Posts

Showing posts from March 19, 2017

क्षयरोग निर्मुलनासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा --अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे

Image
क्षयरोग निर्मुलनासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा                                            -- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे अलिबाग(जिमाका)दि.24:-   औषधोपचारातील प्रगत तंत्रज्ञानाचा तसेच जनजागृतीसाठी प्रसार व प्रसिद्धीच्या नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन क्षयरोग निर्मुलनाचे काम करणे आवश्य्क आहे.असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी आज येथे केले. सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कुरुळ ता.अलिबाग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ.अजित गवळी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर,परिवहन मंडळाचे व्यवस्थापक श्री.गिते,श्रीमती अनिता गोटे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.गोटे पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने विशेष कार्यक्रमांतर्गत 2025 पर्यंत क्षयरोग निर्मुलनाचे उदिष्ट ठेवले आहे.  यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने क्षयरोगाचे छुपे रुग्ण शोधून त्यांना उपचाराच्या कार्यक्रमांतर्गत आ

राष्ट्रीय सेवा योजनेतील संस्कार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपुयक्त - जिल्हा माहिती अधिकारी, डॉ.राजू पाटोदकर

Image
राष्ट्रीय सेवा योजनेतील संस्कार विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपुयक्त                                                          - जिल्हा माहिती अधिकारी, डॉ.राजू पाटोदकर             अलिबाग दि.23 (जिमाका), राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार हे भविष्यकाळासाठी उपयुक्त असून विविध शिबिरातून मिळणारी ज्ञानाची व संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरते असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर यांनी आज येथे केले. मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पी.एन.पी. महाविद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने तीनविरा येथील विश्रामगृह येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हास्तरीय निवासी शिबिराच्या सांगता समारोप प्रसंगी ते बोलत होते.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश अग्निहोत्री, उप प्राचार्य प्रा.संजीवनी नाईक, कार्यक्रमाधिकारी प्रा.प्राजक्ता कवी, प्रा.विक्रांत वार्डे, लक्ष्मी शालिनी महाविद्यलय पेझारीचे कार्यक्रमाधिकारी प्रा.दिलीप पाटील, प्रा.तेजस म्हात्रे , प्रा.नम्रता पाटील आदि उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना डॉ.पाटोदकर यांनी राष

सर्वजण मिळवून क्षयरोग संपवू या

24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सर्वजण मिळवून क्षयरोग संपवू या        जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यांत येत आहे. यानिमित्त क्षयरोगाची माहिती व्हावी,क्षयरोग झाल्यानंतर घ्यावयाची काळजी.  क्षयरोग नियंत्रणात राहण्यासाठी करण्यात येत असलेली कार्यवाही,तसेच क्षयरोगाची लागण होऊ नये आणि पुढील पिढी क्षयमुक्त व्हावी, यासाठी करण्यात येत असलेली कार्यवाही याबाबतची माहिती देणारा लेख…             क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम टूबरक्युलोसीस या जंतूमुळे होतो. या जंतूचा शोध डॉ.रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने 24 मार्च 1882 रोजी लावला.या शोधाच्या एका शतकानंतर म्हणजेच 1982 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आणि इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट् टूबरक्युलोसीस  अँड लंग डिसीज (IUATLD) यांनी 24 मार्च हा जागतिक क्षयरोग  रोग दिन म्हणून साजरा केला जाईल,असे जाहिर केले. तेंव्हापासून 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जात आहे. क्षयरोगाची लक्षणे दोन आठवडे किंवा जास्त काळ खोकला येणे.कधी कधी रक्तही पडणे, संध्याकाळच्यावेळी हलकासा येणारा ताप,भूक मंदावणे, वजनात घट होणे,अशक्तप

राज्याचा अर्थसंकल्प विकासाला चालना व प्रेरणा देणारा - प्रा.नारायण बाबर

राज्याचा अर्थसंकल्प  विकासाला चालना व प्रेरणा देणारा                                                                                 - प्रा.नारायण बाबर अलिबाग दि.20 (जिमाका), राज्याचा अर्थसंकल्प विकासाला चालना आणि प्रेरणा देणारा अर्थसंकल्प असल्याचे मत अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयाचे व्यवसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.नारायण बाबर यांनी आज येथे व्यक्त केले. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यावतीने व स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अर्थसंकल्पावरील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, माहिती अधिकारी विष्णू काकडे, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या प्रमुख राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या तपस्वी गोंधळी, तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना प्रा.बाबर म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता यावे यासाठी तसेच त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, त्यांना मूलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. जसे की, जलयुक्त  शिवारासाठी, जलसिंचन विभागासाठी, कृषि पंप जोडणे अशा विविध य