Posts

Showing posts from March 31, 2024

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी -- जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
    रायगड(जिमाका)दि.5:-  रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश  जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप भरत वाघमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, तहसिलदार  उमाकांत कडनोर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. तसेच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह स

मतदान यंत्रांची 7 विधानसभा संघनिहाय प्रथम सरमिसळ प्रक्रिया पूर्ण-- जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
    रायगड जिमाका दि.5:- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 32 रायगड आणि 33 मावळ लोकसभा मतदार संघातील 7  विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार ई व्ही एम हीव्हीपॅट यंत्राची  प्रथम सरमिसळ आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. ही प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ऑनलाईन पध्दतीन ही सरमिसळ करण्यात आली.  जिल्ह्यातील मतदार संख्येच्या प्रमाणानुसार 2 हजार 719 मतदान केंद्र आहेत. सध्या रायगड जिल्ह्यासाठी 6 हजार 780 बॅलेट युनिट, 3 हजार 774 कंट्रोल युनिट तर 3 हजार 952 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या सर्व विधानसभा मतदार संघात मतदान केंद्राच्या 138 टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट वाटप करण्यात येणार आहे. तर

मतदार जनजागृतीसाठी गीतमाला निर्मिती! जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सिडीचे प्रकाशन

    रायगड(जिमाका)दि.2:- रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मतदार जनजागृतीसाठी गीतमाला तयार करण्यात आली आहे. या गीतांच्या सिडीचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या प्रकाशन सोहळ्यास अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील, तहसिलदार म्हसळा, समीर घारे आदि उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपला सहभाग नोंदवावा यासाठी या गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार समीर घा

दि.05 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा

    रायगड,दि.02(जिमाका):-  विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून रायगड जिल्ह्यामध्ये दि. 05 मे 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती असे न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी अपिले, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत यांच्याकडील घरपट्टी, पाणी पट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्था यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. दि.05 मे 2024 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, र