आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 ऑगस्ट रोजी रिल मेकिंग स्पर्धेचे आयोजन

 

 

अलिबाग,दि.11(जिमाका):-  राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण नुसार, भारतात प्रौढांमध्ये (15-49 वर्षे ) एचआयव्ही/ एड्सचे सर्वसमावेशक ज्ञान 21.6 टक्के महिलांमध्ये आणि 30.7 टक्के पुरुषांमध्ये आहे.  त्यामुळे आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे निमित्त साधून जिल्ह्यात विविध उपक्रमाद्वारे, विशेषतः तरुणांमध्ये एचआयव्ही/ एड्सचे सर्वसमावेशक ज्ञान सुधारण्याकरिता आयोजन केले.    युवा वर्ग हा  एचआयव्ही एड्स अनुषंगाने अतंत्य संवेदनशील असून युवा वर्गात जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात महाविद्यालय स्तरावर  एचआयव्ही/ एड्स जनजागृती होण्याच्या  दृष्टीने रिल मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत रेड रिबन क्लब असलेल्या प्रत्येक महाविद्यालयातील गटाने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी केले आहे.

   रेड रिबन क्लब द्वारे तरुणांमध्ये एचआयव्ही आणि एड्सबाबत जागरूकता वाढविण्यासाठी मास मीडिया ही लोकप्रिय पद्धत आहे. रेड रिबन क्लब द्वारे समवयस्कांना एचआयव्ही आणि एड्सबद्दल जागरूक करण्यासाठी रील मेकिंग प्रकारांचा वापर करण्यात येणार आहे. ही ऑनलाईन रील मेकिंग स्पर्धा  ही  30 सेकंद ते 1 मिनिटाची असेल, यात प्रथम विजेत्यास 5  हजार, द्वितीय  3 हजार 500 तर तृतीय क्रमांकास  2 हजार रुपयांचे बक्षीस असणार आहे.  एचआयव्हीचा प्रसार कसा होतो, कलंक व भेदभाव, नॅको एड्स अँप किंवा 1097 टोल फ्री क्रमांकाचे फायदे, एचआयव्ही तपासणीस  प्रवृत्त करणे या विषयावर रील स्पर्धा (18 ते 25 वयोगटातील ) इच्छुक विद्यार्थी/विद्यार्थ्यांमार्फत घेण्यात येणार असून ही रील  दि.18 ऑगस्ट 2023 पर्यंत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  श्री.संजय माने, मो.क्र.7798087999  या क्रमांकावर पाठवावी.   या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या स्पर्धकास राज्यस्तरावर घेण्यात येणाऱ्या स्पर्धेकरिता पाठविण्यात येणार आहे.  

         नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनाझेशन आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी वडाळा मुंबई यांच्यामार्फत 12 आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय कार्यक्रमाचे उदघाटन दि.12 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता, बी.जे.शासकीय महाविद्यालय  पुणे येथे  होणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रेक्षेपण रायगड जिल्ह्यातील  रेड रिबन क्लब असलेल्या 23 महाविद्यालयामध्ये दाखविण्यात येणार आहे.

            रायगड जिल्ह्यातील  रेड रिबन क्लब असलेल्या 23 महाविद्यालयामध्ये दि.12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन, 01 ऑक्टोबर स्वैच्छिक रक्तदान दिन, 01 डिसेंबर जागतिक एड्स नियंत्रण दिन, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन या दिनाचे औचित्य साधून एचआयव्ही एड्स जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याकरिता प्रत्येक महाविद्यालयाकरिता रुपये 9 हजार महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी वडाळा मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक