अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात "जागतिक योग दिवस" उत्साहात साजरा

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.21(जिमाका):- जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयुष विभागामार्फत आणि जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, अलिबाग - रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक योग दिवस चे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, अधिसेविका श्रीमती जयश्री मोरे, जिल्हा मानसोपचार तज्ञ डॉ. अमोल भुसारे, मानसोपचार तज्ञ डॉ. अर्चना सिंह, निवासी वैदयकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. समीर पोटे, योग प्रशिक्षक श्रीमती सीमा रेजा आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अमोल भुसारे यांनी मानसोपचार आणि योग याचे महत्व समजावून देऊन आनंदी राहण्यासोबत तणावविरहित जीवनासाठी योग किती आवश्यक आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. मानसिक आजारापासून दूर राहण्यासाठी नियमित योग सर्वांनी करावा, असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले.

योग प्रशिक्षक श्रीमती सीमा रेजा यांनी उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिक करून घेतले तसेच उपस्थित सर्वांनी योग करण्याचा संकल्पही केला. शेवटी श्री. विशाल दामोदरे यांनी सर्वांचे आभार मानले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक