Posts

Showing posts from January 3, 2021

शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन कोविड-19 लसीकरण मोहीम यशस्वी करावी --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

  वृत्त क्रमांक :- 23                                                                   दि.08 जानेवारी 2021   अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-   राज्यात कोविड 19 लसीकरण मोहीम लवकरच सुरु होणार आहे. त्या अगोदर लसीकरणाचा ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम म्हणून सर्व शासकीय रुग्णालयांमधून ड्राय रन घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बोर्ली पंचतन येथे भेट देऊन या ड्राय रन ची पाहणी केली. शासनाच्या आदेशानुसार कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या ड्राय रनला आजपासून सुरूवात झाली आहे. संपूर्ण राज्यात फ्रन्टलाईन वर्करसाठी पहिल्या टप्प्यात कोविड-19 लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला तसेच आरोग्य यंत्रणेलाही लसीकरण मोहिमेची परिपूर्ण तयारी करण्याबाबतचे निर्देश दिले असून रायगड जिल्ह्यासाठी 5लाख   लस दाखल होणार असून त्या प्राप्त झाल्याबरोबर जिल्ह्यात त्वरित लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे, असे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, बोर्ली पंचतन ग्रामीण

जिल्ह्यात “माझी कन्या भाग्यश्री” योजनेची प्रभावी अंमलबजावणी 208 लाभार्थीं मुलींच्या खात्यात 52 लाख रुपयांचे अनुदान वर्ग

    अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):- राज्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास सेवा योजनेनुसार माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार एका मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या माता पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या खात्यात 50 हजार रुपये आणि दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या खात्यात प्रत्येकी 25 हजारांचे अनुदान वर्ग केले जात आहेत. रायगड जिल्ह्यात या योजनेची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सुधारित “ माझी कन्या भाग्यश्री ” योजनेंतर्गत 208 लाभार्थीं मुलींच्या खात्यात 52 लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे या प्रमुख हेतूने माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजना 2016-17 मध्ये राबविण्

स्त्री-पुरुष समानतेचा विचार समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये प्रभावीपणे रुजायला हवा --जिल्हाधिकारी निधी चौधरी

    अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):- निसर्गाने स्त्री-पुरुष निर्माण केले, समाजव्यवस्था मात्र मानवाने निर्माण केली. यामध्ये स्त्री-पुरुष समानता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये प्रभावीपणे रुजवायला हवी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निरी चौधरी यांनी आज येथे केले. “ बेटी बचाव,बेटी पढाव,बेटी बढाव ” या उपक्रमांतर्गत गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.   यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, रेडिओलॉजिस्ट डॉ.सुहास ढेकणे, ॲड. नीला तुळपुळे, डॉ.ॲड. निहा अनिस, ॲड.नीता कोळी, ॲड. पल्लवी तुळपुळे, ॲड.वर्षा पाटील, डॉ.बसवराज लोहारे, डॉ.भास्कर जगताप, डॉ.प्रदीप इंगोले, डॉ.भाग्यरेखा पाटील, डॉ.अंकिता मते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, महिला व बालविकास संरक्षण अधिकारी श्रीमती एस.एम.वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सरला काळे, पोलीस हवालदार नीलम नाईक, प्रिया चौलकर, सामाजिक कार्यकर्ते स

जिल्ह्यात करोना लसीकरणाचा ड्राय रन सुरु झाला हो…!

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-   राज्यात कोविड 19 लसीकरण मोहीम लवकरच सुरु होणार आहे. त्या अगोदर लसीकरणाचा ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम म्हणून सर्व शासकीय रुग्णालयांमधून ड्राय रन घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज रायगड जिल्ह्यातही अलिबाग जिल्हा रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड आरोग्य केंद्र या चार ठिकाणी ड्राय रन घेण्यात आला. आज सकाळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन या ड्राय रनची पाहणी केली. शासनाच्या आदेशानुसार कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या ड्राय रनला आजपासून सुरूवात झाली आहे. संपूर्ण राज्यात फ्रन्टलाइन वर्करसाठी पहिल्या टप्प्यात कोविड-19 लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.   जिल्हा प्रशासनाकडूनही लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून आरोग्य यंत्रणाही परिपूर्ण तयारीत आहे. रायगड जिल्ह्यासाठी 5लाख   लस दाखल होणार असून त्या प्राप्त झाल्याबरोबर जिल्ह्यात त्वरित लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल

फिट इंडिया चळवळींतर्गत शाळांनी 10 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी--शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात

         अलिबाग,जि.रायगड,दि.07 (जिमाका):- मुलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी केंद्र सरकारने फिट इंडिया चळवळ सुरू केली आहे. या चळवळी अंतर्गत राज्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीबाबत शालेय स्तरावर चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळांनी दि.10 जानेवारीपर्यंत http:/schoolfitness.kheloindia.gov.in/static page/landing page.aapx या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.               फिट इंडिया चळवळीचा मुख्य उद्देश तंदुरुस्तीचे महत्त्व दैनंदिन जीवनामध्ये वाढविणे, हा असून सन 2022 पर्यंत भारतीयांना तंदुरुस्त बनविण्याचा संकल्प फिट इंडिया द्वारे करण्यात आला आहे. या चळवळी अंतर्गत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, आश्रमशाळा, विनाअनुदानित, अनुदानित शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या तंदुरुस्तीबाबत शालेय स्तरावर चाचणी घेण्यात येणार आहे.             या चाचणीद्वारे प्राप्त झालेली माहिती खेलो इंडियाच्या ॲपवर अपलोड करायची आहे. तसेच या वि

विद्यार्थ्यांचे सन 2020-21 चे शिष्यवृतीचे नवीन अर्ज तर 2019-20 करिता नूतनीकरणासाठी अर्ज सादर करावेत सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांचे महाविद्यालयांना आवाहन

                 अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :-   महाडिबीटी प्रणालीवर भारत सरकार शिष्यवृती  व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क या योजनेंतर्गत माहिती,अडचणीबाबत दि.04 जानेवारी 2021 रोजी येरला दंत महाविद्यालय, खारघर येथे  जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या बैठकीचे आयोजन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीत सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी उपस्थितांना सूचना दिल्या की, सर्व महाविद्यालयांनी सन 2020-21 करिता शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज व सन 2019-20 करिता नूतनीकरणाचे अर्ज भरावेत.  त्याबाबत विद्यार्थ्यांना सहकार्य करावे व पाठपुरावा करावा.  तसेच महाविद्यालय सुरु नसल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास त्रास होऊ नये, यासाठी महाविद्यालयांमार्फत बोनाफाईड तसेच मार्कशिट इत्यादी आवश्यक कागदपत्रे ही ई-मेल व घरपोच देण्यात याव्यात.             महाविद्यालयांनी सन 2011-12 ते 2017-18 या कालावधीतील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत.  सन 2011-12 ते सन-2017-18 कालावधीतील महाविद्यालयाने पुढील 7 दिवसात प्रस्ताव सादर न केल्यास 

‘महात्मा गांधी स्मृती निलय’ बैठक मंत्रालयात संपन्न

Image
    अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :-   महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीच्या औचित्याने शिवाजीनगर, पुणे येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन खादी व ग्रामोद्योग विभागामार्फत उपलब्ध जागी ‘महात्मा गांधी स्मृती निलय’ या माहिती व वस्तू संग्रहालय स्थापन करण्यासाठी प्रस्ताव मंजूर आहे. त्यानुषंगाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे उपस्थित होत्या.              यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, महात्मा गांधीजींच्या जीवनप्रवास आधुनिक माध्यमातून सर्वांना पहाता येईल, त्यासाठी पुणेसारख्या महत्त्वाच्या शहरात स्थापन होणारे ‘महात्मा गांधी स्मृती निलय’ हे संग्रहालय येणाऱ्या पीढीला निश्चितच मार्गदर्शक व दिशादर्शक ठरेल. 2021 हे वर्ष महात्मा गांधी जयंतीचे 151 वे वर्ष असून या नियोजित संग्रहालयाच्या पुढील तांत्रिक बाबीं व निधी उपलब्धतेसाठी ग्रामविकास विभागामार्फत प्रस्ताव वित्त विभागास तातडीने सादर करण्याबाबतचे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळ

राज्यात बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग नाही पशुसंवर्धन विभागाची माहिती

    अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :-   राज्यात वन्य, स्थलांतरीत पक्षी अथवा कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही. त्यामुळे कुक्कुटपालक तसेच अंडी आणि मांस खाणाऱ्या नागरिकांनी घाबरण्याची परिस्थिती नाही. परंतु व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालनाच्या ठिकाणी काही बाब आढळून आल्यास त्वरीत पशुवैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. बर्ड फ्लू रोगाचा प्रादूर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ या राज्यांमधील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. हिमाचल प्रदेशामध्ये कांगडा जिल्ह्यातील पॉंग धरणाच्या परिसरात सायबेरिया आणि मंगोलिया देशांमधून स्थलांतरीत झालेल्या बदकांमध्ये हा प्रादूर्भाव आढळून आला आहे. निशाद (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हायसिक्‍युरिटी निमल डिसीजेस, भोपाळ) या राष्ट्रीय संस्थेने बर्ड फ्लु रोगाचा एच5एन1 स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान केले आहे. हिमाचल प्रदेशातील वन विभागांद्वारे पानथळ जमिनीशेजारच्या भागामध्ये या रोगाच्या सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राजस्थान राज्यातील झालवाड आणि जोधपूर आणि मध्यप्र

पेण येथील आदिवासी कुटुंबातील अत्याचारग्रस्त बालिकेच्या कुटुंबाला सामाजिक न्याय विभागाकडून रु.4 लाख 12 हजार 500 ची आर्थिक मदत

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :- पेण येथे दि. 30 डिसेंबर 2020 रोजी आदिवासी समाजातील तीन वर्षीय बालिकेला घरातून उचलून नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती.   या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, रायगड तथा अध्यक्ष जिल्हा दक्षता संनियंत्रण समिती, रायगड आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 सुधारित अधिनियम,2015 व सुधारित नियम,2016 अंतर्गत तातडीच्या मदतीस मंजूरी दिली. यानुषंगाने अत्याचारग्रस्त बालिकेच्या कुटुंबातील वारस म्हणून वडील जयराम पांडुरंग वाघमारे आणि आई सौ.निकिता वाघमारे यांना रु.4 लाख 12 हजार 500 रुपयांचा धनादेश आणि एक महिना पुरेल इतक्या अन्नधान्याचे किट काल सायंकाळी (दि. 5 जानेवारी ) सुपूर्द करण्यात आले.   पालकमंत्री कु.आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड सुनिल जाधव यांनी ही कार्यवाही तातडीने पूर्ण केली.   अत्याचारग्रस्त बालिकेच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश देताना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड सुनिल जाधव यांच्यासह पेण उप

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांचे कोविड योगदान महाराष्ट्र कधीच विसरणार नाही !---पालकमंत्री कु.आदिती तटकरे

                 अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :- या शासनाने विविध खात्यांना आर्थिक बळ देत महत्वाचे प्रकल्प हाती घेण्याचा निर्धार केला होता. त्याच काळात अधिवेशन सुरू होते. नव्या सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय घोषित करून काम हाती घेतले असतानाच करोनाचे संकट उभे राहिले. या परिस्थितीत जागतिक स्तरावर अचानक उद्भवलेल्या कोविडचा सामना करीत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत कुशलतेने प्रशासनाच्या सहकार्याने परिस्थिती हाताळून आटोक्यात आणली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कोविड योगदान अवघा महाराष्ट्र कधीही विसरणार   नाही, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग, खनिजकर्म, पर्यटन, राजशिष्टाचार राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काल (दि.5 जानेवारी ) येथे केले.   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते 200 कोविड योद्ध्यांचा कोविड संजीवनी पुरस्कार प्रदान सोहळा व या निमित्ताने महिलांसाठी विशेष हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन पनवेल संघर्ष समिती यांच्या पुढाकारातून पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात करण्यात आले होते, त्याव

15 जानेवारीला जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींमध्ये 299 मतदान केंद्रांवर होणार प्रत्यक्ष मतदान तर मतमोजणी 18 जानेवारीला

  सुधारित वृत्त क्रमांक :- 12                                                           दिनांक :- 06 जानेवारी 2021     अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :- एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे. त्यापैकी 78 ग्रामपंचायतींमधील एकूण 299 मतदान केंद्रांवर दि.15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे                 या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान शुक्रवार, दि.15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी दि.सोमवार दि.18 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.                या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीकरिता नामनिर्देशन सादर केलेल्या अर्जातील वैध,अवैध व माघार घेतलेल्या अर्जांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे:- अलिबाग- एकूण 140 अर्ज, त्यातील वैध 137, अवैध 3, माघार 57 एकूण शिल्लक 80. पेण- एकूण 181 अर्ज, त्यातील वैध 179, अवैध 2, माघार 69 एकूण शिल्लक 110. पनवे

15 जानेवारीला जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींमध्ये 205 मतदान केंद्रांवर होणार प्रत्यक्ष मतदान तर मतमोजणी 18 जानेवारीला

अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :- एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे. त्यापैकी 78 ग्रामपंचायतींमधील एकूण 205 मतदान केंद्रांवर दि.15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे                या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान शुक्रवार, दि.15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी दि.सोमवार दि.18 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.               या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीकरिता नामनिर्देशन सादर केलेल्या अर्जातील वैध,अवैध व माघार घेतलेल्या अर्जांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे:- अलिबाग- एकूण 140 अर्ज, त्यातील वैध 137, अवैध 3, माघार 57 एकूण शिल्लक 80. पेण- एकूण 181 अर्ज, त्यातील वैध 179, अवैध 2, माघार 69 एकूण शिल्लक 110. पनवेल- एकूण 691 अर्ज, त्यातील वैध 684, अवैध 7, माघार 252 एकूण शिल्लक 432.  उरण- एकूण 247 अर्ज, त्यातील वैध 236, अवैध 11, माघार 64 एक

माजी सैनिक/माजी सैनिक विधवांचे पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज भरण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

            अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका):- सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षातील पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ऑनलाईन पध्दतीने www.ksb.gov.in या संकेत स्थळावर अर्ज भरावयाची अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.त्यानंतर अपलोड केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी   नोंद घ्यावी.       अधिक माहितीकरिता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांचे दूरध्वनी   क्रमांक 02141-222208 वर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेटावे. त्याचबरोबर केंद्रिय सैनिक बोर्डच्या www.ksb.gov.in या संकेतस्थळावरून आधिक माहिती प्राप्त करून घ्यावी.       जिल्हयातील 60 टक्के   पेक्षा   जास्त गुण मिळविलेल्या   माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन   जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग मेजर सुभाष सासने (निवृत)   यांनी केले आहें. ००००००

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

    अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका):- मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा व   पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या अविस्मरणीय कार्याचा स्मरण करण्याचा आजचा दिवस.     मराठी पत्रकारितेने सशक्त भारतीय लोकशाहीच्या आणि    सुदृढ समाजाच्या निर्मितीत आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो वा सामान्य माणसाचा आवाज असो, मराठी पत्रकारितेमुळे त्यास बळच मिळाले आहे.              पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मराठी पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करताना समस्त पत्रकार बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. 000000

दुचाकी वाहनांसाठी MH06CE ही नवीन मालिका दि.12 जानेवारी पासून होणार सुरु

  अलिबाग,जि.रायगड,दि.05 (जिमाका) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयाची दुचाकी वाहनांसाठी MH06 CE ही नवीन मालिका दि. 12 जानेवारी 2021 पासून सुरु होणार आहे. ज्या वाहनधारकांना आकर्षक क्रमांक आगाऊ आरक्षित करावयाचा आहे, त्यांनी त्या वाहन क्रमांकासाठी असलेल्या विहित शुल्काच्या रकमेचा धनाकर्ष   दि. 12 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत कार्यालयात वरिष्ठ लिपीक (खाजगी वाहन विभाग) यांच्याकडे सादर करावा. धनाकर्ष विशेषतः राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. धनाकर्ष DY. RTO, PEN यांच्या नावे असावा. एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जदारांची यादी त्याच दिवशी सायंकाळी 05.00 वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर लावली जाईल. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकासाठी जादा शुल्काचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात दि. 12 जानेवारी 2021 रोजी वरिष्ठ लिपिक (खाजगी वाहन विभाग) यांच्याकडे सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत सादर करावा. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकाचा लिलाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण या

100 टक्के घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करणारा उरण तालुका ठरला राज्यात पहिला

अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका) : प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबावणी करण्यात येत असून जिल्ह्यातील उरण तालुक्यात 100 टक्के घरांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे 100 टक्के घरांना नळाने पाणी पुरवठा करणारा उरण तालुका राज्यात प्रथम ठरला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात उरण तालुक्यात नळ कनेक्शन जोडणीच्या उद्दिष्टांच्या 238.10 टक्के काम करण्यात आले आहे.       केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली.  त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात उल्लेखनीय काम करण्यात आले आहे.               जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभि

महाडीबीटी पोर्टल योजना अर्ज एक-योजना अनेक अर्ज भरण्यास दि.11 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

  अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका) : कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “ शेतकरी योजना ” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.       महा डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील “ शेतकरी योजना ” हा पर्याय निवडावा.   शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व तो नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करू

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन, पुणे करणार रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी, शाळांचा सन्मान शाळेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पाठवण्याचे आवाहन

अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका) : पुण्यातील सूर्यदत्ता एज्यूकेशन फाउंडेशनच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत शाळेत प्रथम आलेल्या व 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्या शाळेचा सन्मान करण्यात येणार आहे.   एक हजार रुपये, प्रशस्तीपत्र, मानचिन्ह   देऊन विद्यार्थ्यांचा, तर प्रशस्तीपत्र व मानचिन्ह   देऊन मुख्याध्यापकांचा सन्मान केला जाणार आहे. 'सूर्यदत्ता'च्या “ सूर्यदत्ता विद्यार्थ्यांच्या गावी ” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा व त्यांचा गौरव करण्याचा हा कार्यक्रम होणार आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात सूर्यदत्ता हा उपक्रम राबवत आहे. याआधी   नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अहमदनगर   आदी जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठीचा हा कार्यक्रम रोहा   येथे पुढील आठवड्यात होणार असून, त्याची सविस्तर माहिती लवकरच कळवली जाईल. जे विद्यार्थी २०२० मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत आपल्या शाळेत पहिले आले असतील, त्यांनी किंवा त्यांच्या शाळांनी   संस्थेशी   संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका व इतर तपशील सादर करावयाचा आह

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कलम 144 नुसार सुधारित प्रतिबंधात्मक आदेश केले जारी

              अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका) : फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार रायगड पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि.01 डिसेंबर 2020 रोजीच्या सकाळी 06.00 वा. पासून ते दि.31 डिसेंबर 2020   रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत शासनाच्या अधिसूचनेत नमूद प्रतिबंधित केलेली कृत्ये करण्यास मनाई राहील, असे आदेश जारी करण्यात आले होते, आता शासनाकडून नव्याने लॉकडाऊन कालावधी दि.31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवून सुधारित आदेशान्वये (Easing of Restrictions & Phasewise opening of lockdown. - MISSION BEGIN AGAIN) लागू केलेले निर्बंध तसेच सुरु करण्यास मान्यता दिलेल्या बाबी यापुढेही सुरु राहतील, असे निर्देश देण्यात आले आहेत.              त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 च्या तरतुदीनुसार रायगड पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि.01 जानेवारी 2021 रोजीच्या सकाळी 6.00 वा. पासून ते दि.31 जानेवारी 2021 रोजीचे रात्री 12.00 वा. पर्यंत नव्याने प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. या अधिसूचनेद्वारे दिलेल्या अथवा य