जिल्हा नियोजन निधी खर्चाबाबत अचूक व कालबध्द नियोजन आवश्यक - जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
फोन नं.222019 ई-मेल :- dioraigad@gmail.com dioabg@rediffmail.com
फेसबुक :- dioraigad  ट्विटर :- dioraigad ब्लॉग :- dioraigad
 वृत्त क्र.304                                                                                                       दिनांक:- 09 जून 2017
जिल्हा नियोजन निधी खर्चाबाबत
अचूक व कालबध्द नियोजन आवश्यक
                                                      - जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर
अलिबाग दि.09 (जिमाका), जिल्हा नियोजन समिती कडून प्राप्त झालेला निधी हा त्याच आर्थिक वर्षात खर्च झाला पाहिजे. यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी अचूक व कालबध्द नियोजन करावे अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना आढावा बैठकीमध्ये दिल्या.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.साळुंखे, उप वनसंरक्षक, रोहा विजय सुर्यवंशी व अलिबाग मनिष कुमार, अधिक्षक जिल्हा कृषि अधिकारी के.बी.तरकसे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ अधिक्षक अभियंता फारुक शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, कार्यकारी अभियंता, महाड सार्वजनिक बांधकाम विभाग वि.स.सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सन 2016-17 या आर्थिक वर्षात झालेला खर्चाचा आढावा घेतला. ज्या विभागांनी उपयोगिता प्रमाणपत्र व खर्चाचा ताळमेळ अहवाल  सादर केला नाही. त्या विभागांनी तात्काळ उपयोगिता प्रमाणपत्र व खर्चाचा ताळमेळ सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले. तसेच या वर्षासाठी प्रत्येक विभागाने 30 जून पर्यंत संबंधित विभागाची तांत्रिक मंजूरी प्राप्त करुन निधी व प्रशासकीय मंजूरीसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा अशा सूचना दिल्या.  मंजूर झालेला नियतव्यय खर्च करण्याची जबाबदारी ही त्या संबंधित अधिकाऱ्याची राहील याची नोंद सर्वांनी घ्यावी असेही ते यावेळी म्हणाले.
नियोजन समितीच्या बैठकीला येताना सर्व अधिकाऱ्यांनी संपूर्ण तयारीनीशी हजर रहावे. जिल्हा नियोजन निधी संदर्भात काही अडचणी असल्यास त्याबाबत नियोजन विभागाकडून मार्गदर्शन घ्यावे. मात्र विहित मुदतीत खर्च करावा. असे ते म्हणाले.
बैठकी दरम्यान जिल्हा नियोजन अधिकारी यांनी सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेऊन निधी खर्च, उपयोगिता प्रमाणपत्र, ताळमेळ याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. या बैठकीला क्रीडा, जिल्हा परिषद, जिल्हा उद्योग केंद्र, पशुसंवर्धन विभाग, पाटबंधारे विभाग, मेरीटाईमबोर्ड, मस्त्यव्यवसाय, पत्तन आदि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000




Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक