कर्जत येथे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन सर्व उपविभागीय स्तरावर आयोजित होणाऱ्या महामेळाव्यांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


 

अलिबाग,दि.01 (जिमाका) : जिल्हयामध्ये सर्वसामान्यांना उपविभागीय स्तरावर राज्य व केंद्र शासनाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने शनिवार, दि.03 रोजी 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाचा महामेळावा कर्जत उपविभागीय स्तरावर रॉयल गार्डन मंगल कार्यालय सभागृह, कर्जत येथे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या माध्यमातून खालापूर तालुक्यातील विविध शासकीय विभागातील विविध सेवा व योजनांची माहिती तळागाळातील जनसामान्य शेतकरी व नागरिकांपर्यंत स्टॉल लावून पोहोचविण्यात येणार आहे.

यावेळी स्वयंरोजगार, फळ-भाजी विक्रेते, वृत्तपत्रे विक्रेते, रिक्षा-टॅक्सी चालक, शेतमजूर, फेरीवाले, पशुसंवर्धन, मध गोळा करणे, मिठागरावरील कामगार, कुक्कुटपालन, मत्स्य प्रक्रिया व मच्छीमार, बांधकाम मजूर, वीटभट्टी कमगार, मातीकाम कामगार, वाळू माती उपसा कामगार, बांधकाम रंगकाम, पीओपी कामगार, केबल टीव्ही व्यवसायिक, पथनाटय कामगार, विमा एजंट, बँक एजंट, पत्रकार, बचतगट, किरणा दुकानदार, दूधवाले, पानवाले, आशा-अंगणवाडी सेविका, घरेलू कामगार, बोट/ नावेचा व्यवसाय, डिलीव्हरी बॉय, कुरियर सेवा, बस/कार/ट्रक चालक या व अशा इतर विविध 300 उद्योगांमधील असंघटित कामगारांची ई-श्रम पोर्टल वर नोंदणी करण्याकरिताही स्वतंत्र स्टॉल लावण्यात येणार आहे.

या नोंदणीकरिता असंघटित कामगाराचे वय 16 ते 59 असे असावे. नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, बँकेचे पासबुक, मोबाईल क्रमांक (स्वत:चा किंवा कुटुंबातील व्यक्तीचा) असणे आवश्यक आहे.

तरी जास्तीत जास्त असंघटित कामगारांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाचा महामेळाव्यातील   या सुविधेचा लाभ घेवून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक