Posts

Showing posts from June 4, 2017

आपला महाराष्ट्र बाल कामगार मुक्त

12 जून- बाल कामगार मुक्त दिनानिमित्त लेख आपला महाराष्ट्र  बाल कामगार मुक्त बालकामगार या विषयाने समस्त मानव जातीला अंतर्मुख केलेले आहे. बालकामगार ही एक जटील समस्या असून त्याचे दुष्परिणाम समाजातील प्रत्येक घटकास भोगावे लागत आहेत. आजचे बालक ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. बाल कामगार या शब्दामध्ये बालक काम व श्रम या तीन शब्दांचा समावेश आहे. कोणतीही व्यक्त्ती 14 वर्षापेक्षा वयाने कमी आहे अशा व्यक्तीस बाल  कामगार कायद्यान्वये बालक संबोधले जाते. समाजामध्ये सर्वसाधारणपणे काम आणि श्रम या गोष्टींना समाज मान्यता आणि  महत्व असले तरी देखील बालकांच्या संदर्भात तो शाप ठरला आहे. नफेखोर दृष्ट प्रवृत्तीचे संस्था मालक स्वत:च्या फायद्यासाठी बालकांना वेठीस धरुन अत्यंत कमी मोबदल्याचे स्वरुपात आर्थिक व शारीरिक पिळवणूक करुन त्यांच्या असहाय्यतेचा पुरेपूर फायदा घेतात. याचे मुळ कारण पालकांची निरक्षरता, अज्ञान आणि गरिबी. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक बालकाला शाळेत शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. बालकाच्या शिक्षणाचा अधिकार हिरावून न घेता त्याला शिक्षण

रायगड जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा

वृत्त क्र.305                                                                                                  दिनांक:- 09 जून 2017 रायगड जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा अलिबाग दि.9,(जिमाका):-रायगड जिल्ह्यात पुढील 24 तासांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (7 सेमी ते 12 सेमी) तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक (12 सेमी ते 24 सेमी) पाऊस पडण्याची पूर्वसूचना दिली आहे. तसेच समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे.             अतिवृष्टीमुळे जिवीत व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागाकडून आवश्यक त्या प्रमाणात उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे पुर परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी संबंधित विभागाकडील बचाव पथक, बचाव साहित्य्, रुग्णवाहिका आदि सुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. सखल भागातून पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक प्रवाहाच्या मार्गामधील अडथळे दुर करणे, आपत्कालीन प्रसंगी पर्यायी ठिकाणी स्थलांतरासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे महत्वाचे आहे. नागरीकांनी देखील आपतकालीन परिस्थितीत सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आ

राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

वृत्त क्र.306                                                                                                  दिनांक:- 09 जून 2017 राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम अलिबाग, (जिमाका) दि.09:- रविंद्र चव्हाण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि.11 जून 2017  रोजी सकाळी 5.54 वाजता कुडाळ रेल्वेस्थानक येथे आगमन व राज्य राणी एक्सप्रेस क्र.11004 या गाडीने पनवेलकडे प्रयाण. सोमवार दि.12 जून 2017 रोजी सकाळी 4.45  वाजता पनवेल रेल्वेस्थानक येथे आगमन व डोंबिवली येथील निवास्थानाकडे प्रयाण. 000000

जिल्हा नियोजन निधी खर्चाबाबत अचूक व कालबध्द नियोजन आवश्यक - जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग फोन नं.222019 ई-मेल :- dioraigad@gmail.com dioabg@rediffmail.com फेसबुक :- dioraigad  ट्विटर :- dioraigad ब्लॉग :- dioraigad   वृत्त क्र.304                                                                                                          दिनांक:- 09 जून 2017 जिल्हा नियोजन निधी खर्चाबाबत अचूक व कालबध्द नियोजन आवश्यक                                                       - जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर अलिबाग दि.09 (जिमाका), जिल्हा नियोजन समिती कडून प्राप्त झालेला निधी हा त्याच आर्थिक वर्षात खर्च झाला पाहिजे. यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी अचूक व कालबध्द नियोजन करावे अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना आढावा बैठकीमध्ये दिल्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.साळुंखे, उप वनसंरक्षक, रोहा विजय सुर्यवंशी व अलिबाग मनिष कुमार, अधिक्षक जिल्हा कृषि अधिकारी के.बी.तरकसे, शिक्

महाड येथील मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे उद्घाटन संपन्न मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारतीसाठी प्रयत्नशील - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

Image
महाराष्ट्र शासन जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग फोन नं.222019 ई-मेल :- dioraigad@gmail.com dioabg@rediffmail.com फेसबुक :- dioraigad  ट्विटर :- dioraigad ब्लॉग :- dioraigad   वृत्त क्र.303                                                                                                          दिनांक:- 08 जून 2017 महाड येथील मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे उद्घाटन संपन्न मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारतीसाठी प्रयत्नशील                                                                     - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले अलिबाग दि.8 (जिमाका), महाड येथे मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह बांधण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही   सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज महाड येथे दिली.   सामाजिक न्याय विभागाकडून महाड येथे बांधण्यात आलेल्या मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहा च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , रायगड जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा कु.आदिती तटकरे , आमदार भरतशेठ गोगावले , समाजकल्याण व

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम अलिबाग, (जिमाका) दि.07:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.8 जून 2017   रोजी सकाळी 7.30 वा. मलबार हिल येथून जावळी, ता.माणगांव कडे प्रयाण. 11.30 वा. जावळी ता.माणगांव येथे आगमन. 12.00 वा. अनुसूचित जातीच्या मुलांच्यासाठी शासकीय निवासी शाळा उद्घाटन 12.30 वा. महाड कडे प्रयाण. 1.वाजता महाड येथे आगमन व शासकीय मुलाचे वसतिगृह उद्घाटन 1.45 वा. महाड शासकीय विश्रामगृह येथे आगमन. 2.30 पर्यंत राखीव. त्यानंतर मुंबईकडे प्रयाण. 00000

वेद आणि मंत्रघोषात तिथी प्रमाणे शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा

Image
वेद आणि मंत्रघोषात तिथी प्रमाणे शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा अलिबाग दि.07 (जिमाका), वेद आणि मंत्रघोषात विधीवत पूजाविधीने किल्ले रायगडावर आज जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या हिंदू तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती कडून शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे , महाडचे आ.भरतशेठ गोगावले, आ . रूपेश म्हात्रे, आ . अमित घोडा आदि मान्यवर उपस्थित होते. एक दिवसाच्या फरकाने साजरा होत असलेल्या तिथीप्रमाणे च्या  शिवराज्याभिषेक दिनोत्सवाला देखील संपूर्ण राज्यातून शिवभक्तांनी मोठी हजेरी लावली होती. धर्मशाळा ते राजदरबार अशी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरव णू क का ढू न महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला सुरूवात झाली. गडावर वि वि ध धार्मिक विधी, पुजापाठ, वेद मंत्रघोषाने मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. या मंगलमय वातावरणात शिवरायांच्या प्रतिमेचे विधीवत पुजन रोहित पवार यां च्या हस्ते सपत्नीक करून  छ त्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधुंच्या पाण्य

किल्ले रायगड शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न

Image
किल्ले रायगड शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न             अलिबाग दि.6, (जिमाका), किल्ले रायगडावर आज 344 वा राज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.             खासदार छत्रपती संभाजी राजे यांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. त्यांच्या हस्ते राजसदरेवर शिवराज्याभिषेकाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास विविध गडावरुन आणलेल्या पाण्याने तसेच दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी युवराज शहाजीराजे तसेच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, सेवानिवृत्त कोकण महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रसेवा समुह संघटनेचे अध्यक्ष राहुल पोकळे, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोज आखटे  आदि मान्यवर व देशभरातून उपस्थित लाखो शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.             शिवभक्तांना मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे यांनी सांगितले की, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होत आहे. ही आनंदाची बाब आहे. त

माणगांव तालुक्यातील जावळी येथील शाळेत प्रवेशासाठी आवाहन

माणगांव तालुक्यातील जावळी येथील शाळेत प्रवेशासाठी आवाहन अलिबाग, दि.06,(जिमाका):- रायगड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्याकरीता जावळी ता.माणगावं येथे निवासी शाळा इयत्ता 6 वी ते 7 वी पर्यंतचे वर्ग नव्याने सुरु होत आहेत. अनुसूचित जातीच्या व नवबौद्धांच्या मुला-मुलींसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय निवासी  शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून जावळी ता.माणगांव येथे निवासी शाळा स्थापन करण्यात आली आहे. शासकीय निवासी शाळेमध्ये प्रवेशाकरीता आरक्षण पुढील प्रमाणे  आहे. अनुसूचित जाती-80%, अनुसूचित जमाती-10%, अपंग प्रवर्ग-3%, विमुक्त जाती, भटक्या जमाती-5%, विशेष मागास प्रवर्ग-2% अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळांसाठी प्रवेश प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2017 पर्यंत राहील. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड अलिबाग यांनी कळविले आहे. 00000

कोंकण विकासासाठी शासन कटिबध्द सावित्री नदी नुतन पुलाचे लोकार्पण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
कोंकण विकासासाठी शासन कटिबध्द सावित्री नदी नुतन पुलाचे लोकार्पण                                                                             - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस                अलिबाग दि. 5 (जिमाका) कोंकण  रस्ते विकासाच्या महत्वाच्या कामांचे भुमिपूजन  व विक्रमी वेळेत पूर्ण झालेल्या सावित्री नदीवरील पुलाचे लोकार्पण हा ऐतिहासिक क्षण असून, कोकण विकासासाठी कटिबध्द असल्याचे  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाड येथे केले. सावित्री नदीवरील नव्या पुलाच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री रायगड प्रकाश महेता, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा कु.आदिती तटकरे, खासदार अमर साबळे, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, भरतशेठ गोगावले,  प्रविण दरेकर, अवधुत तटकरे, निरंजन डावखरे संजय कदम, महाड नगराध्यक्षा कु.स्नेहल जगताप आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, विक्रमी वेळे