जे.एस.एम.महाविद्यालय अलिबाग येथे युवा महोत्सवाचे आयोजन

 


 

    अलिबाग,दि.25 (जिमाका):- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भव्य व्यासपीठ प्राप्त व्हावे, म्हणून मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षातर्फे दरवर्षी जिल्हा व विद्यापीठ स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.  त्यानुषंगाने जे.एस.एम. महाविद्यालय अलिबाग येथे शुक्रवार, दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वा. युवा महोत्सवाच्या जिल्हास्तरीय फेरीचे आयोजन आले आहे. 

      या युवा महोत्सवात अलिबाग, पेण, महाड, माणगाव, रोहा, मुरुड, तळा, श्रीवर्धन, म्हसळा पोलादपूर, सुधागड या तालुक्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी या दिवशी संगीत, नाट्य, नृत्य, वक्तृत्व, वादविवाद, चित्रकला, रांगोळी अशा विविध  प्रकारच्या एकूण 32 स्पर्धांमध्ये सहभाग घेतील.

     युवा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,ॲड. गौतम पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. याप्रसंगी युवा महोत्सवाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व सिनेदिग्दर्शक अभिषेक जावकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास कक्षाचे संचालक डॉ.सुनील पाटील व सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक श्री.निलेश सावे यांची उपस्थिती यावेळी राहणार आहे, असे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी कळविले आहे. 

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक