दुचाकी वाहनांसाठी MH06CE ही नवीन मालिका दि.12 जानेवारी पासून होणार सुरु

 


अलिबाग,जि.रायगड,दि.05 (जिमाका) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयाची दुचाकी वाहनांसाठी MH06 CE ही नवीन मालिका दि. 12 जानेवारी 2021 पासून सुरु होणार आहे. ज्या वाहनधारकांना आकर्षक क्रमांक आगाऊ आरक्षित करावयाचा आहे, त्यांनी त्या वाहन क्रमांकासाठी असलेल्या विहित शुल्काच्या रकमेचा धनाकर्ष  दि. 12 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत कार्यालयात वरिष्ठ लिपीक (खाजगी वाहन विभाग) यांच्याकडे सादर करावा. धनाकर्ष विशेषतः राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. धनाकर्ष DY. RTO, PEN यांच्या नावे असावा. एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जदारांची यादी त्याच दिवशी सायंकाळी 05.00 वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर लावली जाईल. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकासाठी जादा शुल्काचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात दि. 12 जानेवारी 2021 रोजी वरिष्ठ लिपिक (खाजगी वाहन विभाग) यांच्याकडे सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत सादर करावा. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकाचा लिलाव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांच्या दालनात दि.13 जानेवारी 2021 रोजी दुपारी 03.00 वाजता होईल, याची नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक