राज्याचा अर्थसंकल्प विकासाला चालना व प्रेरणा देणारा - प्रा.नारायण बाबर

राज्याचा अर्थसंकल्प  विकासाला
चालना व प्रेरणा देणारा
                                                                                - प्रा.नारायण बाबर

अलिबाग दि.20 (जिमाका), राज्याचा अर्थसंकल्प विकासाला चालना आणि प्रेरणा देणारा अर्थसंकल्प असल्याचे मत अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयाचे व्यवसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.नारायण बाबर यांनी आज येथे व्यक्त केले.
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यावतीने व स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अर्थसंकल्पावरील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, माहिती अधिकारी विष्णू काकडे, स्पर्धा विश्व अकॅडमीच्या प्रमुख राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या तपस्वी गोंधळी, तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते
पुढे बोलताना प्रा.बाबर म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता यावे यासाठी तसेच त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, त्यांना मूलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. जसे की, जलयुक्त  शिवारासाठी, जलसिंचन विभागासाठी, कृषि पंप जोडणे अशा विविध योजनांसाठी तरतूद करुन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात आला आहे. तरुण पिढीला रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच स्पर्धां परीक्षांसाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. एकंदरितच अर्थसंकल्पाचे अवलोकन करता विकासाची पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प आहे. असे म्हणता येईल असेही त्यांनी सांगितले. तसेच अर्थसंकल्पातील तूट, त्यावरील उपाय योजना या संदर्भातही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
व्याख्यानाच्या सुरुवातीला अर्थसंकल्प म्हणजे काय ? तो का केला जाता ?  याबाबत अतिशय सोप्या शब्दात प्रा.बाबर यांनी माहिती दिली. तसेच उपस्थित झालेल्या प्रश्नाची समर्पक उत्तरे देऊन समाधान केले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी डॉ.पाटोदकर यांनी अर्थसंकल्प, तसेच माहिती व जनसंपर्क च्या वतीने दरमहा प्रकाशित होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी, उुर्द व गुजराती या लोकराज्य मासिकाविषयी माहिती दिली.
तर आभार प्रदर्शन अकादमीच्या प्रमुख श्रीमती साळवी यांनी केले.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक