दिलखुलास'कार्यक्रमात 'दृढनिश्चय सर्वांगीण विकासाचा' या विषयावर पर्यटन,फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची मुलाखत*


  मुंबई,दि.8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात 'दृढनिश्चय सर्वांगीण विकासाचा' या विषयावर उद्योग, खनिकर्म, पर्यटन,फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण,राजशिष्टाचार,माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री अलिबाग (रायगड) कुमारी आदिती तटकरे यांची   मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दिनांक 9 , शनिवार दिनांक 10 व सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते ७.40 या वेळेत प्रसारित होईल.तसेच तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या  ॲपवर  ही याच वेळेत ऐकता येईल.ही  मुलाखत निवेदिका रेश्मा बोडके यांनी घेतली  आहे.


        या मुलाखतीत राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय,बीच शॅक धोरण,तिर्थक्षेत्र पर्यटन, फलोत्पादन विभागाच्या योजनांना देण्यात येणारी गती,क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या योजना व उपक्रम, रायगड जिल्हयातील पर्यटनाला  व ‍विकासाला देण्यात येणारी गती,निसर्ग चक्री वादळामुळे जिल्हयात  झालेले नुकसान व शासनाकडून करण्यात आलेली मदत, कोविड कालावधीत उद्योग विभागासाठी घेण्यात आलेले निर्णय यासंदर्भात सविस्तर माहिती  राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमात दिली आहे.                                                         *****

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक