सन 2021 च्या शिक्षक पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज करावेत

 


अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-  दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन 2021 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला असून दि.01 जून 2021 पासून MHRD (www.mhrd.gov.in) या वेबसाईटवरील https://nationalawardstoteachers.education.gov.in/new user.aspx या लिंकवर नावनोंदणी सुरु झालेली आहे.

तरी इच्छुक शिक्षकांनी दि.20 जून 2021 पर्यंत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, रायगड डॉ.ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक