Posts

Showing posts from November 27, 2022

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जलतरण तलाव खेळाडू तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु

    अलिबाग,दि.02 (जिमाका) : जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहुली अलिबाग येथे असलेला 25 x21 मीटर आकाराचा जलतरण तलाव निवडणूक व कोविडमुळे सन 2018 पासून बंद होता.   आता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार हा जलतरण तलाव खेळाडू तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा कार्यालयाने या जलतरण तलावाची योग्य ती दुरुस्ती व साफसफाई करुन घेतली असून आता नागरिकांसाठी हा तलाव सुसज्ज झाला   आहे. या तलावामध्ये पोहण्याकरिता शालेय/महाविद्यालयीन   विद्यार्थ्यांकरिता शुल्क रु.500   व   इतर नागरिकांसाठी रु.750 असे राहील.     तलावामध्ये पोहण्यासाठी येताना पोहता येणे आवश्यक असून त्याबाबतचे हमीपत्र, आधारकार्ड व फिटनेस प्रमाणपत्र ही कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. यासंदर्भात अलिबाग तालुक्यातील तसेच इतर तालुक्यतील नागरिकांनी अधिक माहितीसाठी अभिजित भगत   यांच्या मो.9881674298 वर संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त खेळाडूंनी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे. ०००००००

परवानाधारक रिक्षाचालकांना जाहीर केलेल्या पॅकेजसंदर्भातील योजनेची ऑनलाईन प्रणाली बंद

    अलिबाग,दि.02 (जिमाका): राज्यात मार्च 2021 पासून कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान “ ब्रेक द चेन ” अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे दुर्बल घटकांना तातडीची आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने परवानाधारक रिक्षा चालकांना प्रत्येकी रु.1 हजार 500 एकवेळेचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऑनलाईन पध्दतीने शेवटचा अर्ज दि.31 डिसेंबर 2021 रोजी प्राप्त झाला होता. तसेच ऑफलाईन पध्दतीने दि.25 मार्च 2022 रोजी प्राप्त झाला. त्यानंतर गेल्या 4 ते 6 महिन्यापासून या योजनेत एकही अर्ज प्राप्त न झाल्याने शासन मान्यतेने परवानाधारक रिक्षाचालकांना जाहीर केलेल्या पॅकेजसंदर्भात योजनेची ऑनलाईन प्रणाली शासनाद्वारे बंद करण्यात आली असून याबाबत सर्व रिक्षा चालक-मालक संघटनांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण श्री.महेश देवकाते यांनी कळविले आहे. 00000000

महाड येथील को.ए.सो.वि.ह.परांजपे विद्यामंदिरामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रिल यशस्वीरित्या संपन्न

Image
    अलिबाग,दि.02 (जिमाका): नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्यामार्फत राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शाळांमध्ये आपत्तीचे मॉकड्रिल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यशिक्षण विभाग व युएनडीपी तसेच महाराष्ट्र आपत्ती विभाग यांच्या पुढाकाराने रिका इंडिया या संस्थेच्या सहाय्याने राज्यभरात असे मॉकड्रिल होणार आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील महाड मधील को.ए.सो. वि.ह.परांजपे विद्यामंदिर, महाड या शाळेची निवड करण्यात आली होती. त्यानुसार को.ए.सो. वि.ह.परांजपे विद्यामंदिर, महाड   येथे बुधवार दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.40 वा. मॉकड्रिल कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. सकाळी नागरी संरक्षण दलाचे अधिकारी व त्यांच्या सहकार्याने शाळेत सकाळी 8.00 ते 11.00 यावेळेत शाळेतील इ.9 वी च्या वर्गातील 87 विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक सरावाचे प्रशिक्षण दिले. यामध्ये विद्यार्थ्यांना धोक्याची आगविमोचन, स्थलांतर जागा, व जखमींना मदत कार्य कसे याचे प्रात्यक्षिके दाखवून नैसर्गिक आपत्तीचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर 11.40 वा. मॉक ड्रिलला सुरवात झाली. 12.1

सुंदरराव मोरे महाविद्यालयात एड्स जनजागृती प्रचारफेरी व विशेष व्याख्यान कार्यक्रम संपन्न

Image
    अलिबाग,दि.02 (जिमाका) : जागतिक एड्स दिन व सप्ताहानिमित्त येथील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ग्रामीण रुग्णालय पोलादपूरच्या एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (आयसीटीसी सेंटर) यांच्या सहकार्याने रेड रिबन क्लब अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सौ.भाग्यरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली (दि.01 डिसेंबर 2022) रोजी विशेष व्याख्यान व जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. राम बरकुले व प्रा. डॉ.जयश्री जाधव-पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आयसीटीसी विभागाच्या सौ.सीता जाधव, सक्षम मायग्रंट टी आय या सामाजिक संस्थेचे श्री. कुणाल खुटवळ, श्री.रोशन पहेलकर   आदी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना सक्षम सामाजिक संस्थेचे कुणाल खुटवळ यांनी तरुण पिढीने एड्स या मानवजातीला आव्हान ठरू पाहणाऱ्या आजाराबद्दल योग्य ती शास्त्रीय माहिती प्राप्त करून त्याच्या आधारे समाजाती

माणगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात 01 डिसेंबर विश्व एड्स दिवस साजरा

    अलिबाग,दि.02 (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर ता.माणगाव येथे   (दि.01 डिसेंबर 2022) रोजी विश्व एड्स दिवस स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांच्या वतीने   साजरा करण्यात आला.   प्रभातकालीन प्रार्थना सभेत स्काऊट अँड गाईडच्या विद्यार्थ्यांनी एड्स आजाराविषयी तसेच एड्स आजार   वाढीची कारणे आणि एड्स आजारापासून आपल्याला, समाजाला कसे सुरक्षित राहता येईल, या विषयावर विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. एड्स या आजारावर विद्यार्थ्यांकडून प्रश्नमंजुषा घेण्यात आली. स्काऊटचे विद्यार्थी संचित कासारे, मयुरेश पाटील, गौरव बहिरम, यश तांडेल व सिद्धार्थ घरत   या विद्यार्थ्यांनी प्रभातकालीन प्रार्थना सभेत आपला सहभाग नोंदविला.   विद्यालयाचे प्राचार्य श्री.के.वाय.इंगळे, विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री.गणेश आडोडे व समस्त शिक्षक वृंद प्रार्थना सभेत उपस्थित होते. 0000000

पनवेल, तळोजा, खारघर, खाडीमध्ये वाळू माफियांविरुध्द धडक कारवाई कोटयवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

Image
    अलिबाग,दि.02 (जिमाका) : जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशान्वये अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव याच्या नेतृत्वाखाली पनवेल, तळोजा, खारघर, खाडीमध्ये वाळू माफियांविरुध्द काल दि.1 डिसेंबर 2022 रोजी धडक कारवाई करण्यात आली असून यामध्ये 4 मोठया बार्ज, 4 मध्यम बार्ज व 2   छोटया संक्शन पंपच्या बोटी अशा 10 बोटीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. खारघर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात 6 बार्ज देण्यात आल्या असून   संबधितांवर 41 डी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 2 बोटी एन.आर.आय. पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या असून संबधितांविरुध्द एन.आर.आय. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 बोट गाळामध्ये फसली असल्याने ती बोट जागेवरच नष्ट करण्यात आली व 1 बोट एन.आर.आय. ताब्यात घेतली असून त्याबाबतची पुढील कार्यवाही चालू आहे. तसेच 5 संक्शन पंपही नष्ट करण्यात आले.   या कारवाई अंतर्गत कोटयवधी रुपयांचा मुद्देमाल पाण्यामधून जप्त करुन संबधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 000000

कर्जत येथे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन सर्व उपविभागीय स्तरावर आयोजित होणाऱ्या महामेळाव्यांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

    अलिबाग,दि.01 (जिमाका) : जिल्हयामध्ये सर्वसामान्यांना उपविभागीय स्तरावर राज्य व केंद्र शासनाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने शनिवार, दि.03 रोजी 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून “ केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाचा महामेळावा ” कर्जत उपविभागीय स्तरावर रॉयल गार्डन मंगल कार्यालय सभागृह, कर्जत येथे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या माध्यमातून खालापूर तालुक्यातील विविध शासकीय विभागातील विविध सेवा व योजनांची माहिती तळागाळातील जनसामान्य शेतकरी व नागरिकांपर्यंत स्टॉल लावून पोहोचविण्यात येणार आहे. यावेळी स्वयंरोजगार, फळ-भाजी विक्रेते, वृत्तपत्रे विक्रेते, रिक्षा-टॅक्सी चालक, शेतमजूर, फेरीवाले, पशुसंवर्धन, मध गोळा करणे, मिठागरावरील कामगार, कुक्कुटपालन, मत्स्य प्रक्रिया व मच्छीमार, बांधकाम मजूर, वीटभट्टी कमगार, मातीकाम कामगार, वाळू माती उपसा कामगार, बांधकाम रंगकाम, पीओपी कामगार, केबल टीव्ही व्यवसायिक, पथनाटय कामगार, विमा एजंट, बँक एजंट, पत्रकार, बचतगट, किरणा दुकानदार, दूधवाले, पानवाले, आशा-अंगणवाडी सेविका, घरेलू कामगार, बोट/ नाव

जल जीवन सर्वेक्षण 2023 अंतर्गत जिल्ह्यात “स्वच्छ जल से सुरक्षा अभियान” यशस्वीपणे राबविणार---मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

    अलिबाग,दि.01 (जिमाका) : शुदध व सुरक्षित पिण्याचे पाणी ,घरोघरी नळ कनेक्शन देण्यासाठी शासनाकडून जल जीवन मिशन अभियान सुरु करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींमधील सर्व सार्वजनिक संस्थाना शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांचा उद्देश आहे. ग्रामपंचायत स्तरांवरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवणे, ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे.   यांतर्गत दि.1 डिसेंबर ते दि.31 डिसेंबर 2022 या कालावधीत केंद्र शासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या जल जीवन सर्वेक्षण 2023 अंतर्गत “ स्वच्छ जल से सुरक्षा अभियान ” जिल्ह्यात राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार असून त्याचे अहवाल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.तसेच जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे.   महसूल गावनिहाय पाच महिलांना प्रशिक्षित करण्यात आले असून त्याच्या माध्यमांतून पिण्याच्या पाणी नमुन्यांची

पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयात पोलीस भरतीबाबत प्रशिक्षण शिबीर संपन्न

            अलिबाग,दि.01 (जिमाका) : जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र " गरुडझेप" मार्फत , पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालय येथे पोलीस भरतीबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये पेण तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे व नायब   तहसिलदार श्रीमती प्रज्ञा राजमाने यांनी   प्रशिक्षणार्थींना पोलीस भरतीच्या अनुषंगाने परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे, पुस्तकांची उपलब्धता, पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम व शारिरीक क्षमता चाचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे उपस्थित विद्यार्थ्यांना गरुडझेप स्पर्धा परीक्षा उपक्रम आणि “ गरुडझेप ” ॲपची माहिती तसेच हे ॲप डाऊनलोड कसे करावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. ००००००

मुरुड येथील वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात पोलीस भरतीबाबत प्रशिक्षण शिबीर संपन्न

    अलिबाग,दि.01 (जिमाका) : जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र " गरुडझेप" मार्फत उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन अमित शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी,अलिबाग प्रशांत ढगे   व तहसिलदार रोहन शिंदे यांच्या पुढाकारातून वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, मुरुड येथे पोलीस भरतीबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 200 विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये मुरुड-जंजिरा निवडणूक नायब तहसिलदार, अमित पुरी, मुरुड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन वाणी व पोलीस कर्मचारी परेश म्हात्रे यांनी प्रशिक्षणार्थींना पोलीस भरतीच्या अनुषंगाने परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे, पुस्तकांची उपलब्धता, पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम व शारिरीक क्षमता चाचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे उपस्थित विद्यार्थ्यांना गरुडझेप स्पर्धा परीक्षा उपक्रम आणि “ गरुडझेप ” ॲपची माहिती देण्यात आली तसेच हे ॲप डाऊनलोड कसे करावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. ०००००००

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार,रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सर्वांनी योजनेचा लाभ घ्यावा --जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

                                अलिबाग,दि.01(जिमाका): राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक, युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला काळानुरूप वाव देणारी सर्व समावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना ऑगस्ट 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे. तसेच दि. 11 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे या योजनेच्या स्वरुपाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जि ल्ह्या तील सुशिक्षित बेरोजगार , रोजगाराच्या प्रतिक्षेत असणा ऱ्या सर्वां नी योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा उद्यो ग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केले आहे.   योजनेची ठळक वैशिष्टये :- योजना पूर्णत: ऑनलाईन प ध्द तीने राबविण्यात येईल तसेच विहित निर्धा रि त कालावधीत प्रत्येक ट प्प्या वरील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. योजना उद्योग विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली व विकास आयुक्त (उद्

जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या शुभहस्ते एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना मोफत एआरटी औषधे हस्तांतरित आर.सी.एफ, थळ यांनी केले मोलाचे सहकार्य

  अलिबाग,दि.01(जिमाका): 01   डिसेंबर   जागतिक   एड्स   दिनानिमित्त   प्रकल्प   संचालक   महाराष्ट्र   एड्स   नियंत्रण   सोसायटी,   वडाळा     मुंबई   यांच्या   मार्गदर्शनानुसार   तसेच जिल्हा   शल्यचिकित्सक डॉ.सुहास   माने व   जिल्हा कार्यक्रम   व्यवस्थापक   संजय   माने    यांच्या   नियोजनानुसार   प्रभात फेरीचे आयोजन करून   साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून   जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या शुभहस्ते व आर.सी.एफ.कंपनी थळ यांच्यामार्फत   सामाजिक बांधीलकी   जपत   एचआयव्ही संसर्गित व्यक्तींना मोफत एआरटी   औषधे हस्तांतरित करण्यात आली.    0000000

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर प्रभात फेरी संपन्न

  अलिबाग,दि.01(जिमाका): जागतिक   एड्स   दिनानिमित्त   जनजागृतीपर   जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,यांच्या   मार्गदर्शनानुसार   तसेच    जिल्हा   शल्यचिकित्सक डॉ.   सुहास   माने   यांच्या नियोजनानुसार प्रभात   फेरी आज येथे संपन्न झाली. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील,     पोलीस उपअधीक्षक श्री.जगदीश काकडे,    जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ॲड.अमोल शिंदे व   आर.सी.एफ.कंपनी, थळ येथील   कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडिलकर   यांच्या शुभहस्ते   हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली. या प्रभात फेरीकरिता   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या    अधिष्ठाता    डॉ. पूर्वा पाटील,   जिल्हा आरोग्य    अधिकारी    डॉ. सुधाकर मोरे,   अेआरटी सेंटरच्या नोडल अधिकारी डॉ.शितल जोशी, आर.सी. एफ. कंपनी थळ येथील   जनसंपर्क अधिकारी श्री.संतोष वझे, श्री. प्रमोद देशमुख,    लायन्स क्लब श्रीबागच्या अध्यक्षा   ॲड. कला पाटील, ॲड.निहा राऊत या उपस्थित होत्या.   ही प्रभात फेरीची    सुरुवात   जिल्हा   रुग्णालय   येथून होवून   एस.टी.स्टॅन्ड   ते