Posts

Showing posts from June 6, 2021

जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत जनजागृती मोहिमेचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त "बालकामगार" या सामाजिक अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी, याकरिता शासनाच्या विविध विभागामार्फत   विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.               दि.12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून कामगार उप आयुक्त, रायगड-पनवेल कार्यालयामार्फत सध्याची करोना परिस्थिती लक्षात घेता ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.             यानुषंगाने सर्व औद्योगिक संघटना असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, क्रिडाई- बांधकाम व्यवसायातील मालक असोसिएशन व वीटभट्टी असोसिएशन, सर्व शासकीय / निमशासकीय संस्था, नागरिक यांनीही या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याकरिता जनजागृती करुन या मोहिमेत सहभाग नोंदवावा व रायगड जिल्हा बालकामगार मुक्त करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन कामगार उपायुक्त, रायगड- पनवेल, श्री.प्र.मा.पवार यांनी केले आहे.   ००००००

खालापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे व परिसरात कलम 144 लागू

                                                अलिबाग, जि.रायगड, दि.10 (जिमाका):- पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात व दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात.   त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये, याकरिता खालापूर तालुक्यातील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा व परिसर, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, आडोशी पाझर तलाव, मोरबे धरण, नढाळ/वरोसे धरण, वावर्ले धरण, डोणवत धरण, माडप धबधबा, धामणी कातकरवाडी धरण, कलोते धरण या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे,धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ.ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारी

कर्जत तालुक्यातील पर्यटन स्थळे व परिसरात कलम 144 लागू

                                                           अलिबाग, जि.रायगड, दि.10 (जिमाका):- पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात व दुर्देवाने काही प्रमाणात जीवितहानी होण्याच्या घटना घडतात.   त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये, याकरिता कर्जत तालुक्यातील आषाणे-कोषाणे धबधबा, सोलनपाडा धरण-पाझर तलाव, पळसदरी धरण, कोंढाणे धरण-धबधबा, पाली भूतिवली धरण, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, पाषाणे तलाव, बेकरे धबधबा,आनंदवाडी धबधबा, टपालवाडी धबधबा या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे,धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ.ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग, जि.रायगड, दि.10 (जिमाका):- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-             शुक्रवार, दि.11 जून 2021 रोजी सायंकाळी 06.00 वा. ता.खेड, जि.रत्नागिरी येथून मोटारीने महाडकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात येणाऱ्या व्हेंटीलेटरच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : एम.एम.ए.कोविड सेंटर महाड. रात्रौ 8.00 वा. महाड येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण. ०००००० ०

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग,जि.रायगड दि.10 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.00 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-5.60 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-2.30 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.20 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-44.30 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-1.40 मी. इतकी आहे. 00000

परदेशात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या शिष्यवृत्तीकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

    अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून शासन निर्णय क्र. आदिशी-1203 / प्र.क्र.76/ का.12 दि. 31 मार्च 2005, दि.11 एप्रिल 2012 व दि.16 मार्च 2016 अन्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.       त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी दि.25 जून 2021 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.       अर्जाचा नमुना, योजनेच्या अटी व शर्ती या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पेण येथे संपर्क साधावा आणि अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण,जि.रायगड,कृषी उत्पन्न बाजार समिती, पहिला मजला,धरमतर रोड,रायगड बाजार जवळ,पेण,जि. रायगड, तसेच ई-मेल   poitdp.pen-mh@gov.in व दूरध्वनी क्रमांक 02143-252519 येथे   संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले आहे. ००००००

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकारातून पनवेल तालुक्यातील "स्नेहकुंज" वृध्दाश्रमातील अपंग व जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ

  अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्हयामधील सर्व वृध्दाश्रम, आदिवासी, अपंग, अंथरुणात असलेले रुग्ण, अशा सर्वांचे लसीकरण प्राधान्याने करण्याबाबत सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास, मुख्याधिकारी नगरपरिषद यांना आदेशित केले होते.                   त्यानुषंगाने या लसीकरण मोहिमेस पनवेल तालुक्यामधून सुरुवात झाली असून दि. 09 जून रोजी "स्नेहकुंज आधारगृह" नेरे येथील 20 वयोवृध्द व अपंग नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.               ज्या नागरिकांकडे पुरावे नाहीत त्यांचे आधारकार्ड तयार करण्याचे कामही प्राधान्याने   सुरु करण्यात आले आहे.   लसींची उपलब्धता ज्या प्रमाणात होईल त्याप्रमाणे पनवेल तालुक्यामधील उर्वरीत 12 आश्रमातील सर्व लोकांचे लसीकरण सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून प्राधान्याने करण्यात येणार आहे, अशी माहिती पनवेल तहसिलदार श्री.विजय तळेकर यांनी दिली आहे.               या मोहिमेसाठी सामाजिक जाणीवेतून हिंदाल्को कंपनी, तळोजा व "स्नेहकुंज" आधारगृहाच्या संचालिका श्रीमती संगिता जोशी व नितीन जोशी

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 79 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 79.38 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 223.56  मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-       अलिबाग-80.00 मि.मी., पेण- 80.00 मि.मी., मुरुड-69.00 मि.मी., पनवेल-160.40 मि.मी., उरण-111.00 मि.मी., कर्जत- 79.50 मि.मी., खालापूर- 69.00 मि.मी., माणगाव- 39.00 मि.मी., रोहा-97.00 मि.मी., सुधागड-84.00 मि.मी., तळा-67.00 मि.मी., महाड-36.00 मि.मी., पोलादपूर-35.00 मि.मी, म्हसळा- 54.00 मि.मी., श्रीवर्धन- 87.00 मि.मी., माथेरान- 122.20 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 270.10 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 58.99 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 7.11 टक्के इतकी आहे. 00000

राज्य उत्पादन शुल्क मुरुड विभागाचे निरीक्षक आनंद पवार यांची पेण तालुक्यातील मौजे रावे येथे धडक कारवाई जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Image
    अलिबाग, जि.रायगड,दि.9 (जिमाका):-   राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रायगड जिल्ह्याच्या अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे, उप अधीक्षक   श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, मुरुड विभागाचे निरीक्षक आनंद पवार यांच्यासह पथकातील श्री.अकुंश बुरकुल, दुय्यम निरीक्षक, रोहा, श्री.रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक, खालापूर-सुधागड, श्रीमती नरहरी, सहायक दुय्यम निरीक्षक, जवान श्री.गणेश नाईक, श्री.गणेश घुगे यांनी दि.08 जून 2021 रोजी पेण तालुक्यातील मौजे रावे येथे छापा टाकून धडक कारवाई केली.      या धडक कारवाईत तब्बल 4 गुन्हे नोंद करण्यात असून   10 लिटर गावठी दारू, 5 हजार 825 लिटर रसायन, असा एकूण रुपये   1 लाख 38   हजार 200/-किंमतीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. -------

आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे कर्जत उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी- ठाकूर यांचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका):- भारतीय हवामान विभागाने दि. 09 ते 12 जून 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिलेला आहे.          या पार्श्वभूमीवर अनावश्यक घराबाहेर न पडता घरी राहूनच आपत्तीवर मात करण्यासाठी शासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कर्जत उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली परदेशी- ठाकूर यांनी केले आहे.      कर्जत उपविभागातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व शासकीय व स्थानिक प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीकोनातून दि.8 जून 2021 रोजी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांची ऑनलाईन बैठक कर्जत उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली परदेशी-ठाकूर यांनी आयोजित केली होती.       या ऑनलाईन बैठकीत उपविभागातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष कर्जत/खोपोली/माथेरान नगरपरिषद, सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत/खालापूर, तहसिलदार कर्जत/खालापूर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत/खालापूर, मुख्याधिकारी कर्जत/खोपोली/माथेरान नगरपरिषद/खालापूर नगरपंचायत,मंडळ अधिकारी, ग्

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 58 मि.मी. पावसाची झाली नोंद

    अलिबाग,जि.रायगड,दि.09 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 58.99 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 144.18   मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-       अलिबाग-60.00 मि.मी., पेण- 58.00 मि.मी., मुरुड-65.00 मि.मी., पनवेल-113.60 मि.मी., उरण-40.00 मि.मी., कर्जत- 41.80 मि.मी., खालापूर- 53.00 मि.मी., माणगाव- 53.00 मि.मी., रोहा-64.00 मि.मी., सुधागड-48.00 मि.मी., तळा-56.00 मि.मी., महाड-53.00 मि.मी., पोलादपूर-43.00 मि.मी, म्हसळा- 53.00 मि.मी., श्रीवर्धन- 103.00 मि.मी., माथेरान- 39.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 943.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 58.99 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 4.59 टक्के इतकी आहे. 00000

जिल्हयातील उत्पादक व आयातदार परवानाधारकांनी वार्षिक परतावा दि.30 जून पर्यंत ऑनलाईन सादर करावा अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांचे आवाहन

    अलिबाग, जि.रायगड,दि.8 (जिमाका) :-   रा यगड जिल्हयातील उत्पादक व आयातदार परवानाधारकांनी वार्षिक परतावा Food Safety Compliance System (FoSCoS) https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन  अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांनी केले आहे. दि. 5 ऑगस्ट 2011 पासून अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू झाला आहे व त्याची अंमलबजावणी रायगड जिल्हयात अन्न व औषध प्रशासन, रायगड या कार्यालयातर्फे यशस्वीपणे करण्यात येत आहे. अन्न सुरक्षा व मानदे (परवाना व नोंदणी) नियमन 2011 मधील परवाना अट क्र.5 व नियमन 2.1.13 (1) नुसार सर्व अन्न पदार्थ उत्पादक व आयातदार परवानाधारकांनी वार्षिक परतावा (Annual Return) नमुना डी-1 मध्ये परवाना अधिकारी यांच्याकडे दरवर्षी 31 मे पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये वार्षिक परतावा Food Safety Compliance System (FoSCoS) https://foscos.fssai.gov.in   या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करणे सन 2020-2021 पासून बंधनकारक केले असून कोविड 19

प्रमाणित वजनकाट्यांचा वापर न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द वैध मापन शास्त्र कार्यालयाची धडक कारवाई प्रमाणित वजनकाटे न वापरणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन

    अलिबाग, जि.रायगड,दि.8 (जिमाका) :- पेण शहरातील भाजी, फळे, मटन, चिकन, मच्छी, मेडिकल व धान्य विक्रेते हे जुन्या व शासनाकडून प्रमाणित न केलेल्या वजनकाटयाचा वापर करुन ग्राहकांची लूट करीत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानुषंगाने दि.24 ते 27 मे 2021 या कालावधीत निरीक्षक वैध मापन शास्त्र, अलिबाग विभाग यांनी पेण शहरातील भाजी, फळे, मटन, चिकन, मच्छी, मेडिकल व धान्य विक्रेत्यांकडील   वजनकाट्यांच्या अचानक तपासण्या केल्या. या तपासणीत भाजी, धान्य, मटन, चिकन, मच्छी व मेडिकल इत्यादी 21 दुकानांचा समावेश आहे. या मोहिमेत वैध मापन शास्त्र, कायदा 2009 व त्याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 8 व्यापाऱ्यांविरुध्द कारवाई केली आहे. तरी वस्तू खरेदी करताना दुकानदारांकडून वजनात योग्य माल मिळत असल्याची खात्री करावी, प्रमाणित वजनाऐवजी दगडांचा वापर व्यापारी करीत असल्यास तसेच गंजलेल्या, फुटलेल्या व जुनाट वजनकाटयांचा वापर आढळल्यास अशा व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करु नये व याची सूचना निरीक्षक वैध मापन शास्त्र, अलिबाग विभाग, 1889, पाटील वाडी, चेंढरे,अलिबाग, जि. रायगड दूरध्वनी क्रमांक 02143-254498

मुरुड नगरपरिषद क्षेत्रात अत्याधुनिक फिरत्या दवाखान्याद्वारे क्षयरोग चाचणी शिबिर संपन्न

    अलिबाग, जि.रायगड,दि.8 (जिमाका) :- भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान संस्थान ( ICMR ) व जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मुरुड-जंजिरा येथे क्षयरोग तपासणी शिबीर संपन्न झाले. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व साधन सामुग्री सोबत घेऊन सर्व सुविधायुक्त फिरता दवाखाना कार्यरत आहे. या शिबिरात रुग्णांची मधुमेह व हिमोग्लोबिन चाचणी, डिजिटल एक्स-रे, थुंकी नमुना तपासणीसाठी CBNAAT ही उच्च दर्जाची चाचणी, वजन व उंची अशी संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 157 जणांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. या मोहिमेंतर्गत जवळपास एक हजार जणांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याचा उपयोग भारतातील क्षयरोगांची स्थिती समजण्यास व त्यांचा अभ्यास करण्यासाठी होणार आहे. यातील माहितीच्या आधारे क्षयरोगासंदर्भातील धोरण निश्चित करण्यासाठी शासनास मदत होणार आहे. या शिबिराच्या व्यवस्थापनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश अंधळकर, डॉ. शबाना खान, सामाजिक कार्यकर्ते श्री. राकेश गायकवाड, आरोग्य सेवक श्री.सागर रोकडे व इतर कर्मचारी असे जवळपास 20 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.  

पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन

  अलिबाग, जि.रायगड,दि.8 (जिमाका) :- जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून पावसाळ्यात नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, साथीच्या आजाराची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी केले आहे. पावसाळ्यात पिण्याचे पाणी काही कारणाने दूषित झाल्यास कॉलरा, विषमज्वर, गॅस्ट्रो, हगवण अशा आजारांचा प्रादूर्भाव होतो. तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थावर माश्या बसून ते दूषित झाल्यास उलट्या, जुलाब, कावीळ असे आजार होतात. याबाबत काही लक्षणे आढळल्यास त्वरीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा इतर शासकीय रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात उद्भवणारे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, शुद्धीकरण न केलेले बोअरवेल किंवा विहिरीचे पाणी तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, पाणी

जिल्ह्यातील ग्रामपंचायत शिवकरचे सरपंच अनिल ढवळे व ग्रामपंचायत नागोठणेचे सरपंच डॉ.मिलिंद धात्रक यांना मुख्यमंत्री संवाद कार्यक्रमात सहभागी होण्याची मिळाली संधी ग्रामपंचायत शिवकरचे सरपंच अनिल ढवळे यांनी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केले मनोगत शिवकर ग्रामपंचायतीने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची दिली माहिती

    अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-   राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी काल (दि.7 जून रोजी) राज्यातील सरपंच आणि आशा स्वयंसेविका यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत शिवकरचे सरपंच श्री.अनिल ढवळे आणि रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत नागोठणेचे सरपंच श्री.डॉ.मिलिंद धात्रक हे या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते.  तर पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत शिवकरचे सरपंच अनिल ढवळे यांना मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यासमोर मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. या संवादादरम्यान सरपंच श्री.अनिल ढवळे यांनी शिवकर ग्रामपंचायतीने करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांना दिली.   यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्रीमती शीतल पुंड हे उपस्थित होते. सरपंच श्री.अनिल ढवळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दि.22 मार्च 2020 रोजी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याकडून देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर गावाने एकत्रि

सन 2021 च्या शिक्षक पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज करावेत

  अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-   दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन 2021 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला असून दि.01 जून 2021 पासून MHRD ( www.mhrd.gov.in ) या वेबसाईटवरील https://nationalawardstoteachers.education.gov.in/new user.aspx या लिंकवर नावनोंदणी सुरु झालेली आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दि.20 जून 2021 पर्यंत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, रायगड डॉ.ज्ञानदा फणसे यांनी केले आहे. ००००००००

शासनाच्या नव्या निर्देशाप्रमाणे राज्य परिवहन मंडळ रायगड विभागामार्फत एस.टीच्या काही फेऱ्या सुरु

  अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-   शासनाच्या नव्या निर्देशाप्रमाणे दि.7 जून2021 रोजीपासून सार्वजनिक वाहतूक 100 टक्के आसन क्षमतेने सुरु करावयाची असल्याने राज्य परिवहन मंडळ रायगड विभागामार्फत बंद असणाऱ्या काही फेऱ्या सुरु करण्यात येत असून या तालुकानिहाय फेऱ्यांची आगारनिहाय माहिती पुढीलप्रमाणे :-             महाड आगार :- महाड-बोरीवली सकाळी 5.30 वा., सकाळी 6.45 वा., दुपारी 12.30 वा., दुपारी 13.30 वा., दुपारी 15.30 वा., पोलादपूर-बोरीवली सकाळी 9.30 वा.,   महाड-नालासोपारा दुपारी 12.00 वा., महाड-मुंबई दुपारी 15.15 वा., महाड-ठाणे सकाळी 6.30 वा., महाड-पुणे सकाळी 8.30 वा., दुपारी 12.30 वा., महाड-पनवेल सकाळी 6.00 वा., सकाळी 8.00 वा., दुपारी 12.00 वा. अलिबाग आगार :- अलिबाग-मुंबई सकाळी 6.30 वा., सकाळी 7.00 वा., दुपारी 13.00 वा., दुपारी 14.00 वा., अलिबाग-ठाणे सकाळी 6.15 वा.,दुपारी 14.30 वा., रेवदंडा-बोरीवली सकाळी 8.15 वा., अलिबाग-पुणे सकाळी 6.00 वा., सकाळी 7.30 वा., दुपारी 14.00 वा.,   अलिबाग-पनवेल दर अर्ध्या तासाच्या वारंवारीतेने फेऱ्या सुरु आहेत. पेण आगार :- पेण-ठाणे सकाळी 7.15 वा., द

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 10 मि.मी. पावसाची झाली नोंद

  अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 10.30 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 85.19  मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.              आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-28.00 मि.मी., पेण- 8.00 मि.मी., मुरुड-19.00 मि.मी., पनवेल-8.20 मि.मी., उरण-5.00 मि.मी., कर्जत- 2.60 मि.मी., खालापूर- 1.00 मि.मी., माणगाव- 21.00 मि.मी., रोहा-9.00 मि.मी., सुधागड-3.00 मि.मी., तळा-21.00 मि.मी., महाड-6.00 मि.मी., पोलादपूर-2.00 मि.मी, म्हसळा- 7.00 मि.मी., श्रीवर्धन- 21.0 मि.मी., माथेरान- 3.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 164.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 10.30 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 2.71 टक्के इतकी आहे. 00000  

कर्जत येथील गिर्यारोहण प्रशिक्षक श्री.अमित गुरव यांचे राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रण स्पर्धेत उल्लेखनीय यश

Image
    अलिबाग, जि.रायगड,दि.7 (जिमाका):- जागतिक एव्हरेस्ट दिनानिमित्त भारतातील गिर्यारोहणातील अग्रगण्य असणाऱ्या गिरीप्रेमी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत कर्जत येथील श्री.अमित गुरव (अधिकृत गिर्यारोहण प्रशिक्षक) यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.             गिरीप्रेमी (गिर्यारोहण) संस्था ही भारतामध्ये अत्यंत नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमार्फत गिर्यारोहणाच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. दि.29 मे हा दिवस 'जागतिक एव्हरेस्ट दिन' म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून, एव्हरेस्ट शिखराच्या संदर्भात या संस्थेच्या माध्यमातून छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळ जवळ 200 छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक डॉ.रघुनाथ गोडबोले, द्वितीय क्रमांक श्री. विकास शुक्ला व   श्री.अमित गुरव यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. श्री.अमित गुरव हे मूळचे कर्जत येथील रहिवासी आहेत, ते 'गिर्यारोहणाचे अधिकृत प्रशिक्षक' असल्याकारणाने त्यांची नेहमीच सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये व हिम

कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक मयत झालेल्या कुटुंबांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते कोरडे अन्नधान्य वाटप कोविड आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती 1098 या हेल्पलाईनवर उपलब्ध करुन देण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Image
    अलिबाग,जि.रायगड.दि.7 (जिमाका):- कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची स्थिती अत्यंत हालाखीची असून शासनाची मदत येईपर्यंत या कुटुंबांना तातडीची मदत देणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांनी मदत करण्याबाबतचे आवाहन रायगड जिल्हा टास्क फोर्सच्या (दि.02 जून ) रोजीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन एस.ओ.एस.चिल्ड्रन्स व्हिलेज इंडिया या स्वयंसेवी संस्थेने अशा संकटात सापडलेल्या 200 कुटुंबांकरिता अन्नधान्याचे 200 किट जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केले. लाभार्थी बालक सानिका परशुराम थळे हिला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले व त्यानंतर मदत साहित्याच्या गाडीला जिल्हाधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून ही गाडी साहित्य वाटपाकरीता जिल्ह्यात रवाना झाली. यावेळी जिल्हा परिविक्षा अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास, श्री.अशोक पाटील, एस. ओ. एस. बालगृह सोगाव चे संचालक श्री. राकेश सिन्हा, प्रकल्प प्रमुख श्री. पठाण रियाज खान,   श्री. संजय काचरे, राजें

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे रायगडवासियांशी साधला संवाद करोनाच्या संकटातून निश्चितपणे सुखरुप बाहेर पडू रायगडकरकरांना दिला विश्वास

Image
    अलिबाग,जि.रायगड.दि.7 (जिमाका):- करोनाच्या आणि राज्यभरातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज (दि.7 जून) रोजी मंत्रालयातील त्यांच्या दालनातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रायगडकर जनतेशी संवाद साधला. आपण सर्वजण आत्मविश्वासाने व संयमाने या करोनाच्या संकटात गंभीर परिस्थितीचा सामना करीत आहोत. या चिंताजनक परिस्थितीतून आपण निश्चितपणे सुखरूप बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी नेटकऱ्यांना दिला.       पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविडचा प्रादूर्भाव वाढताना दिसला. आपण या दोन्ही टप्प्यांचा सर्वतोपरी मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. मात्र   आता   अधिक सावधपणे तिसऱ्या लाटेपूर्वी आवश्यक ती सर्व तयारी ठेवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासन आणि प्रशासन आरोग्य यंत्रणा अधिकाधिक बळकट करताना दिसत आहे. लसीकरणावरही जास्तीत जास्त भर दिला जात आहे.   शासनाने नुकताच एकूण पाच स्तरांमधून कोविड निर्बंध उठविण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे.     रायगड जिल्हा चौथ्या स्तरात असून जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात सविस्तर अधिसूचना काढली असून जिल्हा माहित

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 6 मि.मी. पावसाची झाली नोंद

  वृत्त क्रमांक:- 513                                                                      दिनांक:- 7 जून 2021   अलिबाग,जि.रायगड,दि.07 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.24 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 74.89   मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.               आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग- 1.00 मि.मी., पेण- 0.00 मि.मी., मुरुड- 46.00 मि.मी., पनवेल- 5.60 मि.मी., उरण- 13.00 मि.मी., कर्जत- 0.00 मि.मी., खालापूर- 0.00 मि.मी., माणगाव- 2.00 मि.मी., रोहा-4.00 मि.मी., सुधागड-2.0 मि.मी., तळा- 0.00 मि.मी., महाड-0.00 मि.मी., पोलादपूर- 0.00 मि.मी, म्हसळा- 5.00 मि.मी., श्रीवर्धन- 15.0 मि.मी., माथेरान- 6.20 मि.मी.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 99.80 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 6.24 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 2.38 टक्के इतकी आहे. 00000