Posts

Showing posts from September 5, 2021

कोविड तपासणी व उपचार केंद्र तसेच रुग्णालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींना तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देण्याचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-   सद्य:स्थितीत कोविड-19 आजाराची परिस्थिती लक्षात घेता, कोविड तपासणी व उपचार केंद्र तसेच रुग्णालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने उपचार देण्यात यावेत, यासाठी अवर सचिव, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, भारत सरकार यांच्या पत्रान्वये दिव्यांग व्यक्तींना कोविड-19 करिता करण्यात येणारी तपासणी, उपचार व लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत सर्व केंद्रांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी राज्यातील कोविड तपासणी व उपचार केंद्र तसेच रुग्णालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याबाबत कळविण्यात आले. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 25 (1) (क) नुसार दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता त्यांच्या आजाराची दखल घेणे व त्यांना उपचारात प्राधान्य देणे आवश्यक आहे.      सद्य:स्थितीत राज्यातील कोविड-19 आजाराची परिस्थितीत दिव्यांगांना या आजाराबाबत तपासणी, उपचार व लसीकरण करण्याकरिता रांगेत उभे राहावे लागत आहे. दिव्यांग व्यक्तींची रोगप्रत

अन्न पदार्थाचे उत्पादन साठवणूक/वितरण/आयात/विक्री करण्यापूर्वी अन्न व्यावसायिकांनी अन्नपरवाना/नोंदणी घेणे बंधनकारक

  अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-   अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दि.05 ऑगस्ट, 2011 पासून लागू झालेला आहे व त्याची अंमलबजावणी या प्रशासनातर्फे यशस्वीपणे करण्यात येत आहे.       सर्व जनतेस सकस, ताजे, गुणवत्तापूर्ण व निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध झाले पाहिजे,हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. कोणत्याही प्रकारच्या अन्न पदार्थाचे उत्पादन/साठवणूक/वितरण/आयात/ विक्री करण्यापूर्वी अन्न व्यावसायिकाने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006, नियम व नियमन 2011 चे कलम 31 (1) व (2) सहवाचन कलम अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी ) नियमन 2011 चे विनियम 2.1.2(1) नुसार अन्न परवाना/नोंदणी घेणे बंधनकारक आहे.          कोणत्याही अन्न व्यावसायिकाने विनापरवाना/विनानोंदणी व्यवसाय केल्यास कायदयातील कलम 63 नुसार त्यासाठी कमाल 06 महिने कारावास व रूपये 5 लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे.           रायगड जिल्हयातील सर्व अन्न अन्न व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य,रायगड, पेण या कार्यालयातर्फे आवाहन करण्यात येते की, कायद्यतील तरतुदीनुसार आपण आपला अन्न व्यवसाय

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 32 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 32.47 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3180.74 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-              अलिबाग- 11.00 मि.मी., पेण- 15.00 मि.मी., मुरुड- 124.00 मि.मी., पनवेल- 72.60 मि.मी., उरण-65.00 मि.मी., कर्जत- 21.80 मि.मी., खालापूर- 15.00 मि.मी., माणगाव- 3.00 मि.मी., रोहा- 2.00 मि.मी., सुधागड-4.00 मि.मी., तळा-6.00 मि.मी., महाड- 11.00 मि.मी., पोलादपूर-21.00 मि.मी, म्हसळा- 15.00 मि.मी., श्रीवर्धन- 122.00 मि.मी., माथेरान- 11.10 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 519.50 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 32.47 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी 98.89 टक्के इतकी आहे. 00000

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीविषयी शासनाने जाहीर केले वाहतूक नियोजन

  अलिबाग,जि.रायगड दि.7 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाव्दारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासियांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते. राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरुन जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतुकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोडी होऊन प्रवाशांची गैरसोय होते. गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होवू नये, यासाठी मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 115 मधील तरतूदीचा वापर करुन सार्वजनिक हितास्तव पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 (रा.म. क्र. जुना क्र.17) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्ग पेण, वडखळ, नागोठाणे, कोलाड इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी) वरुन होणारी वाळू/ रेती भरलेल्या ट्रकची मोठ्या ट्रेलर्सची तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत शासनाकडून पुढीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत:- §   दि.08 सप्टेंबर 2021 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दि.10 सप्टेंबर   2021 रोजी 20.00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा

घोषवाक्य लेखन स्पर्धेत सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा --मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील

      अलिबाग,जि.रायगड दि.7 (जिमाका) :- स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक कार्यक्रम अधिक सक्रिय करण्यासाठी हागणदारीमुक्त अधिक या विषयावर "घोषवाक्य लेखन स्पर्धा" दि. 01 सप्टेंबर 2021 ते दि. 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. ही “ घोषवाक्य लेखन स्पर्धा ” चा उद्देश हागणदारीमुक्त कार्यक्रमाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करून लोकसहभाग वाढविणे हा आहे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य व जिल्हा पातळीवर गौरविण्यात येणार आहे. सहभागी ग्रामपंचायतनी शौचालयाचा नियमित वापर, लहान मुलाच्या विष्टेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, ओला, सुका व प्लॅस्टिक कचरा विलगीकरण इत्यादी विषयावर जास्तीत जास्त रंगीत घोषवाक्ये भिंतीवर लिहिण्याची आहेत. सर्व घोषवाक्ये (संदेश) गावातील सार्वजनिक जागा/सभागृह, सरकारी दवाखाने, बाजारपेठ, पोस्ट, बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी दर्शनी भागात रंगविण्यात यावीत. घोषवाक्ये (संदेश) भिंतीवर रंगविण्यासाठी किमान 6 फूट x 4 फ

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सूचना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन सक्षम

    अलिबाग,जि.रायगड दि.7 (जिमाका) :- काल (दि.6 सप्टेंबर रोजी) मुरुड येथे आतापर्यंतच्या   सर्वाधिक 475 मि.मी.पावसाची नोंद झाली असून आजही भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.     या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून महत्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.       जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. कल्याणकर यांनी प्रशासकीय यंत्रणांना निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्याशी समन्वय ठेवून आपल्या विभागाचे शोध व बचावाच्या आवश्यक साहित्यासह मनुष्यबळ तत्पर ठेवावे, दरडप्रवण व पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत,   दर 2 तासांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षास माहिती सादर करावी, सर्व दूरध्वनी, मोबाईल सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी, क्षेत्रीय अधिकारी- कर्मचारी यांनी आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहून सर्व नागरिकांशी व जिल्हा नियंत्रण कक्षा

राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाचे अभिवादन

Image
  अलिबाग,जि.रायगड दि.7 (जिमाका) :- इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देवून देशवासियांना स्वातंत्र्याचे स्वप्न दाखवून ते पूर्ण करण्याचे बळ देणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के- पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात   वंदन केले.                    यावेळी तहसिलदार सतिश कदम व अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 57 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग,जि.रायगड,दि.07 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 57.06 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3148.28मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-              अलिबाग- 18.00 मि.मी., पेण- 7.00 मि.मी., मुरुड- 475.00 मि.मी., पनवेल- 2.20 मि.मी., उरण-3.00 मि.मी., कर्जत- 4.00 मि.मी., खालापूर- 13.00 मि.मी., माणगाव- 13.00 मि.मी., रोहा- 46.00 मि.मी., सुधागड-35.00 मि.मी., तळा-3.00 मि.मी., महाड- 11.00 मि.मी., पोलादपूर-14.00 मि.मी, म्हसळा- 105.00 मि.मी., श्रीवर्धन- 153.00 मि.मी., माथेरान- 10.70 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 912.90 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 57.06 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी 97.88 टक्के इतकी आहे. 00000

गणेशोत्सवाकरिता रायगड जिल्ह्यात प्रवेश करतेवळी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर बंधनकारक नाही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका) :- गणेशोत्सव सणाकरिता रायगड जिल्ह्यात प्रवेश करतेवळी ज्या नागरिकांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचे दोन मात्रा (डोस) पूर्ण केलेल्या आहेत,अशा नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश करण्याकरिता “ आरटीपीसीआर ” चाचणीची आवश्यकता नाही. मात्र ज्या नागरिकांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रा पूर्ण केलेल्या नाहीत,त्यांनी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तास पूर्वीपर्यंतच्या आरटीपीसीआर चाचणीचा “ निगेटिव्ह ” अहवाल सोबत बाळगावा, परंतु 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने, त्यांच्या प्रवेशास आरटीपीसीआर चाचणी अहवाल आवश्यक राहणार नाही. तसेच शासनाच्या https:/epassmsdma.mahait.org/LoginHandler.htm या संकेतस्थळावरुन दोन मात्रा पूर्ण झालेल्या नागरिकांनी प्राप्त होणारा Universal Pass उपलब्ध करुन घ्यावा, जेणेकरुन प्रवासदरम्यान तपासणीकरीता लागणाऱ्या वेळेची बचत होईल . गणेशोत्सव-2021 करिता महाराष्ट्र शासन, गृह विभागाकडील क्रमांक आरएलपी 0621/ प्र.क्र. 144 / विशा 1 ब, दि. 29 जून 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या मार्गदर्

रोहा तालुक्यातील विविध महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून शोभिवंत वस्तूंच्या विक्री प्रदर्शनाचे आयोजन

  अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यातील तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, रोहा येथील ग्राम पंचायत- वरसगाव येथे स्त्री शक्ती महिला ग्रामसंघ यांच्या माध्यमातून वरसगाव येथे महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे विक्री प्रदर्शन दि.05 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ, पुगाव येथेही एकदिवसीय विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या विक्री प्रदर्शनात महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून महिलांनी शोभिवंत तोरणे, फ्लॉवर पॉट, अगरबत्ती, धूपकांडी तसेच गणपती उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री केली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येथे खाद्य पदार्थांचे स्टॉलसुद्धा लावण्यात आले होते. विशेष म्हणजे वरसगाव येथे महिलांनी स्त्री शक्ती ग्रामसंघाच्या माध्यमातून आळीपाळीने बचतगटाच्या माध्यमातून कामाचे नियोजन करून सलग दहा दिवस या विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.   याचे सर्व नियोजन महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी यांनी केले होते. त्याचप्रमाणे इतर ग्रामसंघही अशा प्रकारच्या विक्री प्रदर्शनाचे आयोजन येत्या काळामध्ये करणार आहेत

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीचे घेतले दर्शन तळीये गावाच्या पुनर्वसन कामाचा घेतला आढावा

Image
  अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका):-   जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी काल (दि.05 सप्टेंबर) रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले.   त्याचप्रमाणे त्यांनी या भेटीदरम्यान रायगड विकास प्राधिकरण अंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची माहिती घेतली.   यावेळी महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशिद, रायगड विकास प्राधिकरण कार्यकारी अभियंता श्री.विश्वनाथ सातपुते, रायगड रोप वे चे संचालक श्री.जोग हे उपस्थित होते.                जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी तळीये येथील पुनर्वसनाच्या जागेची तसेच तिथे दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची   पाहणी केली. यासंबंधी सर्व कामांचा आढावा घेवून संबंधित अधिकाऱ्यांना तळीये   येथील बाधित लोकांचे तात्पुरते पुनर्वसन त्वरित करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशिद, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.खाडे, तळीयेचे सरपंच संपत तांदलेकर,सभापती पंचायत समिती श्रीमती सपना मालुसरे, जिल्हा परिषद सदस्