Posts

Showing posts from August 21, 2022

निर्मल गणेशोत्सवांतर्गत वायशेत येथे विद्यार्थ्यांना मातीपासून घरगुती गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबीर संपन्न

Image
अलिबाग, दि.26 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आणि अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबाग तहसिलदार कार्यालय व माणुसकी प्रतिष्ठान, अलिबाग आयोजित निर्मल गणेशोत्सवांतर्गत आज दि.26 ऑगस्ट 2022 रोजी माध्यमिक शाळा, वायशेत येथे विद्यार्थ्यांना मातीपासून घरगुती गणपती कसे तयार करावेत, याचे प्रात्यक्षिक शिबीर आयोजित करण्यात आले होते. मौजे थळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री.एकनाथ थेरोंडेकर यांनी मातीपासून घरच्या घरी गणेशमूर्ती तयार करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमास अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान, श्री.विशाल आढाव, श्री.गौरव माळी, तहसील कार्यालय अलिबागचे श्री.पवन मस्के, शाळेचे शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.  या शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. याप्रसंगी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापरण्याचा निर्धार विद्यार्थी व उपस्थितांनी व्यक्त केला. 00000

पी.एम किसान योजना व मतदान ओळखपत्रासोबत आधार लिंक करण्याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता मौजे कुर्डूस येथे विशेष ग्रामसभा संपन्न

Image
अलिबाग, दि.26 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आणि अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यातील नागरिकांमध्ये पी.एम किसान (PM-KISAN) योजना व भारत निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदान ओळखपत्रासोबत आधारकार्ड लिंक करण्याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता अलिबाग तालुकत्यातील मौजे कुर्डूस येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या विशेष ग्रामसभेचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय, कुर्डूस येथे पोयनाड मंडल अधिकारी श्री.निकम व कुर्डूस तलाठी सत्यवान पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना पी.एम किसान (PM-KISAN) योजना, ई-केवायसी करण्याबाबत माहिती दिली. यावेळी भारत निवडणूक आयोगाद्वारे राबविण्यात येणाऱ्या मतदान ओळखपत्रासोबत आधारकार्ड लिंक करण्याबाबत माहिती देवून फॉर्म 6 ब भरून घेण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी कुर्डूस ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 00000

गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरुप होणार --सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

Image
    अलिबाग,दि.26 (जिमाका):- गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री   रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिले.   गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर रस्त्याचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती रुपाली पाटील, अलिबाग   सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.   सार्वजनिक बांधमकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी आज पनवेल येथून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. रायगड जिल्हयातील या पाहणी दौऱ्यात मंत्री महोदयांनी कासू, नागोठणे, वाकण फाटा, खांब, वरसगाव फाटा, इंदापूर आदि ठिकाणी जावून रस्त्याच्या सुरू असलेल्या दुरु

जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला व संस्थांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत

    अलिबाग,दि.26 (जिमाका):-    आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून दि.8 मार्च 2022 रोजी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ज्या महिला, संस्था यांनी   महिलांच्या कल्याणाकरिता, विकासाकरिता उल्लेखनीय कार्य केले आहे, अशा महिलांच्या सन्मानार्थ नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराकरिता उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला व संस्था यांनी केंद्र शासनाच्या www.awards.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची तसेच नामनिर्देशनाची यापूर्वीची तारीख वाढविली असून आता दि.31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज भरावयाचे आहेत.        त्यासाठी जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला व संस्थांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी दिलेल्या विहित मुदतीत आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे. 00000

राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठक खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावी--जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

    अलिबाग,दि.25 (जिमाका):-  कोकणातील महत्वाचा सण गणेशोत्सव दि.31 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात राज्याच्या विविध शहरातून नागरिक येत असतात. त्यांचा प्रवास सुखकर व सुरळीत व्हावा, याकरिता राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही गणेशोत्सवापूर्वी करावी, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले.                 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या झालेल्या दुरुस्तीबाबत आढावा बैठकीत ते अधिकाऱ्यांशी बोलत होते.              यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, महसूल, पोलीस विभाग, राष्ट्रीय मार्ग विभागांचे विभागप्रमुख, कार्यालय प्रमुख, कॉन्ट्रॅक्टर्स आदी उपस्थित होते.              यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविले जावेत. पोलीस विभागाने गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतूक सुरळितपणे होईल, असे पहावे. महामार्गाच्या कामात विविध तंत्रज्ञानाचा तसेच जादा मनुष्य बळाचा वापर

स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश खंड-2 हा ग्रंथ जिल्हयातील वाचकांच्या संदर्भासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात उपलब्ध

  अलिबाग,दि.25 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश खंड-2 हा ग्रंथ रायगड जिल्हयातील वाचकांच्या संदर्भासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग या कार्यालयात उपलब्ध करून दिला आहे.       स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश खंड-2 या चरित्रकोशात मुंबई, ठाणे, पालघर व कुलाबा (आताचा रायगड जिल्हा) या जिल्हयातील स्वातंत्र्य सैनिकांचा अल्पपरिचय उपलब्ध करुन दिला आहे.        या ग्रंथाच्या विस्तृत प्रस्तावनेत संपादक श्री. भ. ज. कुटे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय चळवळीचा आढावा घेतला आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यासाठी जो लढा झाला त्याच्या विचार मंचनाची पार्श्वभूमी असलेल्या मवाळवाद, जहालवाद, क्रांतीवादी विचारसरणी सुधारणावाद, संविधानवाद या तत्वप्रणालीवर चर्चा केली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली उभारलेली स्वातंत्र्यचळवळ, 19 व 20 व्या शतकात उदयास आलेली ब्राम्हणेत्तर चळवळ, कामगार चळवळ, त्यातील नेते, भारतात यशस्वी होऊ न शकलेली साम्यवादी विचारसरणी याब

जे.एस.एम.महाविद्यालय अलिबाग येथे युवा महोत्सवाचे आयोजन

         अलिबाग,दि.25 (जिमाका):- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भव्य व्यासपीठ प्राप्त व्हावे, म्हणून मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षातर्फे दरवर्षी जिल्हा व विद्यापीठ स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.   त्यानुषंगाने जे.एस.एम. महाविद्यालय अलिबाग येथे शुक्रवार, दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वा. युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरीचे आयोजन आले आहे.         या युवा महोत्सवात अलिबाग, पेण, महाड, माणगाव, रोहा, मुरुड, तळा, श्रीवर्धन, म्हसळा पोलादपूर, सुधागड या तालुक्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी या दिवशी संगीत, नाट्य, नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, रांगोळी अशा विविध   प्रकारच्या एकूण 32 स्पर्धांमध्ये सहभाग घेतील.      युवा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,ॲड. गौतम पाटील   यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. याप्रसंगी युवा महोत्सवाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व सिनेदिग्दर्शक अभिषेक जावकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक तसेच मुंबई विद्यापीठ

जिल्हास्तरीय लोकशाही दिन दि.06 सप्टेंबर रोजी

  अलिबाग,दि.25 (जिमाका):- शासनाच्या दि.26 सप्टेंबर 2012 च्या परिपत्रकानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि पहिल्या सोमवारी, दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी, रायगड यांच्याकडून गौरी विर्सजनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माहे सप्टेंबर 2022 मध्ये होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवार, दि. 06 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व   सभागृहात होणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे. 000000

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांसमोरील आव्हाने व एड्स जनजागृतीपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न

    अलिबाग,दि.25 (जिमाका):-  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार (दि.23 ऑगस्ट ) रोजी  पी.एन.पी.कॉलेज अलिबाग येथे  जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ.सुहास माने व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.संजय माने यांचे नियोजन व प्राचार्य डॉ.ओमकार पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांसमोरील आव्हाने व एड्स जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.       यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी एड्सविषयी मार्गदर्शन करताना एचआयव्ही म्हणजे काय, एड्स म्हणजे काय त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी शास्त्रीय व सविस्तर माहिती दिली. तसेच एचआयव्ही संसर्गित असणाऱ्या व्यक्तीला देण्यात येत असलेल्या एआरटी औषधोपचार तसेच प्रत्यकाने लैंगिक संबंधाविषयी नैतिक मूल्ये पाळली पाहिजेत,असेही सांगितले. त्यामध्ये लग्नापूर्वी ब्रम्हचर्य पाळा, लग्नानंतर श्रीराम बना तसेच हा रोग पूर्णपणे बरा होईल असे कोणतेही औषधोपचार उपलब्ध  नसल्यामुळे एचआयव्ही/

पोलादपूरच्या उत्तरवाहिनी सावित्री नदीपात्रात रिव्हर राफ्टिंगची ट्रायल नरवीर रेस्क्यू टिमचा उपक्रम

    अलिबाग,दि.24 (जिमाका) :- जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरणापासून लोहारे तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंगची आज ट्रायल घेण्यात आली.                 यावेळी कोलाडचे महेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर रेस्क्यू अँड ॲडव्हेंचरचे अध्यक्ष रामदास कळंबे, जयेश जगताप, विक्रम भिलारे, दिपक उतेकर, सुमित दरेकर व टिमचे सदस्य उपस्थित होते.                 पोलादपूर तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळावा तसेच पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी नरवीर रेस्क्यू अँड ॲडव्हेंचर यांच्या माध्यमातून चळवळ सुरू करण्यात येत आहे. यानुषंगाने रानबाजिरे धरण ते लोहारमाळ तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंगची ट्रायल रन घेण्यात आली असल्याचे यावेळी रामदास कळंबे यांनी सांगितले. 0000000

पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक अन् देवपूरवाडीची स्वदेस फाऊंडेशनतर्फे झाली स्वप्नातील गाव म्हणून निवड

    अलिबाग,दि.24 (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त "स्वप्नातील गाव" म्हणून पोलादपूर तालुक्यातील रानवडी बुद्रुक आणि देवपूरवाडी ही गावे स्वदेस फाऊंडेशनतर्फे स्वप्नातील गावे म्हणून घोषित करण्यात आली. स्वदेस फाऊंडेशनचे महाप्रबंधक तुषार इनामदार यांनी दोन्ही गावांमध्ये जाऊन ग्रामसुधार कमिटीला या स्वप्नातील गाव निवडीचे पत्र सुपूर्द केले.               पोलादपूर तालुक्यातील काटेतळी गावाने ग्रामस्वच्छता अभियानामध्ये राज्याची सुमारे 1 कोटीपर्यंत बक्षिसे प्राप्त करून गावाचा विकासात्मक कायापालट केला. त्यासाठी आवश्यक ग्रामस्थांची एकता रानवडी बुद्रुक येथील ग्रामस्थांमध्येही दिसून येत आहे. यामुळे रानवडी बुद्रुक या गावाने तंटामुक्ती, निर्मलग्राम, वनग्राम तसेच अन्य पारितोषिके पुरस्कार प्राप्त केल्याने आता स्वप्नातील गाव संकल्पनेद्वारे स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून या गावाने विकास साध्य करावा, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केले.                यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्या सुमन कुंभार, स्वदेस फाऊंडेशनचे

गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत शासनाच्या सूचना जारी

    अलिबाग, दि.24 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासियांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते. राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरून जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतुकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोंडी होते, या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 115 मधील तरतूदीचा वापर करुन सार्वजनिक हितास्तव पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 (रा.म.क्र.जुना क्र. 17) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी) येथून होणाऱ्या वाळू-रेतीच्या ट्रकची तसेच मोठया- अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत शासनाकडून विविध सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.   गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास, मूर्तीचे आगमन दि.27 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून ते दि.31ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचा रायगड जिल्हा दौरा

Image
अलिबाग, दि.23 (जिमाका):- केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल हे रायगड जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांचा बुधवार, दि.24 ऑगस्ट 2022 रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे:- सकाळी 7:50 वाजता हॉटेल कोकण रिट्रीट, खांब रोहा येथून पाली, सुधागड कडे प्रयाण. सकाळी 8:30 वाजता श्री अष्टविनायक बल्लाळेश्वर गणपती मंदिर, पाली, सुधागड येथे आगमन. सकाळी 8:50 वाजता श्री अष्टविनायक बल्लाळेश्वर गणपती मंदिर येथून भक्तनिवास क्र.1, पाली येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याकरिता आयोजित बाईक रॅली कार्यक्रमास्थळी आगमन. सकाळी 9:15 वाजता पाली येथून वावे, सुधागड कडे प्रयाण. सकाळी 9:30 वाजता वावे, सुधागड येथे आगमन व बूथ कार्यकर्ता संवाद कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता वावे, सुधागड येथून पेण कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता महात्मा गांधी ग्रंथालय, पेण येथे आगमन व समाजातील दुर्बल घटकांच्या प्रतिनिधींशी चर्चा. सकाळी 11:45 वाजता महात्मा गांधी ग्रंथालय, पेण येथून जगदंबा मंदिर हॉल, वाशी गाव कडे प्रयाण. दुपारी 12:05 वाजता जगदंबा मंदिर हॉल, वाशी गाव येथे आगमन व गावातील स्थानिक रहिवाशांशी बैठक/

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांना एक रकमी रु.10 हजार व‍ रु.25 हजार विशेष गौरव पुरस्कार

अलिबाग, दि.23 (जिमाका):- राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू , साहित्य , संगीत , गायन , वादन , नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते , यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे , संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगिरी करणारे , पूर,जळीत,दरोडा, अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्ती मध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश / राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक / पत्नी / पाल्यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी एक रकमी रू .10000/- व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रू .25000/- चा पुरस्कार , शाल , श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्या ची तरतूद आहे . विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक / पत्नी / पाल्यांना   विशेष गौरव पुरस्कार मिळविण्यासाठी पुढील प्रमाणे अर्हता प्राप्त   करणे आवश्य्क आहे :- खेळातील पुरस्कार- राष्ट्रीय / राज्य स्तरावर खेळात भाग घेतलेला आहे काय ?, घेतला असल्यास कोणत्या खेळात भाग घेतला ?, राष्ट्रीय / रा