अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या सूचना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासन सक्षम

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.7 (जिमाका) :- काल (दि.6 सप्टेंबर रोजी) मुरुड येथे आतापर्यंतच्या  सर्वाधिक 475 मि.मी.पावसाची नोंद झाली असून आजही भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

    या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून महत्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.

      जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. कल्याणकर यांनी प्रशासकीय यंत्रणांना निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्याशी समन्वय ठेवून आपल्या विभागाचे शोध व बचावाच्या आवश्यक साहित्यासह मनुष्यबळ तत्पर ठेवावे, दरडप्रवण व पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत,  दर 2 तासांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षास माहिती सादर करावी, सर्व दूरध्वनी, मोबाईल सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी, क्षेत्रीय अधिकारी- कर्मचारी यांनी आपापल्या मुख्यालयी उपस्थित राहून सर्व नागरिकांशी व जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहावे, वेळोवेळी पावसाची व एखादी दूर्घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ व्हॉटसॲप ग्रुपवर शेअर करावी, मदतीची मागणी वेळेत करावी, जेणेकरून आपत्कालीन मदत वेळेत पोहोचविण्यासाठी मदत होईल, अशा सूचना दिल्या आहेत.

     त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुरुड तालुक्यातील आदड, चिकणी- विहूर पूल खचला असून, भोईघर व वांडेली येथील पूल वाहून गेले आहेत. उसरोली-सुपेगाव रस्ता काही ठिकाणी खचला आहे.

     या परिस्थितीत प्रशासन सतर्क असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक