोलादपूर-26 अशी एकूण 3 हजार 574 झाली आहे.           कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-18 हजार 249, पनवेल ग्रामीण-5 हजार 461, उरण-1 हजार 680, खालापूर-2 हजार 232, कर्जत- 1 हजार 523, पेण-3 हजार 385, अलिबाग-4 हजार 171, मुरुड-365, माणगाव- 1 हजार 719, तळा-144, रोहा-2 हजार 060, सुधागड-352, श्रीवर्धन-349, म्हसळा-294, महाड- 1 हजार 555, पोलादपूर-375 अशी एकूण 43 हजार 914 आहे.                        आज दिवसभ

हॉटेल,उपाहारगृहे,फूड कोर्ट, बारचालकांनी शासनाच्या कार्यप्रणालीचे पालन करणे बंधनकारक

       अलिबाग,जि.रायगड,दि.6 (जिमाका)- शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाकडील दि.30 सप्टेंबर 2020 अन्वये राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात येऊन Easing of Restrictions & Phase-wise opening of lockdown. - MISSION BEGIN AGAIN अंतर्गत राज्यात दि.05 ऑक्टोबर 2020 पासून हॉटेल, उपहारगृहे, फूड कोर्ट, बार इ. एकूण क्षमतेच्या 50 % मर्यादेत सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यांनी शासन व पर्यटन विभागाकडून या संदर्भात निर्गमित केल्या जाणाऱ्या मानक कार्यप्रणालीचा (Standard Operating Procedure) अवलंब करणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिलेले आहेत.        शासन, पर्यटन विभागाकडून हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करताना कोविड-19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure) निश्चित केलेली आहे. त्यानुसार शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाकडील दि.30 सप्टेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये दिलेल्या मान्यतेनुसार हॉटेल, उपहारगृहे, फूड कोर्ट, बार इ. एकूण क्षमतेच्या 50 % मर्यादेत

पालकमंत्री कु.आदिती तटकरेंच्या पाठपुराव्याने रोहा तालुक्यासाठी रक्त साठा केंद्र मंजूर

        अलिबाग, जि.रायगड,दि.6, (जिमाका) :- पालकमंत्री कु.आदिती तटकरेंच्या पाठपुराव्याने अखेर रोहा येथील   उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठा केंद्र मंजूर झाले आहे. रोहा तालुक्यातील नागरिकांनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची या विषयाबाबत नुकतीच भेट घेतली होती. रोहा व आजूबाजूच्या   परिसरातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयातील गरजू नागरिकांसाठी रक्ताची गरज भासल्यास त्यांना तात्काळ रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासनाकडे   केलेल्या पाठपुराव्यामुळे   रोहा तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना रक्त साठा केंद्रासारखी आवश्यक सुविधा उपलब्ध झाली आहे. या रक्त साठा केंद्रासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून 1 वैद्यकीय अधिकारी व 1 रक्तपेढी तंत्रज्ञ अशा दोन अधिकारी-कर्मचाऱ्याची नियुक्ती तात्काळ करण्यात आली आहे. 0000000

खा.सुनिल तटकरे यांनी केंद्र सरकारसमोर मांडला हनुमान कोळीवाड्याच्या फेरपुनर्वसनाचा प्रश्न जेएनपीटीची जबाबदारी असल्याचे खडसावून सांगितले जेएनपीटीचे खासगीकरण होणार नाही, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

        अलिबाग,जि.रायगड,दि.5,(जिमाका): -आज केंद्र सरकारच्या जहाज वाहतूक विभागातर्फे सागरतट समृद्धी   योजनेसंदर्भात   जहाज वाहतूक विभागाचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगव्दारे खासदारांसोबत संवाद साधला. यावेळी जेएनपीटीबंदराच्या विकासासाठी पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थांच्या व्यथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे   खासदार सुनिल तटकरे यांनी केंद्र सरकारकडे मांडल्या. त्यांच्या लांबणीवर   पडलेल्या फेरपुनर्वसनाची जबाबदारी जेएनपीटीची असून केंद्र सरकारने त्यांना तशा सूचना द्याव्या, अशी मागणी खा.तटकरे यांनी केली. गेल्या 35 वर्षांपासून फेरपुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या उरण   येथील हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थांनी आंदोलनाची   भूमिका घेतली आहे. जेएनपीटी बंदराच्या विकासासाठी हे   गाव विस्थापित करण्यात आले होते. 1985 साली उरण   शहराजवळ बोरी-पाखाडी   (भवरा) गावाजवळ   चिखल व वाळवीग्रस्त   मातीत भराव टाकून   या   गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. ग्रामस्थांना पुनर्वसनासाठी सोई-सुविधांसह 17 हेक्टर   जागेची आवश्यकता होती. मात्र जेएनपीटीने २ हेक्टर   जागेत पु

जिल्हा रुग्णालयातील अद्ययावत अतिदक्षता विभाग तसेच ऑक्सिजन कंटेनर यंत्रणेचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

     अलिबाग,जि.रायगड,दि.4, (जिमाका):- येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग  तसेच 6 किलाेलीटर ऑक्सिजनची क्षमता असलेल्या अद्ययावत आधुनिक मिनी बल्क कंटेनर सिस्टीम पफ इन्सूलेटेड माॅडिफाईड (mini bulk container system puf insulated modified ) यंत्रणेचे उद्घाटन आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.     यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, नागरी संरक्षण दलाच्या  रायगड जिल्ह्याच्या उपनियंत्रक राजश्री कोरी, तहसिलदार सचिन शेजाळ, डॉ.अनिल फुटाणे, डॉ.विक्रम पडोळे, डॉ.शितल जोशी, श्री.सिद्धार्थ चौरे, बांधकाम विभागाच्या कुमारी धनश्री भोसले, सीएसआर हेड आंबेरिन मेमन, एव्हीपी ॲडमिनिस्ट्रेशनचे राहुल गायकवाड, जीव्हीएस एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, बारामतीचे सौरभ गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.       जिल्हा रुग्णालयातील या नव्या अतिदक्षता विभागात 40 बेडस् तर 60 ऑक्सिजन बेडस्  उपलब्ध असून यापैकी मह