चार कोटी वृक्ष लागवड अभियान: जिल्ह्यात 7 लाखांहून अधिक रोपांची लागवड

 अलिबाग,दि.04,(जिमाका)-राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या चार कोटी वृक्ष लागवड अभियानात आज रायगड जिल्ह्यात 7 लक्ष 4 हजार 881 रोपांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे.

रायगड जिल्ह्यात  10 लक्ष 32 हजार 900 इतक्या रोप लागवडीचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले होते.  प्रत्यक्षात 10 लक्ष 87 हजार 708 इतक्या रोपांच्या लागवडीसाठी प्रशासनाने सज्जता केली आहे. आज दि. 4 रोजी दुपारी दोन वा. पर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यात 7 लक्ष 4 हजार 881 रोपांची लागवड पुर्ण करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड