Posts

Showing posts from July 2, 2017

जून मध्ये 2 लाख 83 हजार ध्वजदिन निधी संकलन

जून मध्ये 2 लाख 83 हजार ध्वजदिन निधी संकलन अलिबाग दि.7,(जिमाका):- माजी सैनिकांच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन अंतर्गत रायगड जिल्हयात जून-2017 मध्ये रुपये 2 लाख 83 हजार 627 रुपये इतका ध्वजदिन निधी  संकलित करण्यात आला आहे.  मागील महिन्याच्या अखेर झालेला संकलन निधी 16  लाख 44 हजार 972 रुपये असा एकूण  19लाख 28 हजार  599 रुपयांचा निधी संकलित करण्यात आला आहे.  त्याची टक्केवारी 35.42 इतकी आहे.    जिल्हयाला या वर्षासाठी रुपये 54 लाख 45 हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 000

जिल्ह्यात एकूण 1076 मि.मि. पावसाची नोंद

   जिल्ह्यात एकूण 1076 मि.मि. पावसाची नोंद         अलिबाग दि.7,(जिमाका):- रायगड जिल्ह्यात आज अखेर एकूण 1076.73 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 03.00 मि.मि., पेण-20.20 मि.मि., मुरुड-36.00 मि.मि., पनवेल-27.40 मि.मि., उरण-30.00 मि.मि., कर्जत-25.40 मि.मि., खालापूर-48.00 मि.मि., माणगांव-41.00 मि.मि., रोहा-25.00 मि.मि., सुधागड-21.00 मि.मि., तळा-46.00 मि.मि., महाड-32.00 मि.मि., पोलादपूर-10.00, म्हसळा-47.60 मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि., माथेरान-26.60 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 454.20 मि.मि.इतके आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी  34.26 % इतकी आहे. 00000

राज्यातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील नाट्यगृहाचे लोकार्पण जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
अलिबाग,दि.7,(जिमाका)- राज्यातील कलावंतांना चांगल, हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देणं हे राज्यकर्ते म्हणून आमचे कर्तव्य आहे. म्हणुनच राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करतांना जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करुन  राज्याची सांस्कृतिक संपदा जोपासणार, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. अलिबाग शहरात  पीएनपी  सांस्कृतिक कलाविकास मंडळ या संस्थेने सहकारी तत्वावर उभारलेल्या राज्यातील  पहिल्या नाट्यगृहाचे लोकार्पण श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंत्री ना. विनोद तावडे, जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. जयंत पाटील, आ. सुनिल तटकरे, आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. धैर्यशिल पाटील, आ. बाळाराम पाटील, श्रीमती मिनाक्षीताई पाटील, जि.प. उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, श्रीमती नलीनी , पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील तसेच जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, पोलीस अधिक्षक अनिल पारसकर तसेच जिल

मुख्यमंत्री फडणवीस यांचे हेलिपॅडवर स्वागत

Image
अलिबाग,दि.7,(जिमाका)- राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 10 वा.50 मि. नी  डोलवी ता. पेण येथील जेएसडब्ल्यू  या हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी त्यांचेसमवेत राज्याचे शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंत्री ना. विनोद तावडे हे उपस्थित होते. हेलिपॅडवर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी  त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ००००

अनुकंपा प्रतीक्षा यादी प्रसिद्ध

     अलिबाग दि.6 (जिमाका):- गट क व ड संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर, नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयात तसेच  www.raigad.gov.in  या जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.या प्रतिक्षा यादीतील नाव व क्रमांकाबाबत उमेदवारांची कोणतीही हरकत,आक्षेप असल्यास,उमेदवारांनी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचेमार्फत आपले हरकत अर्ज दि.25 जुलै पर्यंत नोंदवावी. मुदतीनंतर आलेले  आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी कळविले आहे.     00000

जिल्ह्यात एकूण 1048 मि.मि. पावसाची नोंद

        अलिबाग दि.6,(जिमाका)- रायगड जिल्ह्यात आज अखेर एकूण 1048.34 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 02.00 मि.मि., पेण-06.00 मि.मि., मुरुड-1.00 मि.मि., पनवेल-5.60 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-22.20 मि.मि., खालापूर-14.00 मि.मि., माणगांव-07.00 मि.मि., रोहा-06.00 मि.मि., सुधागड-11.00 मि.मि., तळा-04.00 मि.मि., महाड-14.00 मि.मि., पोलादपूर-08.00, म्हसळा-04.00 मि.मि., श्रीवर्धन-02.00 मि.मि., माथेरान-21.50 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 128.30 मि.मि.इतके आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी 33.36 % इतकी आहे. 00000

जिल्ह्यातील प्रश्नांबाबत मंत्रालयस्तरावर बैठका घेऊन मार्ग काढणार- ना. प्रकाश महेता

Image
अलिबाग,दि.6,(जिमाका)- रायग्ड जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन्माननीय सदस्यांनी चर्चा केली. यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनापुर्वी मंत्रालयस्तरावर संबंधित विभागाच्या मंत्रीमहोदयांकडे बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांनी आज पत्रकारांना दिली.             जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते  उपस्थित पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांचे समवेत  जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ना. महेता म्हणाले की,  यंदा प्रथमच जिल्ह्यात 99.9 टक्के मंजूर नियतव्यय खर्च झाला आहे.  त्यामुळे विकासकामांना गती आली.  रायगड जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठि जिल्ह्यात शौचालय बांधकाम पुर्ण करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येईल.             जिल्ह्यात मुद्रा बॅंक योजनेअंतर्गत 15 हजार 377 लाभार्थ्यांना 15 कोटी 76 लक्ष रुपयांचे कर्ज उद्योग व्

जिल्हा नियोजन समिती बैठक 250 कोटींच्या नियतव्यय आराखड्यास मंजूरी

Image
अलिबाग,दि.6,(जिमाका)- जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत  250 कोटी 24 लक्ष रुपयांच्या नियतव्यय आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात ही बैठक आज संपन्न झाली. सन 2016-17 साठी मंजूर निधीपैकी 99.9 टक्के निधी खर्च केल्याबद्दल समितीने जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांचे अभिनंदन केले. जिल्हा नियोजन समितीची सभा आज राजस्व सभागृहात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे गृहनिर्माण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. जयंत पाटील, आ. सुरेश लाड, आ. भरत गोगावले, आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. धैर्यशिल पाटील, आ. मनोहर भोईर, आ. बाळाराम पाटील, जि.प. उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील तसेच जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, कोकण विभागाचे उपायुक्त (नियोजन)बी.एन.सबनीस, जिल्हा परिषदेचे अति. मुख्यकार्यकारी अधिकारी  डॉ. अविनाश गोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणब

गृहनिर्माण मंत्री ना. प्रकाश महेता यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,दि.05,(जिमाका):- राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश महेता हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.6 रोजी सकाळी आठ वाजता घाटकोपर येथून ता.अलिबाग जि.रायगडकडे मोटारीने प्रयाण. दुपारी बारा वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठकीस उपस्थिती.स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, राजस्व सभागृह अलिबाग.दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव शुक्रवार दि.7 रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता शासकीय विश्रामगृह,अलिबाग येथून पीएनपी नाट्यगृह, चेंढरेकडे प्रयाण.दुपारी बारा वाजता आमदार जयंत पाटील यांचा 62 व्या वाढदिवसानिमित्त एनपी नाट्यगृहाच्या उदघाटन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ: पीएनपी नाट्यगृह,चेंढरे,रेवदंडा बायपास रोड, अलिबाग-रायगड.दुपारी तीन वाजता घाटकोपर, मुंबईकडे प्रयाण.

जिल्ह्यात 1040 मि.मि. पाऊस

         अलिबाग दि. 5 (जिमाका):- जिल्ह्यात आज अखेर एकूण  सरासरी पर्जन्यमान 1040.33 मि.मि. नोंदविण्यात आले आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-              अलिबाग 11.00 मि.मि., पेण-54.01 मि.मि., मुरुड-11.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-10.00 मि.मि., कर्जत-16.40 मि.मि., खालापूर-33.00 मि.मि., माणगांव-35.00 मि.मि., रोहा-28.00 मि.मि., सुधागड-48.33 मि.मि., तळा-20.00 मि.मि., महाड-52.00 मि.मि., पोलादपूर-20.00, म्हसळा-41.00 मि.मि., श्रीवर्धन-12.00 मि.मि., माथेरान-25.10 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 417.04 मि.मि.इतके असून पर्जन्यमानाची तुलनात्मक टक्केवारी  33.10 टक्के इतकी आहे.

सुरक्षाविषयक सशुल्क प्रशिक्षण

अलिबाग,दि. 5,(जिमाका):- महाराष्ट्र शासन अंगीकृत मेस्को करिअर ॲकॅडमी, सातारा यांच्यामार्फत  खालील प्रशिक्षण घेण्यात येतात. या प्रशिक्षण केंद्रात उमेदवारासाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येते. कोर्सचे नाव,कालावधी व कोर्स फी पुढीलप्रमाणे -सिक्युरीटी कोर्स-एक महिना, फी-रु.5500/-, भरती पुर्व प्रशिक्षण कोर्स-एक महिना, फी- रु. 6500/-,महिला व पुरुषांसाठी सिक्युरीटी  गार्ड प्रशिक्षण –दि.17 जुलै ते 9 ऑगस्ट् 2017पर्यंत,फी-रु.5500/-  अधिक माहितीसाठी मेस्को करिअर ॲकेडमी, सातारा यांच्याशी 7588624043 व 9168986864 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल पी. जाधव( निवृत्त) यांनी केले आहे.

सैन्य दलात अधिकारीपदाची संधी:मोफत पुर्वतयारी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध

अलिबाग,दि. 5,(जिमाका):- भारतीय सैन्यदल,नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र  उमेदवारांना सर्विस सिलेक्श्‍न बोर्ड (एस.एस.बी.)   या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे  मोफत पूर्व प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि. 25 जुलै  ते 3ऑगस्ट  या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन व प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.   केंद्रामध्ये एस.एस.बी.कोर्स प्रवेश मिळण्यासाठी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (UPSC)पास झालेली असावी. तसेच मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी (सी)सर्टीफिकेट  अे/बी ग्रेड, एनसीसी गृप हेडक्वार्टरने एसएसबी साठी केलेली शिफारस, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर व युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एस.एस.बी. कॉल लेटर किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. रायगड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी  सैनिक कल्याण विभाग,पुणे यांच

ऑलिंपिक व्हिजन कृती आराखडा:प्राविण्यता प्राप्त खेळाडुंना ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन

अलिबाग,दि.5,(जिमाका)- आगामी काळात सन 2020,2024,2028 व 2032 वर्षात होणाऱ्या ऑलिपिंक स्पर्धेत राज्यातील खेळाडूंना सहभागी होऊन प्राविण्य मिळविता यावे यासाठी क्रीडा विभागामार्फत राज्याचे 'ऑलिंपिक व्हिजन कृती आराखडा' तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, यांचेवतीने राज्यातील जिल्हा निहाय प्राविण्य प्राप्त सर्व गटातील खेळाडूंची वैयक्तिक व खेळाबाबत माहिती एकत्रित  करण्यात येत आहे. ही माहिती भरण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. हा गुगल फॉर्म (विहीत अर्ज नमुना)  विभागाच्या http://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर  http://goo.gl/C\GNcsBN या लिंकवर उपलब्ध करण्यात आला आहे.             सर्व गटातील प्राविण्यप्राप्त  खेळाडू, पालक,शाळा,महाविद्यालय,संस्था,मंडळे त्यांचे प्रशिक्षक यांनी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर  जाऊन ही माहिती भरुन त्याची एक प्रत व आपला फोटो  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांचेकडे सादर करण्यात यावी, असे आवाहन आयुक्त्,क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचेवतीने करण्

क्रीडा प्रबोधिनी प्रवेश चाचणी: विभागस्तरावर चाचण्यांचे वेळापत्रक

अलिबाग,दि.04,(जिमाका)-   क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत राज्यातील 11 क्रीडा प्रबोधिनीमध्ये  विविध क्रीडा प्रकारांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी खेळाडूंची निवड कौशल्य चाचण्यांद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेश चाचण्या विभागनिहाय घेण्यात येणार असून त्यांचे वेळापत्रक याप्रमाणे- या चाचण्यात  ॲथलेटिक्स्,जलतरण,जिम्नॅस्टिक, ट्रायथलॉन, ज्युदो, बॉक्सिंग, सायकलिंग, कुस्ती, हॉकी, फुटबॉल,हँडबॉल,आर्चरी,बॅडमिंटन,टेबल टेनिस,शुटींग, वेटलिफ्टिंग या खेळांच्या कौशल्य चाचण्या घेतल्या जाणार आहेत. कौशल्य चाचण्यांचा कार्यक्रम  विभागनिहाय  याप्रमाणे- नागपूर- दि.5 ते 6, ठिकाण-विभागीय क्रीडा संकुल नागपूर, अमरावती- दि.7 ते 8, ठिकाण-विभागीय क्रीडा संकुल अमरावती, लातुर- दि.10 ते 11 , ठिकाण- विभागीय क्रीडा संकुल लातूर, औरंगाबाद- दि.12 ते 13 , ठिकाण- विभागीय क्रीडा संकुल,औरंगाबाद, नाशिक- दि.14 ते 15 , ठिकाण- विभागीय क्रीडा संकुल नाशिक, मुंबई- दि.17 ते 18 , ठिकाण- विभागीय क्रीडा संकुल धारावी, मुंबई, पुणे- दि.19 ते 20. ठिकाण -शिवछत्रपत

चार कोटी वृक्ष लागवड अभियान: जिल्ह्यात 7 लाखांहून अधिक रोपांची लागवड

  अलिबाग,दि.04,(जिमाका)- राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या चार कोटी वृक्ष लागवड अभियानात आज रायगड जिल्ह्यात 7 लक्ष 4 हजार 881 रोपांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे. रायगड जिल्ह्यात  10 लक्ष 32 हजार 900 इतक्या रोप लागवडीचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले होते.  प्रत्यक्षात 10 लक्ष 87 हजार 708 इतक्या रोपांच्या लागवडीसाठी प्रशासनाने सज्जता केली आहे . आज दि. 4 रोजी दुपारी दोन वा. पर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात 7 लक्ष 4 हजार 881 रोपांची लागवड पुर्ण करण्यात आली आहे.

पंतप्रधान पिक विमा योजना: शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

अलिबाग,दि.03,(जिमाका):- खरीप हंगाम 2017-18 साठी जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक सुरक्षिततेसाठी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  यांनी केले आहे. या योजनेत सहभाग कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांव्यतिरिक्त कुळांसाठी सुद्धा ही योजना खुली आहे. विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजूर कर्ज मर्यादे इतकी राहील. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम 2 टक्के व रब्बी हंगाम दीड टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे.पंतप्रधान पिक विमा योजना रायगड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके,गळीत धान्य् पिके व वार्षिक व्यापारी पिके, वार्षिक फळपिके या पिकांचा समावेशही रायगड जिल्ह्यासाठी करण्यात आला आहे. या  योजनेअंतर्गत पिक  पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात नैसर्गिक आपत्ती व किड रोग यामुळे येण

लोकशाही दिनी चार अर्ज प्राप्त

  अलिबाग,दि.03,(जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जाणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी पी.डी.मलिकनेर हे यावेळी अध्यक्षस्थानी उपस्थित होते.   यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,   जिल्हा शल्यचिकित्सक अजित गवळी, पोलीस उप अधिक्षक राजेंद्र दंडाळे व अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.    यावेळी एकूण चार तक्रारदारांनी आपले अर्ज दाखल केले. त्यात महसूल विभाग-02, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जि.प.-02, अशा एकूण 4 अर्जांचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी मलिकनेर यांनी प्रलंबित अर्जांचाही आढावा घेतला.

चार कोटी वृक्ष लागवड अभियान जिल्ह्यात 2 लक्ष 58 हजार रोपांची लागवड

चार कोटी वृक्ष लागवड अभियान जिल्ह्यात 2 लक्ष 58 हजार रोपांची लागवड अलिबाग,दि.02,(जिमाका):-   राज्यात चार कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत जिल्ह्यात आज सकाळी 10 वा. पर्यंत 2 लक्ष 58 हजार 240 रोपांची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती वन विभागाच्या अहवालानुसार प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात   वनविभागामार्फत 2 लाख 24 हजार 197 तर अन्य विभागांमार्फत 34 हजार 240 रोपांची लागवड करण्यात आल्याचे सदर अहवालात नमूद करण्यात आले आहे.   00000

जिल्ह्यात एकूण 958 मि.मि. पावसाची नोंद

जिल्ह्यात एकूण 958 मि.मि. पावसाची नोंद         अलिबाग दि.02  (जिमाका):- रायगड जिल्ह्यात आज अखेर एकूण 958.27 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 5.00 मि.मि., पेण-20.00 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-47.00 मि.मि., उरण-11.00 मि.मि., कर्जत-65.20 मि.मि., खालापूर-20.00 मि.मि., माणगांव-13.00 मि.मि., रोहा-49.00 मि.मि., सुधागड-29.66 मि.मि., तळा-28.00 मि.मि., महाड-32.00 मि.मि., पोलादपूर-35.00, म्हसळा-17.80 मि.मि., श्रीवर्धन-12.00 मि.मि., माथेरान-124.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 521.26 मि.मि.इतके असून एकूण सरासरी 32.85 टक्के इतकी आहे. 000000