Posts

Showing posts from June 20, 2021

विशेष लेख:- *लोकनेता,लोकराजा, शोषितांचा, वंचितांचा आधारवड....राजर्षी छत्रपती शाहू महाराज.....!* *मानाचा त्रिवार मुजरा...!*

       महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासाला झळाळी देण्याचे काम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केले. त्यांनी लोकांचे स्वराज्य आणण्यासाठी केलेले धडाडीचे प्रयत्न आजही महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहिले जातात.       समाजात असणाऱ्या व परंपरागत आलेल्या वाईट चालीरिती, परंपरा यांना छेद देण्याचे मौलिक कार्य त्यांनी केले. जनतेला समानता आणि स्वातंत्र्य मिळाले तर त्याचा उपभोग घेण्यासाठी व ते सर्व स्तरांवर राबविण्यासाठी सर्वप्रथम जनतेत पात्रता निर्माण करावयास हवी, या उद्देशाने प्रजाहितदक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक कार्याची नियोजनबद्ध बांधणी केली. छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाज, स्त्रिया, कष्टकरी, अस्पृश्य, शेतकरी यांच्याविषयी बहुमोल असे कार्य केले आहे. महाराजांना शिकारीचे प्रचंड वेड होते. कृषी क्षेत्राची जाण असणारा व शेतकऱ्यांची नस ओळखलेला राजा म्हणून त्यांची ख्याती होती. रात्रीच्या वेळी शिकारीसाठी जात असताना वाटेत भेटणार्‍या शेतकऱ्यांची, धनगरांची, फासेपारधी यांची आपुलकीने   विचारपूस करून त्यांच्याकडून शेतीची इत्यंभूत माहिती मिळविण्यात त

ध्यास पालकमंत्री कु.आदिती तटकरेंचा... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा...... पेण तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा पेण तालुक्यातील वडखळ नाका येथील नवीन ग्रामीण रुग्णालयासाठी मौजे खारकारावी येथील शासकीय जागा हस्तांतरित

Image
    अलिबाग, जि. रायगड, दि.22(जिमाका):- पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचे रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आवश्यक आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी त्या कसोशीने प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आरोग्य सोयीसुविधांविषयक गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी धडाडीने निर्णय प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांच्या बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देणे. यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे या विविध शासकीय जमिनींच्या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करीत आहेत व त्याप्रमाणे जनतेला सोयीस्कर ठरेल, अशा ठिकाणाची शासकीय जागा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयासाठी देण्याचे निर्णय घेत आहेत. पेण तालुक्यातील नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मौजे खारक

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिवार्य

    अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिवार्य आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, संस्था, महामंडळे, स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, नगरपरिषद, सहकार, सहकारी संस्था, खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम संस्था, इंटरप्राईझेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, सेवा पुरवठादार संस्था, वितरण व विक्री, वाणिज्य, व्यावसायिक संस्था, शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, रुग्णालये, सुश्रुशालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडासंकुल, सेवा पुरवठा व इतर इत्यादी आस्थापना यांनी आपल्या आस्थापनेत समिती गठीत झाल्याचा तसेच तक्रार प्राप्त असल्यास प्राप्त तक्रारीचा अहवाल विहित नमुन्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या कार्यालयास सादर करावा.   तसेच समिती गठनाबाबत अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नीलम पुष्प बंगला, नागडोंगरी, एमआयडीसी ऑफिस समोर, अलिबाग या पत्त्यावर किंवा ईमे

साकव पेण प्रकल्प-रायगड संस्थेचे कोविड काळात केलेले काम कौतुकास्पद

  अलिबाग,जि.रायगड दि.22 (जिमाका) :- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांना एकत्रित करून जिल्ह्यात कोविड-19 विषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या, त्यापैकीच एक संस्था साकव पेण प्रकल्प-रायगड.   या संस्थेने संपूर्ण कोविड काळात समर्पित भावनेने अतिशय उल्लेखनीय काम केले.   ही संस्था मुख्यत्वे पेण तालुक्यातील वडखळ ते नागोठणे व खारेपाटातील शेतकरी, मच्छिमार महिलांसाठी तसेच पाबळ खोऱ्यातील दुर्गम व दुर्लक्षित अशा आदिवासी बांधवांसाठी काम करते. करोना काळातील पहिल्या टप्प्यात जनजागृती करण्यासाठी दि.03 ते 6 मे 2021 या कालावधीत त्यांनी 25 आदिवासी वाड्या, 9 कुणबी गावे निवडली. या आदिवासी बांधवांमध्ये कोविड व कोविड लसीकरण याबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी या संस्थेने त्यांचे प्रबोधन केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दि. 10 ते 12 मे 2021 या कालावधीत जनजागृती बाबत दुसरी फेरी या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली.   या दौऱ्यात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुरेंद्र धुमाळ हे स्वतः सामील झाले होते. विशेष म्हणजे या कोविड

ध्यास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा.... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पिरकोन साठी मौजे पिरकोन येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग,जि.रायगड दि.21 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.              त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.             या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पिरकोन या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.             त्यानुसार मौजे पिरकोन ता.उरण, जि. रायगड येथील स.नं.556 क्षेत्र, 499.7 ही जमीन भोगाधिकार मू

ध्यास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा.... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा खालापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, बोरगाव खुर्द साठी मौजे वडविहीर येथील शासकीय जागा हस्तांतरित

  अलिबाग,जि.रायगड दि.21 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.                 त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.             या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बोरगाव खुर्द   या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                त्यानुसार मौजे वडविहीर ता.खालापूर जि. रायगड येथील स.नं.33/4ब/121 क्षेत्र 0-4

ध्यास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांचा.... आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचा उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आवरे साठी मौजे आवरे येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.21 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.                 त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.             या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आवरे या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                त्यानुसार मौजे आवरे ता.उरण जि. रायगड येथील स.नं.1/1/ब क्षेत्र   0-07-00 हे.आर.ही जम

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात "जागतिक योग दिवस" उत्साहात साजरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.21(जिमाका):- जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयुष विभागामार्फत आणि जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, अलिबाग - रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे “ जागतिक योग दिवस ” चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, अधिसेविका श्रीमती जयश्री मोरे, जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ. अमोल भुसारे, मानसोपचार तज्ञ डॉ. अर्चना सिंह, निवासी वैदयकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. समीर पोटे, योग प्रशिक्षक श्रीमती सीमा रेजा आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अमोल भुसारे यांनी “ मानसोपचार आणि योग ” याचे महत्व समजावून देऊन आनंदी राहण्यासोबत तणावविरहित जीवनासाठी योग किती आवश्यक आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. मानसिक आजारापासून दूर राहण्यासाठी नियमित योग सर्वांनी करावा, असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले. योग प्रशिक्षक श्रीमती सीमा रेजा यांनी उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिक करून घेतले तसेच उपस्थित सर्वांनी योग करण्याचा संकल्पही केला. शेवटी श्री. विशाल

मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी आपले छायाचित्र निवडणूक कार्यालयात तात्काळ जमा करण्याचे तसेच नवमतदारांनी e-Epic मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.21(जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार रायगड जिल्हयात निरंतर कार्यक्रमांतर्गत मतदारयादीचे शुध्दीकरण करण्याचे काम सुरु आहे. आजमितीस सुमारे 92 हजार मतदारांची छायाचित्रे मतदारयादीत समाविष्ट नाहीत. त्यामुळे मतदारयादीतील छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र जमा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे. ज्या मतदारांचे छायाचित्र मतदारयादीत नाहीत त्यांनी संबंधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून स्वतःचे रंगीत छायाचित्र मतदारयादीत समाविष्ट   करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे. जिल्हयातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांनी छायाचित्र नसलेल्या मतदारांची पडताळणी केली असून, जिल्हयातील जवळपास 77 हजार 300 मतदार हे मयत, दुबार, स्थलांतरीत असल्याचे आढळून आले आहेत. मा.भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार म

आंबेत सावित्री पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.21(जिमाका):- रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आणि मुख्यत्वे दक्षिण कोकणातील मुख्य प्रवेशद्वार समजला जाणारा आंबेत सावित्री पूल हा दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे संकेत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज (दि.21 जून ) रोजी पुलाच्या केलेल्या पाहणीदरम्यान दिले. येत्या दि.26 जून रोजी 2021 या पुलावरील प्रवासाचा पहिला ट्रायल आणि इतर सर्व गोष्टींचा आढावा घेतला जाणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी यावेळी पाहणी दरम्यान सांगितले. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना देणारा हा आंबेत   सावित्री पूल अखेर वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे संकेत यावेळी पालकमंत्री कु.तटकरे यांनी दिले. पालकमंत्री कु.आदिती तटकरे   म्हणाल्या की, कोकणातील मुख्यतः मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांना जोडणारा आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणारा हा मार्ग ओळखला जातो. त्यामुळे आता सर्व प्रवाशांसह, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधितांना,   इतर व्यावसायिकांच्या दैनंदिन व्यवहाराला चालना मिळणार आहे. येत्या पाच वर्षात नवीन पूलाचे देखील काम हाती घेतले

सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त रायगड डाक विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न

Image
                अलिबाग,जि.रायगड,दि.21(जिमाका):- सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून भारतीय डाक विभागामार्फत योगसंबधीत विशेष कॅन्सलेशनचे अनावरण केले गेले. त्या निमिताने देशभरातील 810 मुख्य टपाल कार्यालयांमध्ये दि.21 जून रोजी नोंदणी झालेल्या सर्व टपाल तिकिटांवर योगसंबधीत विशेष कॅन्सलेशन "बी विथ योगा बी अ होम" हा संदेश हिंदी व इंग्रजी भाषेतून शाईने उमटविण्यात आला आहे. टपाल तिकिटांचा संग्रह करण्याची आवड असलेल्या आणि त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने अशा विशेष कॅन्सलेशनला अधिक महत्व दिले जाते. हा उपक्रम रायगड डाक विभागातील अलिबाग मुख्य डाक कार्यालयात साजरा करण्यात आला. आजच्या योगदिनाचे निमित्त साधीत रायगड डाक अधीक्षक श्री. ए.जी.पाखरे यांनी डाक कार्यालयातील कर्मचारी वर्गास “ कोविड-19 ” च्या पार्श्वभूमीवर आपली आपत्कालीन यंत्रणेतील गरज समजून साध्यासोप्या योग पद्धतीने आपले आरोग्य सुस्थितीत ठेवावे तसेच आपल्या आजूबाजूचे  व आपल्या कार्यालयातील वातावरण सुदृढ ठेवावे,  असा संदेश दिला. याबरोबरच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर "योग करा घरी राहा" या विषयावर क

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण - जिल्हाधिकारी निधी चौधरी राबविला जाणार "मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम"

                अलिबाग,जि.रायगड, दि.21 (जिमाका):-   आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या राज्यातील 18 ते 45 वयोगटातील युवक/ युवतींना   हेल्थ केअर, मेडिकल व नर्सिंग क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता   विकास अभियान अंतर्गत "मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम" राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा   प्रशिक्षण कार्यक्रम “ On Job Training ” या तत्वावर राबविण्यात येणार आहे. यशस्वीरि त्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी निवड केलेल्या अभ्यासक्रमानुसार त्यांना MSCVT/SSC यां च्या मार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.   या योजनेचा जिल्हयातील जास्तीत जास्त लाभ इच्छुक उमेदवारांनी   https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdtZpvLGa31Rp7YevA7_iSIgYX0zgv3E98us8jYcSx9YawF8A/viewform?usp=sf_link   या गुगल फॉर्म लिंकवर आपली माहिती भरुन घ्यावा, तसेच ही माहिती जास्तीत जास्त गरजू उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी   चौधरी व जिल्हा कौशल्य

सुदर्शन केमिकल्सच्या लसीकरणाच्या स्तुत्य उपक्रमाचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले कौतुक आदिवासी बांधवांसाठी सुदर्शन कंपनी करीत असलेल्या मदतीबद्दल मानले विशेष आभार

Image
    अलिबाग,जि.रायगड, दि.21 (जिमाका):-   रोहा येथील सुदर्शन कंपनीने त्यांचा कामगार वर्ग व त्यांच्या कुटुंबियांसाठी  कंपनीच्या आवारात लसीकरण केंद्र कार्यान्वित केले आहे.  या लसीकरण केंद्राचे आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे  यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन संपन्न झाले. यावेळी रोहा उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, श्री.विजयराव मोरे, श्री.मधुकर पाटील, व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश राठी, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष वीज, मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख शिवालिका पाटील, रोहा प्लांट हेड विवेक गर्ग, व्यवस्थापन व सामाजिक बांधीलकी विभागाच्या प्रमुख माधुरी सणस, श्री.रवी दिघे आदिंची उपस्थिती होती. सुदर्शन कंपनीत काम करणारे कर्मचारी, कामगार,करार पध्दतीने काम करणारे मजूर, कर्मचारी,  कामगार तसेच त्यांचे कुटुंबिय या सर्वांचे करोनापासून  संरक्षण करता यावे, यासाठी हे लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला व त्या अनुषंगाने या लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज (दि.21 जून) रोजी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. पुण्

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग,जि.रायगड दि.21 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.20 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.50 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-3.30 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.75 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.80 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-2.80 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 35 मि.मी. पावसाची झाली नोंद

      अलिबाग,जि.रायगड,दि.21 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 35.15 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 818.28 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-       अलिबाग- 10.00 मि.मी., पेण- 23.00 मि.मी., मुरुड- 63.00 मि.मी., पनवेल- 23.60 मि.मी., उरण-67.00 मि.मी., कर्जत- 13.80 मि.मी., खालापूर- 12.00 मि.मी., माणगाव- 38.00 मि.मी., रोहा- 30.00 मि.मी., सुधागड-30.00 मि.मी., तळा- 63.00 मि.मी., महाड- 24.00 मि.मी., पोलादपूर- 26.00 मि.मी, म्हसळा- 47.00 मि.मी., श्रीवर्धन- 66.00 मि.मी., माथेरान- 26.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 562.40 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 35.15मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 26.04 टक्के इतकी आहे. 00000