Posts

Showing posts from August 6, 2023

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत कृत्रिम भित्तिका स्थापनेबाबत अलिबाग व मुरुड येथे कार्यक्रम संपन्न

  अलिबाग (जिमाका), दि. 11 :-  महाराष्ट्रातील 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. त्यापैकी रायगड जिल्ह्याला 122 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. राज्यातील मासेमारी, मत्स्य व्यवस्थापन व मत्स्य प्रजातींचे संरक्षण ही काळाची गरज असून त्या दृष्टीने कृत्रिक भित्तीकांची पाखरण करणे हा एक प्रभावी उपाय वाटतो. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत कृत्रिम भित्तिका (Artificial Reef) स्थापनेबाबत 6 ऑगस्ट    2023 रोजी अलिबाग    व मुरुड तालुका येथे    व 7 ऑगस्ट 2023 रोजी श्रीवर्धन येथे कृत्रिम भित्तीका उभारण्यासाठी मच्छिमारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला वरील तालुक्यातील नौका मालक, तांडेल, खलाशी व संस्था पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच मच्छिमारांना कृत्रिम भित्तिकांची उभारणी करण्यासाठी समुद्रातील योग्य जागा निवड करण्यासाठी या कार्यक्रमांमुळे सुकर जाईल, असे जाणवले. कारण त्यांनी    कार्यक्रमात अनेक प्रश्न    विचारुन कृत्रिम भित्तिका (Artificial Reef) या शास्त्रीय संकल्पनेची माहिती जाणून, समजून घेण्याचा प्रयत्न केला. सदर कार्यक

जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि कलाशिक्षण महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी “अभिव्यक्ती मताची” स्पर्धेचे आयोजन

  अलिबाग (जिमाका),दि.11 :- विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने मुख्य् निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे  “ अभिव्यक्ती मताची ”  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  “ अभिव्यक्ती मताची ”  या विषयांतर्गत जाहिरात निर्मिती, भित्तीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या (मास मिडिया व जर्नालिझम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालये येथील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचा कालावधी 01 ऑगस्ट् ते 15 सप्टेंबर 2023 हा आहे. तीन ही स्पर्धांचे विषय आणि नियम मुख्य् निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या  ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. सदर स्पर्धांचे विषय पुढीलप्रमाणे आहेत:- युवा वर्ग आणि मताधिकारी, मताधिकारी लोकशाहीचा    स्तंभ,एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका/जबाबदारी , लोकशाहीतील सर्व समावेशकता आणि मताधिकार, तीनही स्पर्धांचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे. सदर स्पर्धांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे

बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कारांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवले

  अलिबाग(जिमाका),दि.11 :-  केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार दिला जातो. बालशक्ती पुरस्कार सन 2024 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे  www.awards.gov.in  ह्या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. सदर पुरस्कारांची माहिती सदरच्या संकेतस्थ्ळावर देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 31.08.2023 पर्यंत आहे. बाल शक्ती पुरस्कार हा ज्या वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. बालकल्याण पुरस्कार (वैयक्तिक पुरस्कार) हा मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. बालकल्याण पुरस्कार (संस्था स्तरावर) हा बालकल्याण क्षेत्रात अपवादात्म्म कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधी

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 ऑगस्ट रोजी रिल मेकिंग स्पर्धेचे आयोजन

    अलिबाग,दि.11(जिमाका):-    राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण नुसार, भारतात प्रौढांमध्ये (15-49 वर्षे ) एचआयव्ही/ एड्सचे सर्वसमावेशक ज्ञान 21.6 टक्के महिलांमध्ये आणि 30.7 टक्के पुरुषांमध्ये आहे.    त्यामुळे आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे निमित्त साधून जिल्ह्यात विविध उपक्रमाद्वारे, विशेषतः तरुणांमध्ये एचआयव्ही/ एड्सचे सर्वसमावेशक ज्ञान सुधारण्याकरिता आयोजन केले.        युवा वर्ग हा    एचआयव्ही एड्स अनुषंगाने अतंत्य संवेदनशील असून युवा वर्गात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर    एचआयव्ही/ एड्स जनजागृती होण्याच्या    दृष्टीने रिल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत रेड रिबन क्लब असलेल्या प्रत्येक महाविद्यालयातील गटाने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी केले आहे.       रेड रिबन क्लब द्वारे तरुणांमध्ये एचआयव्ही आणि एड्सबाबत जागरूकता वाढविण्यासाठी   मास मीडिया   ही लोकप्रिय पद्धत आहे. रेड रिबन क्लब द्वारे समवयस्कांना एचआयव्ही आणि एड्सबद्दल जागरूक करण्यासाठी रील मेकिंग प्रका

महिलांसाठी विशेष पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

  रायगड(जिमाका)दि.11:-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व ग्रामीण प्रगती फाउंडेशन, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.19 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 02.00 वाजेपर्यंत गांधी मेमोरियल हॉल ” , निजामपूर रोड, मुंबई-गोवा हायवे जवळ, ता.माणगाव या ठिकाणी जिल्ह्यातील बेरोजगार महिलांसाठी ‍विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी दिली आहे.              जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे.  सदर रोजगार मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवी धारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. सदरच्या पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्यास स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या बेरोजगार महिलांसाठी जिल्हयातील विविध महामंडळे यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना विषयीची माहिती व मार्गदर्शन उमेदवारांना दिले जाणार

महाज्योती तर्फे पी.एच.डी.संशोधकांना 24 कोटी वितरीत पी.एच.डी.अधिछात्रवृत्ती योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

    अलिबाग,दि.10(जिमाका):-  महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ,   नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग ,   विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पी . एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पी.एच.डी.अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते. लक्षित गटातील उमेदवारांना संशोधनासाठी सहाय्य व्हावे ,   त्यांना संशोधन क्षेत्रात संधी मिळावी ,  त्यांचा विकास व्हावा   या हेतूने पी.एच.डी. अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते. पी.एच.डी.अधिछात्रवृत्ती योजनेंतर्गत दिल्या जात असलेल्या अधिछात्रवृत्तीने विद्यार्थ्यांना निश्चिंत होऊन संशोधन कार्य करता येते. संशोधनासाठी लागत असलेले संदर्भ ग्रंथ घेता येतात. अहवाल तयार करण्यासाठी प्रवास करता येतो. अभ्यासासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देता येतात. आज या अधिछात्रवृत्तीचा लाभ घेऊन विद्यार्थी संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यापीठात शिकवत आहे. आपले आणि आपल्या येणाऱ्या पिढीचे करिअर घडवीत आहे. वर्ष 2021 मधे निवड झालेल्या 648 विद्यार्थ्यांना जुलै

सहकार विभागातील सरळ सेवा पदभरतीच्या उमेदवारांची टी.सी.एस. कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा

    अलिबाग,दि10 (जिमाका):-  सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दि.06 जुलै 2023 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहीत मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस.या कंपनीमार्फत सोमवार दि.14 ऑगस्ट 2023 आणि बुधवार दि.16 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग प्रमोद जगताप यांनी कळविले आहे. या परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना अर्ज सादर करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी यावर पाठविण्यात आल्या आहेत. तसेच प्रवेशपत्र डाउनलोड करावयाची लिंक आणि याबाबतच्या सूचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या  https://sahakarayukta. maharashtra.gov.in , या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी  https://sahakarayukta. maharashtra.gov.in , या संकेतस्थळावरून परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परोक्षेस येताना त्याची रंगीत प्रत सोबत ठेवावी. तसेच प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करण्याची नोंद घ्यावी, ०००

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज करण्यास दि.15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

    अलिबाग,दि.10(जिमाका):-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी दि.10 ऑगस्ट पर्यंत अर्ज  सादर करावेत, असे कळविण्यात आहे होते.  परंतु या विविध पुरस्कारांसाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना अर्ज करण्यासाठी दि.15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त  समाज कल्याण सुनिल जाधव यांनी दिली आहे.   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनिय कार्य करणारे समाजसेवक/व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 2020-21, 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ०००००००

जुलै मधील अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी अनुदान मंजूर रायगड जिल्ह्यातील सहा हजार सहाशे तेवीस बाधितांना देण्यात येणार मदत

    अलिबाग,दि.9 (जिमाका):-   जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीचा पावसाने झालेल्या नुकसानीसाठी नागरिकांना मदत देण्याचा सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यातील 5594 पात्र नागरिकांना जवळपास 54 लक्ष रुपये अर्थिक मदतीचे वाटप केले जाणार आहे , अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. या अंतर्गत अनुदान संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांना वर्ग करण्यात आले असून यामध्ये निवारा केंद्रात स्थलांतरित केलेल्या 5 हजार 96 नागरिकांसाठी 29 लाख 24 हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याचबरोबर 452 घरांच्या पुनर्बांधणीसाठी सात लक्ष 98 हजार रुपये मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई साठी पंधरा लक्ष 83 हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. राज्यात 19 ते 23 जुलै या कालावधीत अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे मोठे नुकसान झाले होते बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याच्या  अनुषंगाने  शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यामध्ये काही बाबींवर विशेष दराने वाढीव मदत देण्याचा देखील सूचना शासनाने केल्या आहेत. प्रामुख्याने पूर व अतिवृष्टीमुळे घरे वाहून जाणे पूर्णपणे शतिग्रस्त होणे अथवा दोन दिवसांपेक्षा

माझी माती माझा देश' उपक्रम रायगड जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ

    रायगड,दि.9(जिमाका):-  ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमाचा प्रारंभ आज क्रांती दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व कार्यालयात  ‘पंचप्रण शपथ’ घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे यांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध कार्यालयामध्ये आज पंचप्रण शपथ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत पंचायत समिती, तहसीलदार कार्यालये, महानगर पालिका, नगरपालिका, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा माहिती कार्यालय आदी कार्यालयांमध्ये पंचप्रण शपथ घेण्यात आली. उरण येथे ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य सैनिकाचा सन्मान ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत आज दि 9 ऑगस्ट या क्रांती दिनाचे औचित्य साधून  स्वातंत्र्य सैनिक रामनाथ सखाराम गायकवाड यांची पनवेल उपविभ

जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी पुरस्कारासाठी सहभाग नोंदवावा--जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

    अलिबाग(जिमाका)दि.9 :-  राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याबाबतचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा दि.04  जुलै 2023 चा शासन निर्णय झाला आहे. या शासन निर्णयान्वये दि.19 सप्टेंबर 2023 रोजीपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सव राज्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी रायगड जिल्ह्यातील जास्तीस्त जास्त गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  डॉ.योगेश म्हसे यांनी आवाहन केले आहे.  या पुरस्कार निवड करण्यासाठी कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहील :-या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमुना, शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये आहे. या अर्ज व सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या  mahotsav.plda@gmail.com  या ई-मेलवर

17 ऑगस्ट पासून जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम

    अलिबाग(जिमाका)दि.8:-  रायगड जिल्ह्यातील 3 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी  शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम दि. 17 ते दि.31 ऑगस्ट 2023 दरम्यान जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी दिली. रायगड जिल्ह्यात प्राथमिक समग्र शिक्षा कार्यक्रमाची तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचनावादी शाळा, कृतीयुक्त अध्ययन पद्धती, डिजीटल शाळा, आय.एस.ओ.मानांकन, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन, विविध शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परिक्षा तयारी, नवोदय परिक्षा तयारी अशा प्रभावी उपक्रमांची अंमलबजावणी अनुभवी व तज्ञ शिक्षकांमार्फत शाळांमध्ये सुरू आहे. मात्र शासनाच्या अनेक योजना सुरू असतानाही अद्याप काही बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याव्

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेंतर्गत लाभ घेण्यास इच्छूक अर्जदारांनी प्रस्ताव सादर करावेत

    अलिबाग (जिमाका) दि.8 :-  शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनी मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मदारी, मादगी या 12 पोट जातीतील समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता, स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग/व्यवसाय करण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अंगद  कांबळे यांनी कळविले आहे.   थेट कर्ज योजनेंतर्गत लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्या अर्जदारांनी शासनाच्या नियमानुसार व महामंडळाच्या परिपत्रकातील अटी/शर्ती/निकष व नियमानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन दि.01 सप्टेंबर ते दि.30 नोव्हेंबर, 2023 या विहित कालावधीत जिल्हा कार्यालय रायगड-अलिबाग श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या, सदनिका क्र.2 तळमजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे, ता.अलिबाग, जि.रायगड या पत्त्यावर अर्ज देणे. तसेच मूळ दस्तऐवजासह स्वतः साक्षांकित करून कर्ज प्रस्ताव स्विकारण्यात येतील,असे जिल्ह

कंत्राटी काम मिळण्याकरिता पेण तालुक्यातील सोसायट्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

    रायगड(जिमाका)दि.8 :-  बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने  रु.3 लाख पर्यंत इतक्या रकमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या दि.11 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयान्वये जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे.  त्यानुषंगाने ज्या सेवा सोसायट्यांचे कार्यक्षेत्र पेण तालुक्याकरिता आहे, अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास कंत्राटी काम मिळण्याबातचे आपले प्रस्ताव दि.21 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयात स्वहस्ते सादर करावेत. यासाठी आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेले तसेच अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त, श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 02141

माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत पंचप्राण शपथ कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बास्टेवाड यांचे आवाहन

    रायगड दि.8 (जिमाका):-  माझी माती, माझा देश’ उपक्रमाचा प्रारंभ दि.09 ऑगस्ट 2023 रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व कार्यालयांत ‘पंचप्राण शपथ’ कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे. रायगड जिल्ह्यात दि.09 ते दि.20 ऑगस्ट दरम्यान, ‘माझी माती, माझा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था  स्तरावर कार्यक्रम होणार आहेत. यात  “ देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून स्थानिक लोकप्रतिनिधीं व लोकसहभागातून हे अभियान आयोजित करण्यात येत आहेत. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 15 तालुकयतील 809 ग्रामपंचायत मध्ये शिलाफलक लावण्याचे काम सुरु आ